ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING : नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून आठ जण ठार - heavy rainfall in mumbai

MAHARASHTRA BREAKING
MAHARASHTRA BREAKING
author img

By

Published : Jul 18, 2021, 6:47 AM IST

Updated : Jul 18, 2021, 7:19 PM IST

19:17 July 18

नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून आठ ठार

नंदुरबार - जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणारया सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतूक करणारी खाजगी क्रुजर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती मिळत असून जवळपास पंधराहुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.  स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्तांना दरीतून बाहेर काढण्यात येत आहे.  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

17:06 July 18

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार : खासदार प्रफुल्ल पटेल

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता  गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार असल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेलांनी आज  गोंदियात दिली. समृद्धी महामार्गाच्या  सर्व्हेला  लवकरच होणार सुरूवात होणार असून आता समृद्धी महामार्गामुळे गोंदिया - मुंबाई प्रवास सोपा  होणार आहे. 

17:05 July 18

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

मुंबई - चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

17:03 July 18

नैराश्यात गेल्यासारखी देवेंद्र फडणवीसांची वर्तवणूक, यशोमती ठाकुरांची टीका

अमरावती - मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच हे सरकार त्यांच्याच वजनाने कोसळेल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली होती. या टीकेला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले असून देवेंद्र फडणवीस हे सध्या नैराश्यात गेल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.ज्याप्रकारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत वर्तवणूक केली, ज्याप्रकारे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणप्रकरणी 'खोट बोल पण रेटून बोल' हा त्यांचा स्वभाव सातत्याने समोर येत आहे. या गोष्टी बघितल्यानंतर त्यांना नैराश्य आल्या सारखे वाटते, अशी बोचरी टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

14:56 July 18

आदित्य ठाकरे यांच्याकडून सूर्य नगरची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई  - शनिवारी 200 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला दोन वर्षापूर्वी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली गेली होती. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी कमी झाली. मृतांच्या नातेवाईकांना सीएम रिलीफ फंड आणि डिझास्टर मॅनेजमेंट कडून पाच लाखांची मदत दिली जाणार आहे.  यासोबत जखमींच्या उपचारांचा खर्च देखील उचलला जाईल, अशी माहिती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी आज विक्रोळी सुर्यनगर येथील दुर्घटनेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.

14:09 July 18

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विक्रोळी सूर्य नगर येथील घटनास्थळी दाखल

विक्रोळी सूर्या नगर इमारत दुर्घटनेत 5जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळास भेट दिली.

राजेवाडी रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार चौघा मृतांची नावे

1) अंकीत रामनाथ तिवारी (23 पुरूष)

2) रामनाथ राजनारायण तिवारी (4.5 वय) 

) आशिष  विश्वाकर्मा  (19 वय पुरुष)

4) प्रिन्स हंसराज विश्वकर्मा  18 वय पुरुष 

महात्मा फुले रुग्णालय

5) सावित्रीबाई रामनाथ तिवारी(16 वय महिला)

14:08 July 18

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल येथील घरातून ईडीची टीम नागपूरकडे रवाना

नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरातून ईडीची टीम बाहेर निघाली. चार गाड्यांमधून आले होते अधिकारी, घराचा सर्च केल्यानंतर टीम नागपूरच्या दिशेने परत निघाली

14:05 July 18

जिल्हा आपत्कालिन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयानं काम करावं - अजित पवार

मुंबईतील चेंबूर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील. दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ, अग्निशमन दल, महापालिका, पोलीस आदी यंत्रणांतर्फे तत्काळ बचाव व मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. अनेकांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. मुंबई शहर व राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालिन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयानं काम करावं.नागरिकांनी सुरक्षाविषयक नियम व संदेशांचं पालन करावं. आपत्कालिन परिस्थितीत तत्काळ पोलीस वा नजिकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

14:04 July 18

पावसाळ्यापूर्वी दिल्या होत्या नोटीस - बीएमसी

मुंबई - विक्रोळी सुर्यनगर येथील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखविली आहेत .ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ती कलेक्टर लँड होती आणि या परिसरातील संरक्षक भिंती या तात्काळ दुरुस्त कराव्यात या संदर्भातला पत्रव्यवहार देखील कलेक्टरकडे करण्यात आला होता. परंतु पावसाचे प्रमाण कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की त्यामुळे ही दुर्घटना घडली. या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी नोटिसा देखील देण्यात आल्या असल्याचं मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली 

12:55 July 18

घर आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या ३ घटनेत २१ जणांचा मृत्यू

  • मुंबईत रात्रीपासून पडणाऱ्या पावसादरम्यान 21 जणांंचा मृत्यू झाल्याची मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. 

