मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असली तरी, मृत्यूचा आकडा मात्र स्थिर स्थावर आहे. आज दिवसभरात 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 80 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. ओमायक्रोनचा एकही रुग्ण सापडलेला नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या वतीने ३१ लाख ३ हजार ७१७ सूर्य नमस्कारांचे योगदान
राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. सक्रिय, क्वारंटाईन आणि बाधित रुग्ण देखील कमालीचे घटत आहेत. आज 1 हजार 80 रुग्णांची नोंद झाली. तर, 47 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची टक्केवारी 1.82 टक्के इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के असून, आज 2 हजार 488 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 76 लाख 99 हजार 623 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
कोविडचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 73 लाख 83 हजार 579 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.16 टक्के इतके म्हणजेच, 78 लाख 60 हजार 317 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 74 हजार 560 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 958 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 13 हजार 70 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचा एकही रुग्ण नाही
कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमयक्रोनचा आज एकही रुग्ण सापडलेला नाही. आजपर्यंत 4 हजार 509 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर, 3 हजार 994 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8 हजार 904 जणांची जनुकीय चाचणी केली. 8 हजार 44 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 860 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 135
ठाणे - 7
ठाणे मनपा - 30
नवी मुंबई पालिका - 7
कल्याण डोबिवली पालिका - 5
मीरा भाईंदर - 8
वसई विरार पालिक - 1
नाशिक - 16
नाशिक पालिका - 18
अहमदनगर - 62
अहमदनगर पालिका - 6
पुणे - 87
पुणे पालिका - 205
पिंपरी चिंचवड पालिका - 90
सातारा - 15
नागपूर मनपा - 44
हेही वाचा - Patra Chawl redevelopment : मुंबई सोडून जाऊ नका! पत्रा चाळवासियांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन