ETV Bharat / city

लॉकडाऊनचा निर्णय होणार? साडेतीन वाजता मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक - कोरोना

या बैठकीत आता काय चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यात किराणा दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी कमी करण्याचा निर्णय कालच घेण्यात आला होता.

लॉकडाऊनचा निर्णय होणार? साडेतीन वाजता मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

author img

By

Published : Apr 20, 2021, 9:24 AM IST

मुंबई : संचारबंदील लावूनही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने सरकार चिंतेत असून या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक दुपारी साडेतीन वाजता बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत आता काय चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यात किराणा दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी कमी करण्याचा निर्णय कालच घेण्यात आला होता.

लॉकडाऊनविषयी होणार निर्णय?
साडेतीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन कडक करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संचारबंदीनंतरही राज्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत नाहीये. त्यामुळे अनेक मंत्र्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची मागणी केली आहे. यावर या बैठकीत चर्चा होऊन आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

किराणा दुकाने फक्त 4 तास सुरू

राज्यात संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्याचे संकेत दिले गेले आहेत. किराणा दुकाने ठरावीक वेळेतच खुली करता येणार आहेत. सकाळी 7 ते 11 या वेळेतच किराणा दुकाने सुरू राहतील. तसेच राज्यात ऑक्सीजनचा साठा कमी आहे. येणाऱ्या काळात अठराशे टन ऑक्सीजन राज्याला मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कालच दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. नागरिकांनी सहकार्य केले नाही तर, संचारबंदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. म्हणून येणाऱ्या दिवसात परिस्थिती अशीच राहिली तर राज्य सरकार कडून हे निर्बंध अजून कडक करण्यात येतील असा इशाराही यावेळी राजेश टोपे यांनी दिला होता.

राज्यात 58 हजार नवे रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती -
राज्यात 52 हजार 412 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 31लाख 59हजार 240रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.
राज्यात नव्या 58 हजार 924 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 24 तासांत 315 रुग्णांचा म्रुत्यु झाला असून मृत्यूदर 1.58 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 38लाख 98हजार 262 रुग्णांची नोंद झालीय.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 76हजार 520 इतकी झालीय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.