    चेंबूर वाशी नाका येथे 15
    विक्रोळी सूर्या नगर येथे 5
    मुलुंड येथे 1
    असे एकूण 21 मृत्यू

12:55 July 18

शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते एनडीएमध्ये आले तर एनडीए आणखी मजबूत होईल - केंद्रीय मंत्री आठवले

शनिवारी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. शरद पवार यांच्या समर्थनामुळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मात्र, भाजपासोबत युती करण्यात काही अडचण नाही. जर शरद पवार याच्यासारखे मोठे नेते एनडीएमध्ये आले तर एनडीए आणखी मजबूत होईल - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

12:28 July 18

मुंबईतील दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे त्यांनी जाहीर केले. आजही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरू ठेवावे, मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे. अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

12:27 July 18

सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळात गोंधळ आहे- चंद्रकांत पाटील

19 जुलै पासून सुरू होणाऱ्या सांसद पार्श्वभूमीवर मोदी-पवार भेट. झाली आहे, दुसरं कोणतंही कारण नाही. मात्र सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळात गोंधळ आहे, कधी मोदी-उद्धव भेटतात, तर कधी मोदी-पवार भेटतात. नेमकं काय सुरू आहे सध्या हा माझाही गोंधळ झालाय, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी पवार मोदी भेटीवर दिली आहे.

12:25 July 18

शहरात गर्दी वाढली, लोकांनीही वाट्टेल तिथे घरं बांधली - चंद्कांत पाटील

मुंबईतील दुर्घटनेवर बोलताना चंद्रकात म्हणाले की, शहरात गर्दी वाढली, लोकांनीही वाट्टेल तिथे घरं बांधली आहेत. पालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन आणी नागरिक दोघांनीही जागरूक असावे.

12:22 July 18

मनसे सोबत युतीची चर्चा नाही, चंद्रकांत पाटालांचे स्पष्टीकरण

 नाशिक - आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची आज नाशकात भेट झाली. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की,  मनसे सोबत युती चर्चा नाही. कोणताही निर्णय मात्र पक्ष मंथन करून घेतो. सध्या तरी कोणालाही सोबत घेण्याचा विचार नाही. राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर नक्कीच स्वागत. तर आम्ही सोबत येऊ शकतो, असे सूचक विधानही पाटील यांनी केले. तसेच माझ्या भूमिकेचा विपर्यास केला जातो असं राज ठाकरे मला बोलले, असल्याचे पाटील म्हणाले.

12:21 July 18

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली चेंबूर दुर्घटनास्थळास भेट

12:21 July 18

मुंबईत एकूण 24 जणांचा मृत्यू

मुलुंडमध्येही घराची भिंत कोसळून एका १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू  

पहाटेची घटना  

*मुंबईत रात्रीपासून पडणाऱ्या पावसादरम्यान घर आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या ३ घटनेत २१ जणांचा मृत्यू*

वाशी नाका येथे १७

विक्रोळी सुर्या नगर येथे 6  

मुलुंड येथे १  

असे एकूण २१ मृत्यू

12:10 July 18

पालघर - जिल्ह्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग

पालघर -   जिल्ह्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग . पालघर , बोईसर , डहाणू परिसरात दमदार पावसाची हजेरी . अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ.  

बोईसर- मानसह डहाणू तही अनेक सखल भागात पाणी साचले. पहाटेपासून काही प्रमाणात पावसाची विश्रांती

12:07 July 18

चेंबूर घटनेतील मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला शोक

मुंबईतील दरड कोसळून एकूण 21 जणांचा मृत्यू झाला. त्या घटनेवर अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. 

