ETV Bharat / city

Farm Laws Repealed महाराष्ट्र काँग्रेसकडून विजय दिवस साजरा! - दिल्लीच्या वेशीवर देशाचा शेतकरी

काँग्रेस नेते नसीम खान यांनी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, की गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या वेशीवर देशाचा शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करत होता. मात्र, या शेतकऱ्याला आंदोलनजीवी म्हणून हिणवण्यात आले.

महाराष्ट्र काँग्रेसकडून विजय दिवस साजरा
महाराष्ट्र काँग्रेसकडून विजय दिवस साजरा
author img

By

Published : Nov 20, 2021, 3:12 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे ( Farm Laws Repealed ) घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसकडून देशभरात विजय दिवस (congress celebrate Vijay Day) साजरा केला जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडूनदेखील (Maharashtra congress committee celebrate Vijay Day) विजय दिवस साजरा करण्यात आला. दादरमधील टिळक भवन या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी टिळक भवनमध्ये (Congress Vijay celebration in Tilak Bhavan) फटाके फोडून आणि मिठाई वाटून कृषी कायदे रद्द घेतल्याचा आनंद 'विजय दिवस' म्हणून साजरा केला. यावेळी काँग्रेसचे नेते नसीम खान (Congress leader Nasim Khan), चंद्रकांत हांडोरे, भालचंद्र मुणगेकर (Bhalchandra Mungekar) यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा-शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि खलिस्तानी संबोधल होतं, ते कसे विसरणार - राकेश टिकैत

शेवटी शेतकऱ्यांसमोर केंद्र सरकारला झुकावे लागले
काँग्रेस नेते नसीम खान यांनी (congress leader Nasim Khan slammed BJP over farmers agitation) भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, की गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या वेशीवर देशाचा शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करत होता. मात्र, या शेतकऱ्याला आंदोलनजीवी म्हणून हिणवण्यात आले. तसेच आंदोलनाच्या मागे खलिस्तानी हात असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला. मात्र, शेवटी शेतकऱ्यांसमोर केंद्र सरकारला झुकावे लागले. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. म्हणूनच काँग्रेस या दिवसाला विजय दिवस म्हणून संपुर्ण देशभर साजरा करत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसकडून विजय दिवस साजरा

हेही वाचा-Farm Laws Repealed : कृषी कायदे रद्दच्या घोषणेनंतर नाशकात शेतकरी संघटनांकडून जल्लोष

शेतमजुरांच्या पाठीवरील कर्जाचा बोजा कमी करावा -

राहुल गांधींनी शेतकऱ्यांना लिहलेल्या (Rahul Gandhi writes letter to farmers) पत्रामध्ये भविष्यातील रणनितींवर भाष्य केले आहे. कायदे रद्द होणार असले तरीही अद्याप असे काही मुद्दे आहेत. ज्यावर सरकारशी दोन हात करणे आहेत, असे राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे. शेतकऱ्यांना योग्य एमएसपी मिळावी आणि वादग्रस्त वीज दुरुस्ती विधेयक सरकारने मागे घ्यावे, तसेच शेतात वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूवरील कर कमी करावा आणि इंधनाचे दर कमी करावेत आणि शेतमजुरांच्या पाठीवरील कर्जाचा बोजा कमी करावा, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. सध्याच्या आंदोलनाप्रमाणेच भविष्यातही तुमच्या सर्व लढ्यात मी आणि काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या खांद्याला खांदा लावून आवाज उठवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले.

हेही वाचा-rakesh tikait एमएसपीवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहील- राकेश टिकैत

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.