ETV Bharat / city

LIVE UPDATES : महाराष्ट्रातील प्रश्नांवर मुख्यमंत्री आलेच नाहीत - देवेंद्र फडणवीस - राज्यपाल अभिभाषण

maharashtra-budget-session-live-updates
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
author img

By

Published : Mar 3, 2021, 9:48 AM IST

Updated : Mar 3, 2021, 7:58 PM IST

18:55 March 03

महाराष्ट्रातील प्रश्नांवर मुख्यमंत्री आलेच नाहीत - देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले -   

राज्यपालांच्या भाषणावरील धन्यवाद चर्चेवर ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत, ते सगळीकडे फिरले पण ते महाराष्ट्राबद्दल काहीच बोलले नाहीत.. मुख्यमंत्र्यांना पदावर येवून आता खूप दिवस झाले आहेत. मात्र, त्यांना अजून चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण यातील काहीच फरक कळत नाही. 

विमा, वीज तोडणीसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी ते काहीच बोलले नाहीत, हा भ्रमनिरास आहे. चीन समोर आला की पळे, असे म्हणत त्यांनी सौनिकांचा अपमान केला आहे. शूर सैनिकांना पळपुटे बोलले त्यांचा निषेध आहे. कोणताही शब्द मुख्यमंत्र्यांना अमित शाह यांनी दिला नव्हता, महाराष्ट्रातील एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही.

शरजील उस्मानीबद्दल मुख्यमंत्री काही बोलले नाहीत आणि ते हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. सावरकरांना समलैंगिक आणि देशद्रोही बोलणाऱ्या काँग्रेसबरोबर तुम्ही बसला आहेत. त्यांच्यामध्ये धमक असल्यास त्यांनी औरंगाबादचे नामकरण करून दाखवावे.

केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र सेनानी होते, मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकातील आणि निवडणुकीचे भाषण वाटत होते. एवढे सुमार मुख्यमंत्र्यांचे भाषण होते आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दल काहीच बोलले नाही, नुसते विरोधकांवर टीका करण्याचे काम त्यांनी केले. राज्य सरकारचा भ्रष्टाचार काढला तर आम्ही महाराष्ट्रद्रोही, असे या सरकारला वाटत आहे. 

अध्यक्षांवर दबाव टाकून आम्हाला बोलण्याची संधी दिली गेली नाही. बाबरी पाडण्यासाठी आम्ही होतो आणि राम मंदिरासाठी लोकांनी मदत केली तर त्यात यांचे पोट दुखत आहे. सत्तेकरिता त्यांनी सगळी सेटिंग केली आहे. लोकशाहीमध्ये आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही.

18:49 March 03

मुंबईवर सायबर हल्ला झाल्याचा सायबर विभागाचा अहवाल - नितीन राऊत

कोण काय म्हणाले

ऊर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले - 

४०० वॅट विद्युत पुरवठा खंडित.. चौकशीसाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरण, महाराष्ट्र विद्युत आयोगाची स्थापना केली होती. गृह विभागाच्या सायबर सेलकडे चौकशीसाठी दिल होते... १ मार्चला अहवाल.. महापरेषण क्लोझरच्या साहाय्याने सायबर हल्ला केला. युक्रेनमध्ये असा हल्ला झाला होता, त्या स्वरूपाचा हा हल्ला झाला.. ब्लॅकलिस्ट केलेल्या लोगिंग मधून हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत. ८ जीबीचा डाटा ट्रान्सजेक्शन करण्यात आले.

12 ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा हा खंडित झाला होता.. ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण होती.. महाराष्ट्र सायबर सेलद्वारे याची चौकशी करण्यात आली.. यात सायबर हल्ला झाला आहे.

15:50 March 03

महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली, आम्ही केले ते सर्व शून्य आहे, असे समजू नका.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले -  

  • महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली, आम्ही केले ते सर्व शून्य आहे, असे समजू नका.
  • आरे हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यावर विरोधकांनी आमच्याशी एकत्र येवून चर्चा व्हायला हवी, कदाचित आपल्या सर्वांना पुढे एकत्र काम करायचे आहे.
  • मेट्रोला स्थगिती दिली जाणार नाही, आरे कारशेड भविष्यात कमी पडू नये. राज्यात मोठी गुंतवणूक आणली.
  • शरजील उस्मानीला आम्ही अटक केल्याशिवाय राहणार नाही.
  • बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत (अमित शाहंनी) निर्लजपणे तुम्ही दिलेला शब्द तोडला. बाहेर जाऊन दुसरेच बोलले गेले.
  • बाबरी पाडली त्यावेळी येडीगबाळी पळून गेली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे होते. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये. काश्मिरातील पंडितांना त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.
  • देश ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही मी तो होऊ देणार नाही.
  • शेतकऱ्यांचाही हा देश आहे. त्यांच्या आंदोलन ठिकाणी तुम्ही खिळे टाकता, कुंपन घालता, सीमेवर हवे असणारे कुंपन शेतकऱ्यांच्या समोर घातले जाते. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका.
  • लसीकरणासाठी जास्तीत-जास्त रुग्णालये निवडली गेली पाहिजेत. लसीकरण वाढवण्याची गरज आहे, कोविन अ‌ॅपमध्ये गडबड आहे, मात्र त्यावरून केंद्रावर टीका करणे योग्य नाही. काही तरी नवीन करताना अशा समस्या येऊ शकतात.
  • कोरोनाची लाट रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीची यंत्रणा आता थोडी थकली आहे. टाळेबंदी नको असल्यास सर्वांनी मास्क, हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसुत्री वापरली पाहिजे.
  • संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदीची गरज आहे. आम्हाला व्यापाऱ्यांची चिंता आहे. कुणी मला विलन ठरवले तरी काही अवघड निर्णय घ्यावा लागेल. एखाद्या वर्गासाठी सर्व जनतेला त्रास देऊ शकत नाही. कोरोनावर कुणी राजकारण करू नका.
  • कोविड काळात जे काही केले, ते त्या-त्या वेळी लाईव्हवरून माहिती दिली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेतून मोठ्या प्रमाणात रुग्णांना सामावून घेतले आहे.
  • कोरोना रुग्णसंख्या अजिबात लपवली नाही, सर्व मृत्यूंची नोंद केली, बंद दारा आडही आम्ही कधी खोटे बोललो नाही.
  • कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी रेल्वे व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही केंद्राला आठ दिवसांपूर्वी मागणी केली होती. त्यानंतर टाळेबंदी लागली.
  • मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजून भारतरत्न का दिला गेला नाही
  • पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका.

15:17 March 03

चार-चार मंत्रालयांचा निर्णय खासगी व्यक्ती करतात - आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार काय म्हणाले - 

  • मंत्रालयतील विविध विभागांमध्ये काही खासगी लोकांकडून परस्पर निर्णय घेतले जातात. मंत्रालयांची नावे सांगून त्यातील महत्त्वाचे निर्णय कोण खासगी व्यक्ती घेतात, त्यांची नावे त्यांनी सभागृहात वाचून दाखवली.
  • कोल्हापूर, गडचिरोली इत्यादी ठिकाणी काही खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांकडून १४ ते १५ लाख रुपये बील आकारण्यात आले. कोल्हापुरात बील द्यायला वेळ केल्याने १० तास मृतदेह कुटुंबीयांना दिला नव्हता.
  • कोरोना काळात केवळ १ टक्के रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळाला, हे दुर्दैवी आहे.
  • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात इंडिया बुल नावाच्या एका कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस फ्रंटलाईन, आरोग्य कर्मचारी यांना देण्यापूर्वी दिली होती.
  •  

14:16 March 03

  • सरकारकडून महावितरणला २६ हजार कोटींचा सवलत निधी देण्यात आली आहे. मात्र फडणवीस सरकारच्या काळात ४१ हजार कोटी रुपये निधी देण्यात आली होती.
  • वैधानिक विकास मंडळे करा;  मुनगंटीवारांची मागणी
  • औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण कऱण्याची मागणी करत मुनगटीवारांचा गृहमंत्र्यांना टोला
  • औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करून, बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करा

14:04 March 03

  • विमानतळावर सरकारी कोरोना चाचणी केंद्र का नाही, खासगी लॅबला पैसे कमवून देण्यासाठी ही योजना राबवली का? - मुनगंटीवार
  • गोरगरिबांसाठी पॅकेज जाहीर करावा -मुनगंटीवार
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वारंगणांना पैसे वितरीत केले आहेत.