11:54 July 18

भांडूपमध्ये भिंत कोसळून 16 वर्षीय मुलगा ठार, अंधेरीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

मुंबई - चेंबुर विक्रोळीतील घटने पाठोपाठ भांडूपमध्ये देखील भिंत कोसळून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच अंधेरीत एका व्यक्तीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशानाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.

11:09 July 18

चेंबूरमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला

चेंबूरमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे, तर यातील 2 जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने याबाबातची माहिती दिली आहे. 

10:51 July 18

चेंबूर दुर्घटेनेतील मृतांच्या वारसांना केंद्र सरकारडून 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत

प्रमुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी मध्ये मुसळधापर पावसामुळे घडललेल्या दुर्घटनेतील मृत्यू बाबत पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच घटनेती मृताच्या कुटुंबीयांना PMNRF मधून दोन लाख रुपये आणि  जखमींना 50,000 मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली.

10:47 July 18

चेंबुर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर, राष्टपतींनी व्यक्त केले दुख

मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी मध्ये मुसळधापर पावसामुळे  घडललेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. मी मृतांच्या नातेवाईकाच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

10:04 July 18

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मधील घरावर ईडीचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांंच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील घरावर ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉड्ररिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. नुकतीच ईडीने देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे.

10:01 July 18

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा एनडीआरएफच्या तीन तुकड्या पुण्यातून मुंबईत दाखल

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून नारंगी रंगाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी पुण्यातून एनडीआरएफच्या तीन पथकांना मुंबईत दाखल करण्यात आलं आहे. 

09:22 July 18

मुंबईतील पावसामुळे 17 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेने जवळपास 17 गाड्या रद्द केल्या आहेत. मुंबईतील विविध स्थानकातील रेल्वे रुळावर पाणी असल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे पाणी उपसण्यासाठी सर्व पंप सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

09:21 July 18

मुंबई शहरात 176.96 मिलिमीटर पावसाची नोंद

मुंबई-  मुंबईत काल रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला

शनिवारी सकाळी 8 ते आज रविवारी सकाळी 8 या 24 तासात पडलेला पाऊस खालील प्रमाणे  

  • मुंबई शहरात 176.96 मिलिमीटर
  • पश्चिम उपनगरात 195.48 मिलिमीटर
  • पूर्व उपनगरात 204.07 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद

09:16 July 18

मुंबईला पाणी पुरवठा करणारे तुळसी विहार तलाव ओव्हर फ्लो

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुबई शहराला पाणी पुरवठा करणारे तुळसी विहार तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. आधी तुळसी तलाव ओसंडून वाहू लागला त्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून विहार तलावातून पाणी वाहायला सुरूवात झाली आहे

09:06 July 18

सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजयजी राऊत, चित्रा वाघांचा हल्ला

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.  सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय जी राऊत अशी उपमा देत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

'संजय राऊत य़ांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे, असा जावईशोध लावला आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात, अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो, हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही. कारण हा विषय खूप मोठा आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

08:55 July 18

चेंबुर दुर्घटनेत मृतांचा आकडा 12 वर, अद्याप बचाव कार्य सुरू

चेंबूर येथील न्यू भारत नगरात भूस्खलन होऊन काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. सकाळी एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू केल्यानंतर 11 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, ढिगाऱ्याखाली आणखी 6 ते 7 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यातील आता एक जणाचा मृतदेह हाती लागला आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

08:46 July 18

विक्रोळी दुर्घटना : येथील दुमजली इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत 3 मृतदेह हातीच 6 जण अडकल्याची भीती

बिक्रोळी येथे दुमजली इमरात कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. यामध्ये एनडीआरएफच्या पथकाला सकाळी 8.30 पर्यंत 3 मृतदेह हाती लागले आहेत. तर आणखी 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता बचाव पथकाकडून व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफचे उप कंमाडंट आशिष कुमार यांनी याबाबतची माहिती दिली.

