ETV Bharat / city

महा अर्थसंकल्प २०२१ : रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यात रस्ते व महामार्गासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

maharashtra-budget-on-road-development
महा अर्थसंकल्प २०२१ : रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा
author img

By

Published : Mar 8, 2021, 2:39 PM IST

Updated : Mar 8, 2021, 4:31 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यात रस्ते व महामार्गासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

रस्ते बांधकामासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद -

स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 44 टक्के काम जवळपास पूर्ण झाले असून 700 किलो मीटरपैकी 500 किलो मीटरचा मार्ग खुला होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच 1 मे पासून नागपूर-शिर्डी मार्ग सुरू होईल, असेही ते म्हणाले. तसेच परिवहन विभागासाठी 2 हजार 570 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामध्ये बस स्थानकांच्या विकासासाठी 1 हजार 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्प 2020-21 मध्ये रस्ते बांधकामासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये नांदेड-जालना 200 किमीचा नवा मार्ग, पुण्यात नवीन रिंगरोडसाठी 24 हजार कोटी, राज्यातील एकूण 5689 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. तसेच पूर्व दृतगती मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देण्यात येणार असून राज्यातील महत्त्वाच्या महामार्गावर मेगा ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच मुंबईत, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल चालवण्यासाठी विशेष मार्गीका तयार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. कोस्टल रोडचे काम 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

maharashtra-budget-on-road-development
रस्ते बांधकामासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद

समुद्री मार्गासाठी 9540 कोटींची तरतूद -

या अर्थसंकल्पात मुंबई गोवा सागरी महामार्गासाठी 9773 कोटी तसेच गोवा जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई ते ठाणे जलमार्गाच्या कामाच्या पहिला टप्प्य़ाचे काम सुरू झाले असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच डोंबिवली, मीरा भाईंदर कोलशेत या ठिकाणी जेटी उभारणार असल्याचेही ते म्हणाले. वांद्रे वरळी सागरी मार्ग हा शिवडी-न्हावा शेवा मार्गाला जोडणार असल्याचेही ते म्हणाले.

maharashtra-budget-on-road-development
समुद्री मार्गासाठी 9540 कोटींची तरतूद -

अमरावती विमानतळाचे काम प्रगतीपथावर -

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात नागपूर-वर्धा-भंडारा-नरखेडला जोडण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. तसेच नाशिक-नगर-पुणे दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार असल्याची माहितीही अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच नाशिक मेट्रोसाठी निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे- नाशिक रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटींची तरतूद करण्यात आली असून अहमदनगर-परळी-बीड रेल्वे मार्गाचे काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. अमरावती विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून पुण्याजवळ नवीन आंतराष्ट्रीय विमानतळ उभारणार येणार आहे.

maharashtra-budget-on-road-development
अमरावती विमानतळाचे काम प्रगतीपथावर -

हेही वाचा- महा अर्थसंकल्प २०२१-२२ :परदेशी गुंतवणूक आणि रोजगार निर्मीतीसाठी सरकार राहणार प्रयत्नशील

Last Updated : Mar 8, 2021, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.