13:15 March 03

मुनगंटीवारांची सरकारवर टीका

  • बेईमानीच्या जोरावर हे सरकार आले आहे
  • हे सरकार म्हणजे लव्ह जिहादचा राजकीय योग आहे
  • एकाच झाडाला टमाटे आणि बटाटे पिकवू शकतात ती  बारामती काहीही करू शकते,
  • आरोग्य विभागाला एक रुपयांही वाढवून दिले नाहीत, शूर आम्ही सरदार आम्हाला कोरोनाची फक्त भीती

13:02 March 03

हे सरकार वांझोटे, उडाणटप्पू करंटेपणाचे आहे; मुनगंटीवारांची सडकून टीका

हे सरकार विधान परिषदेची इमारत चमकवायला पैसे आहेत. मात्र, जनतेच्या हितासाठी खर्च करायला पैसे नाहीत म्हणत असल्याची टीका केली.

13:00 March 03

संभाजी महारांजावरील बेगडी प्रेम गेले कुठे? विखेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाऱाष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही 

मात्र, त्रस्त जनता विचारते

संभाजी महारांजावरील बेगडी प्रेम गेले कुठे? 

असा सवाल विखे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

मराठा आऱक्षण, नोकर भरती, शेतकरी आत्महत्या, पूजा चव्हाण या प्रकऱणावरून विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.

12:52 March 03

कोरोनाच्या नावाने सरकार विकास कामांच्या निधीला कात्री लावत आहे- विखे पाटील

मुठभर विकासकांना फायदा होण्यासाठी रेडीरेकनर दर कमी केला असल्याचा आरोप विखे पाटील यांनी कैली. मुठभर राज्यकर्त्यांची घरे भरण्यासाठी राज्याची लूट करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केली.

12:48 March 03

मुख्यमंत्र्यांच्याच अंगात वारे भरले , विखे पाटलांची टीका

मुख्यमंत्री म्हणाले, की  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मात्र, मुख्यमंत्र्यांच्याच अंगात वारे भरले असल्याची टीका विखे पाटील यांनी  सभागृहात केली. २७०० शेतकऱ्यांनी का आत्महत्या केल्या ६४ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर केवळ १३ लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना मदत केल्याचे सांगत आहे. सरकारने मदत केली असेल तर २७०० शेतकऱ्यांनी का आत्महत्या केल्या, असा सवाल विखे पाटील यांनी सरकारला केला आहे.

12:48 March 03

सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले- विखे पाटील

कोरोना काळात बाजार समिती बंद करण्यात आल्या. त्यावेळी फळबागायत दारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा झाला. सरकारने शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पुसली. सरकारी खरेदी केंद्रावरून सरकारकडून खरेदी कऱण्यात आली नाही.  सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असा आरोप आमदार विखे पाटील यांनी केला.

12:12 March 03

राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल; सुधीर मुनगंटीवारांची मागणी

जळगाव येथील एका वसतिगृहातील मुलींना चौकशीला बौलावून पोलीस अधिकारी नग्न करून नाचविण्याचे काम करत असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका करत असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावर राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी आक्षेप घेत मुनंगटीवार धमक्या देत असल्याचे मत सभागृहात व्यक्त केले.

11:41 March 03

वृक्ष लागवडी संदर्भात ३१ मार्चपर्यंत चौकशी समिती स्थापन होणार - अजित पवार

समिती किती दिवसात होईल, आणि त्याचा अहवाल किती दिवसात येईल असा सवाल मुनगंटीवार यांनी केली होती. त्यावर 31मार्च 2021 पर्यंत समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ही समिती पुढील 4 महिने चौैकशी करेल. त्या कालावधीत त्यांना माहिती मिळण्य़ास अधिकचा वेळ म्हणून २ महिने वाढवून देण्यात येतील अशा प्रकारे ६ महिन्यात ती समिती अहवाल सादर करेल, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली. 

४ महिने आणि २ महिने अधिकचा काळ देण्यात येईल

11:34 March 03

मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मंत्र्यांचा विश्वास नाही का? फडणवीसांचा सवाल

वृक्ष लागवडीच्या प्रकरणात चौकशी समिती नेमणुकीचा निर्णय घेतला असता, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मंत्र्यांचा विश्वास नाही का? मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली जाते आहे का? असा सवाल केला. मुख्यमंत्री ठाकर यांनी ७५ टक्के वृक्ष जगले असल्याची माहिती दिली होती.  तोच धागा पकडून फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला.