08:36 July 18

ठाण्यात तरुणाने मारली डॉ. आंबेडकर रोड नाल्यात उडी, पाण्यात गेला वाहुन

ठाण्यात जीवन ओवाळ नावाच्या तरुणाने दारूच्या नशेत असताना डॉ. आंबेडकर रोड येथील नाल्यात उडी मारली आहे.  पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहुन गेल्याची घटना घडली आहे. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

08:31 July 18

मनसेने तोडले मनपा आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन

औरंगाबाद - औरंगाबाद शहराला 3 ते 5 दिवसाने पाणी सोडत असल्याने मनसेने मनपा प्रशासकांचे नळ कनेक्शन तोडण्याचा प्रकार केला आहे.  यावेळी मनसेैनिकांनी थेट मनपा आयुक्तांच्या बंगल्याचे कनेक्शऩ तोडले. 2 दिवसाआड पाणी न सोडल्यास नळ कनेक्शन तोडण्याचा मनसेने इशारा यापूर्वीच दिला होता. मात्र मागणीचा विचार न झाल्याने मनसैनिकांनी कटर मशीनच्या साहाय्याने मनपा प्रशासकांचे नळाचे लोखंडी पाईप कापून कनेक्शन कट केले आहेत.

08:24 July 18

मुंबईतील गांधी मार्केट जलमय, जनजीवन विस्कळीत

08:19 July 18

मुंबईच्या विक्रोळीमध्ये दुमजली इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू

विक्रोळीत दुमजली घऱ कोसळले
विक्रोळीत दुमजली घऱ कोसळले

मुंबईच्या विक्रोळीमधील सूर्यानगरात रविवार सकाळच्या सुमारास एक दुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबईत काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसादरम्यान वाशी नाका चेंबूर व विक्रोळी सुर्या नगर येथे डोंगरावर असलेल्या झोपड्या कोसळून 11 जणांचा मृत्यू,

  • विक्रोळी सूर्या नगर येथील डोंगरावर असलेल्या 4 ते 5 झोपड्या कोसळल्या
  • जखमींपैकी 3 जणांना राजावाडी रुग्णालयात पाठवले असता त्यांचा मृत्यू झाला
  • तर 2 जणांना बाजूच्या रुग्णालयात पाठवले आहे
  • एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू

07:48 July 18

चेंबूर दुर्घटना , एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू, मृतांची संख्या 12 वर

चेंबुरमध्ये भिंत कोसळून 11 जण ठार
चेंबुरमध्ये भिंत कोसळून 11 जण ठार

वाशी नका, चेंबूर येथील झाड कोसळून सुरक्षा भिंत घरावर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू.. 2 जणांना उपचार करून घरी सोडले

07:35 July 18

चेंबुरमध्ये भिंत कोसळून 11 जण ठार

चेंबुरमध्ये भिंत कोसळून 11 जण ठार
चेंबुरमध्ये भिंत कोसळून 11 जण ठार

मुंबई - शहर व उपनगरात पहाटेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे भूस्खलन होऊन चेंबूर येथील भारतनगरातील एक झाड भिंतीवर कोसळले त्यानंतर ती भिंत 4 ते 5 झोपड्यांवर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 11 जणांचा बळी गेला आहे. या ठिकाणी एनडीआरएफ कडून बचाब कार्य सुरू करण्यात आले आहे. याबाबत एएनआय या वृत्त संस्थेने माहिती दिली आहे.

वाशी नाका न्यु भारत नगर येथील 4 ते 5 घरे कोसळली

- मुंबई महापालिका, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ ने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढून राजावाडी रुग्णालयात पाठवले असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

- 8 जणांचा मृत्यू,  

2 जणांवर ओपीडीत उपचार

07:01 July 18

सायनमध्ये रेल्वे रुळावर पाणी, मुंबईच्या लाईफलाईनची सेवा ठप्प

सायनमध्ये रेल्वे रुळावर पाणी
सायनमध्ये रेल्वे रुळावर पाणी

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वेची सेवा प्रभावित झाली आहे. मध्य रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी असल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे.

06:19 July 18

शरद पवारांसारखे मोठे नेते एनडीएत आल्यास एनडीए आणखी मजबूत होईल - रामदास आठवले

मुंबई- शहर आणि उपनगरात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बोरवली, भांडूप, सायन, वसई विरार, नवी मुंबई परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी भरले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.  दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट, किनारपट्टी भागात 18 ते 21 जून या चार दिवसात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. 

Last Updated : Jul 18, 2021, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.