ETV Bharat / city

Breaking News सोनाली फोगटच्या कुटुंबियांनी घेतली हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट - ब्रेकिंग न्यूज

Breaking news
Breaking news
author img

By

Published : Aug 27, 2022, 7:02 AM IST

Updated : Aug 27, 2022, 10:45 PM IST

22:44 August 27

सोनाली फोगटच्या कुटुंबियांनी घेतली हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट

सोनाली फोगटच्या कुटुंबियांनी घेतली हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची चंदीगड येथे भेट घेतली.

20:30 August 27

आयकर अधिकारी म्हणून लोकांच्या घरांवर टाकले फेक छापे; चौघे अटकेत

  • #WATCH | We busted a gang of criminals who would raid people's houses posing as Income Tax officers and got away with the money they got. While 4 have been arrested, we are on the lookout for 4 more: Mumbai Police

    (CCTV footage from a fake raid on July 26) pic.twitter.com/NrXh7evZS5

    — ANI (@ANI) August 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयकर अधिकारी म्हणून लोकांच्या घरांवर छापे टाकणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील ४ जणांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी ४ जणांचा शोध घेत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

19:22 August 27

सावंतवाडी येथील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी येथील झाराप पत्रादेवी बायपासवर झालेल्या अपघातात झायलो कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात दोन जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना या रुग्णवाहिकेने पेट घेतल्याची घटना घडली आहे. बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात दोघेजण जागीच ठार तर इतर जखमी झाले.

19:06 August 27

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करा; कुटुंबियांची मागणी

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करा, अशी मागणी सोनालीचा भाऊ कुलदीप फोगट याने हरियाणाचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

17:20 August 27

आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू

पुणे आर्थिक गैरव्यवहार करणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही सध्या कारागृहात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात आहेत.त्यातच आता ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे देखील आल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.

16:43 August 27

रिसॉर्ट पाडण्यास सुरूवात, समाधान झाल्याने प्रतिकात्मक हातोडा मुरुड ग्रामपंचायतला देतो, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांनी आम्हाला वेळापत्रक दिला आहे. रिसॉर्ट पाडण्यासाठी जो खर्च होणार आहेत त्याची तरतूद महाराष्ट्र सरकार करत आहे. याबाबत दंड करण्यात येणार आहे तो सुद्धा परब यांच्याकडून वसूल केला जाणार आहे.. माझे समाधान झालं असल्याकारणाने हा प्रतीकात्मक हातोडा मी मुरुड ग्रामपंचायतमध्ये देत आहे, असे किरीट सौमय्या यावेळी म्हणाले.

16:01 August 27

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी दोन आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी

गोवा - सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी दोन आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

12:50 August 27

फोगाट प्रकरणी दोन आरोपींची कोर्टात हजेरी

फोगाट प्रकरणी दोन आरोपींची कोर्टात हजेरी. गोवा पोलिसांनी कोर्टात केले हजर

10:18 August 27

गोवा पोलीस सोनाली फोगटच्या नातेवाईकांची चौकशी करणार

पणजी सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात आता गोवा पोलीस हरियाणात जाऊन सोनाली फोगटच्या नातेवाईकांची चौकशी करणार.

09:49 August 27

गेल्या 24 तासांत 9,520 नवीन कोविड रुग्ण

कोरोना अपडेट भारतात गेल्या 24 तासांत 9,520 नवीन कोविड रुग्ण नोंद झाले आणि 12,875 बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 87,311 झाली आहे.

07:50 August 27

अंधेरी रेल्वे स्थानकावर अचानक लिफ्ट मध्ये बिघाड

मुंबई मुंबईतील पश्चिम उपनगराच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर काल अचानक लिफ्ट मध्ये बिघाड झाला. या लिफ्टमध्ये 18 प्रवासी अडकले होते. लिफ्ट चालू झाल्यानंतर अचानक बंद झाली. परिणामी नागरिकांचा जीव गुदमरू लागला. मात्र तातडीने रेल्वे सुरक्षा बल व इलेक्ट्रिकल कर्मचारी यांनी या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.

07:16 August 27

कराड 6 लाख रूपये किंमतीचे 12 तोळ्याचे दागिने लंपास

कराड एकट्या महिलेला भावनिक बोलण्यात गुंगवून दोन भामट्यांनी 6 लाख रूपये किंमतीचे 12 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी कराडमधील गजबजलेल्या वस्तीत घडली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सुभद्रा रोकडे रा. अशोक चौक, कराड या महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

06:55 August 27

Breaking news खंजरने वार करीत पावणे दोन लाख रुपये लुटले

नांदेड जिल्ह्यात अर्धापूरमध्ये धारदार खंजरचा वार करत एका पेट्रोल पंप मालकास गंभीर जखमी केले. त्याच्याजवळील सुमारे पावणे दोन लाख रुपये लुटण्यात आल्याची घटना नांदेड अर्धापूर रोडवर घडली आहे. यावेळी नगदी रकमेसह मोबाईल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Aug 27, 2022, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.