11:28 March 03

33 कोटी वृक्ष लागवड : झाडे लागवडीची संयुक्त समितीकडून चौकशी होणार- दत्तात्रय भरणे

७५ टक्के झाडे जिवंत आहेत. बाबा आत्राम म्हणतात झाडेच नाहीत. गोरे म्हणतात की २४०० कोटी पे्क्षा जास्त निधी खर्च केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची संयुक्त समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली होती. त्यावर समितीकडून चौकशी करण्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली. 

वृक्ष जगवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचीही माहिती भरणे यांनी दिली.

11:27 March 03

राज्य सरकार झाडे जगविण्यासाठी उपाय योजना करणार, रोप वनांचीही चौकशी केली जाईल - भरणे

वृक्षलागवडीसाठी निधी खर्च झाला आहे. तर झाडे जगविण्यासाठी शासनाने किती निधी खर्च केला.. वन मजूर का कमी केली. त्या वनमजुरांना पुन्हा सेवेत घेऊन ती झाडे जगवणार का असा प्रश्न भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला असता, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या झाडांचे संवर्धन करण्यासाठी ३५२ कोटी निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती दिली

11:00 March 03

खासगी मालकांना फायदा व्हावा, यासाठी कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा घाट - शेलार

10:51 March 03

आज मी मोठा गौप्यस्फोट करणार; ज्याने महाराष्ट्राचे राजकारण हादरेल - प्रवीण दरेकर

आज मी मोठा गौप्यस्फोट करणार

संजय राठोड यांचा राजीनामा केवळ नाटक आहे. त्यांचा राजीनामा फ्रेममध्ये लावायचा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी  केली आहे. तसेच संजय राठोडचे राजीनामा नाट्य म्हणजे तु रडल्यासारखे कर आणि मी मारल्या सारखे करतो अले आहे. मात्र, ज्यावेळी राजीनामा राज्यपालांकडे सादर होईल, त्यावेळीच जनतेला विश्वास बसेल असेही दरेकर म्हणाले. तसेच आज सभागृहात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचेही दरेकर म्हणाले.

10:39 March 03

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शब्द न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्याचा विऱोधकांकडून धिक्कार

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ठाकरे सरकार हाय हाय.. अशा घोषणांनी विरोधकांनी सभागृह परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, अभिमन्यू पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी, आमदार उपस्थित होते  

10:39 March 03

कोकण मराठवाडा, विदर्भावर अन्याय कऱणाऱ्या ठाकरे सरकारचा  विरोधकांकडून धिक्कार 

10:39 March 03

सोयाबीनला भाव, निसर्ग चक्रीवादळात नुकसानीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, सरसकट पीक विमा न देणारे सरकार आणि शेतकऱ्यांवर अन्याय कऱणारे असल्याची टीका केली. सोयाबीन, धान, कापसाला मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धऱली.

10:39 March 03

मंत्र्यांला पाठिशी घातल्या प्रकरणी आरोप करत ठाकरे सरकारचा यावेळी विरोधकांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

10:39 March 03

तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा, वीज तोडणी थांबावी या मागणी करत विरोधकांनी सभागृहासमोर जोरदाऱ घोषणाबाजी केली.

10:38 March 03

यावेळी विरोधकांनी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

10:38 March 03

प्रामाणिक पणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहान न देणाऱ्या शेतकऱ्यांचा धिक्कार असल्याच्या घोषणाही यावेळी भाजपाने दिल्या

10:25 March 03

विधिमंडळाबाहेर विरोधकांची निदर्शने

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी विविध मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या सभागृहाबाहेर विरोधकांनी निदर्शने करायला सुरुवात केली आहे. 

09:30 March 03

विरोधक वाढीव वीज बिल आणि कोरोना प्रश्नावरून होणार आक्रमक

09:27 March 03

अर्णब गोस्वामींना विधिमंडळ समिती समोर हजर रहावे लागणार

अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला होता. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी विधिमंडळात गोस्वामी विरोधात हक्कभग प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला विधिमंडळ संमितीसमोर हजर राहण्यासंदर्भात समन्म बजावण्यात आले आहे. त्यानुसार अर्णब यांना आज विधिमंडळ समितीसमोर हजर रहावे लागणार आहे.  

08:52 March 03

LIVE UPDATES : शरजील उस्मानीला आम्ही अटक केल्याशिवाय राहणार नाही - आशिष शेलार

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी  राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणीवस यांनी अनेक मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वीजदर वाढ या प्रकरणावरून फडणवीस यांनी सभागृह दणाणून सोडले होते. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. 

Last Updated : Mar 3, 2021, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.