ETV Bharat / city

Maharashtra Breaking News Live Page; राहुल गांधी सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स - राहु गांधी

Maharashtra Breaking News Live Page 1 June 2022

author img

By

Published : Jun 1, 2022, 9:18 AM IST

Updated : Jun 1, 2022, 2:01 PM IST

13:59 June 01

राहुल गांधी सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात समन्स बजावले, जे 2015 च्या आधी तपास यंत्रणेने बंद केले होते.

13:35 June 01

भाजप व पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर - भाजप व पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महविकास आघाडी विरोधात मोर्चा काढण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मोर्चात प्रामुख्याने सहभागी होते. पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

12:35 June 01

माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेनी विशेष सीबीआय कोर्टात अर्ज

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणी माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेनी विशेष सीबीआय कोर्टात अर्ज केली आहे. सचिन वाझेंच्या या याचिकेला सहआरोपी कुंदन शिंदे यांच्यावतीनं कोर्टात विरोध करण्यात आला. कुंदन शिंदे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे खासगी सहाय्यक आहेत. कुंदन शिंदे यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास विशेष सीबाआय कोर्टाने नकार दिला आहे.

11:56 June 01

प्रमुख विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ

मुंबई - सरकारने मंगळवारी आपल्या प्रमुख विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ केली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी हे केले गेले. PMJJBY चा प्रीमियम दर प्रतिदिन रु.1.25 इतका वाढवला आहे. अशाप्रकारे तो वार्षिक 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे.

10:31 June 01

पहिल्या विद्युत प्रणालीवरील बसचे लोकार्पण

पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या पहिल्या विद्युत प्रणालीवरील बसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटनही यावेळी करण्यात येईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित आहेत.

09:11 June 01

Maharashtra Breaking News Live Page 1 June 2022; भाजप नेते मोहित कंबोजविरोधात गुन्हा दाखल

मुंबई - भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा दाखल केला. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप आहे. कंबोज यांनी स्वतः ट्वीट करून त्यांच्याविरोधात आरोपी फेटाळले आहेत.

Last Updated : Jun 1, 2022, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.