ETV Bharat / city

Breaking Live Page : लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतांवर काँग्रेसकडून आक्षेप; गुप्तता भंग केल्याचा आरोप - महाराष्ट्र अपडेट न्यूज

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jun 20, 2022, 6:35 AM IST

Updated : Jun 20, 2022, 4:21 PM IST

16:19 June 20

भाजपच्या दोन मतांवर काँग्रेसकडून आक्षेप; गुप्तता भंग केल्याचा आरोप

लक्ष्मण जगताप यांनी दुसऱ्याच्या मदतीने मतपेटीत मत टाकल्याचा आरोप

जगताप यांनी मतदान करताना गुप्तता भंग केल्याचा आरोप

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी गुप्तता भंग केल्याचा आरोप

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली तक्रार

14:58 June 20

एकाचवेळी 9 जणांचा मृत्यू; म्हैसाळ येथील घटना, आत्महत्या असल्याची चर्चा

सांगली - मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कुटुंबातील 9 जणांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. मात्र, नेमके कोणत्या कारणातून हा मृत्यू झाला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विषबाधेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर ही आत्महत्या असल्याची चर्चा सुरू आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. तर नेमके या 9 जणांचे मृत्युचे कारण समोर येईल असे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे.

14:53 June 20

परवानगी दिल्यास आता मतदान करणे शक्य होईल का?; सर्वोच्च न्यायालयाचा मलिक, देशमुखांना सवाल

परवानगी दिल्यास आता मतदान करणे शक्य होईल का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक, अनिल देशमुख यांना विचारला आहे.

13:56 June 20

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

  • Karnataka | Prime Minister Narendra Modi unveils a statue of Dr BR Ambedkar at Dr BR Ambedkar School of Economics (BASE) in Bengaluru. He will also inaugurate a new campus of BASE University. pic.twitter.com/U5CwQGYWdh

    — ANI (@ANI) June 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनिमिक्समध्ये डॉ. बाबासाहेब पुतळ्याचे अनावरण केले आहे.

13:22 June 20

महाविकास आघाडीमधील पक्षांनी अंतिम क्षणी ठरविला कोटा, आखली खास रणनीती

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने गुप्तता पाळत आपल्या उमेदवारांचा कोटा अंतिम क्षणी ठरवला. काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांसाठी 29 चा कोटा केला. राष्ट्रवादीने 30 तर सेनेने सर्वाधिक 31चा कोटा ठेवला आहे. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी हा उमेदवार निवडीसाठी कोटा ठरवला. विधान परिषदेत सहाही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही रणनीती महाविकास आघाडीने अंतिम क्षणी केली आहे.

13:07 June 20

मुंबईत मुसळधार पाऊसस, समुद्राला उधणाची भरती; दादर परिसरात चौपाटीवरची दुकानांत पाणी

मुंबई - मुंबईत आज सकाळपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेला हा पाऊस आज सोमवारीदेखील सुरू आहे. दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत समुद्रालादेखील उधाण आले आहे. अशा परिस्थितीत पावसाची संततधार सुरू राहिल्यास अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची स्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

13:02 June 20

100 कोटी कथित वसुली प्रकरण : अनिल देशमुख त्यांच्यासह इतर दोन आरोपींच्या डिफॉल्ट जामिनावर उद्या सुनावणी

अनिल देशमुख
अनिल देशमुख

मुंबई- 100 कोटी कथित वसुली प्रकरण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डिफॉल्ट जामिनावर आज सुनावणी होणार होती. मात्र आज सुनावणी झालेली नाही. अनिल देशमुख, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी आहे. सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेले आरोप पत्र अपूर्ण असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.

11:59 June 20

अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलनाचा फटका, १८१ एक्सप्रेस आणि ३४८ पॅसेंजर रेल्वे रद्द

  • Due to agitation over the Agnipath scheme, 181 Mail Express cancelled and 348 passenger trains cancelled. Partially cancelled are 4 Mail Express and 6 passenger trains. No diverted trains: Ministry of Railways

नवी दिल्ली- अग्नीपथ योजनेमुळे देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत. रेल्वेने नुकसान टाळण्याकरिता १८१ एक्सप्रेस रेल्वे आणि ३४८ पॅसेजंर रद्द केल्या आहेत. ही माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

11:38 June 20

आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना

आमदार लक्ष्मण जगताप
आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी-चिंचवड- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे मुंबई च्या दिशेने रवाना झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ते मुंबईत दाखल होतील. तिथं मतदान करून पुन्हा निवासस्थानी परततील. जगताप हे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. राज्यसभेला देखील जगताप यांनी रुग्णवाहिकेतून जाऊन मतदान केलं होते. भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजयाच श्रेय आमदार लक्ष्मण जगताप यांना दिलं होते.

09:21 June 20

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार प्रस्थान

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी

देहू( पिंपरी)- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी पालखी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्याला दाखल झाले आहेत. राज्यभरातून वारकरी देहूत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय देहू संस्थांकडून पालखीची संपूर्ण तयारीदेखील करण्यात आली आहे.

08:38 June 20

वॉशिंग्टन डीसीमध्ये संगीत कार्यक्रमादरम्यान गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक लोक जखमी

  • Metropolitan Police Department is responding to the area of 14th and U Street, NW, for a shooting incident in which multiple people have been shot, including an MPD officer. Media staging at 15th and U Street, NW: DC Police Department pic.twitter.com/WafE7kVNJw

न्यूयॉर्क-वॉशिंग्टन डीसीमध्ये एका संगीत कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या लागल्या आहेत.

08:33 June 20

जम्मू-काश्मीर: पुलवामा-कुपवाडा चकमकीत चार दहशतवादी ठार

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात सोमवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. याआधी रविवारी रात्री झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. अशाप्रकारे गेल्या २४ तासांत एकूण चार दहशतवादी ठार झाले.

06:54 June 20

अग्नीवीरमधील तरुणांकरिता आनंद महिंद्रांनी केली महत्त्वाची घोषणा, म्हणाले मी हिंसाचाराने दु:खी...

  • Saddened by the violence around the #Agneepath program. When the scheme was mooted last year I stated-& I repeat-the discipline & skills Agniveers gain will make them eminently employable. The Mahindra Group welcomes the opportunity to recruit such trained, capable young people

    — anand mahindra (@anandmahindra) June 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई- अग्नीपथ योजनेनंतर वादंग निर्माण झाले असताना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटले, की अग्नीपथ योजनेच्या घोषणेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे दु:खी झालो आहे. अग्नीवीरमधील प्रशिक्षित आणि कार्यक्षम तरुणांना नोकऱ्या देऊन महिंद्रा ग्रुप त्यांचे स्वागत करणार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

06:27 June 20

सातारा - आंबेनळी घाट सोमवारी (दि. १९) सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. महाबळेश्वर-पोलादपुर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता व कुंभरोशी येथून पारफाटा ते देवळी हा रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ( महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज या पेजवर दिवसभरात अपडेट होतात )

Last Updated : Jun 20, 2022, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.