ठाणे : शेजारी राहणाऱ्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय बनसोडे (वय 45 ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
Breaking News Live : मुंबई विमानतळ उद्या सहा तास राहणार बंद; सकाळी 11 ते 5 यावेळ सेवा बंद
21:49 October 17
कल्याणात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाला ठोकल्या बेड्या
21:48 October 17
मुंबई विमानतळ उद्या सहा तास राहणार बंद; सकाळी 11 ते 5 यावेळ सेवा बंद
मुंबई विमानतळ उद्या सहा तास बंद राहणार आहे. मेन्टेनेन्सेच काम असल्यामळे हे विमानतळ उद्या सहा तास बंद असणार आहे. सकाळी 11 ते 5 यावेळ सेवा बंद राहणार आहे.
20:46 October 17
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर मेट्रोच्या अश्विनी भिडे यांना राग अनावर
मुंबई - मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जात आहे. गिरगाव येथे मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. यासाठी मंगळावरी मोर्चा काढला जाणार असून मेट्रोचे काम बंद केले जाणार आहे. याबाबतचा प्रश्न "ई टीव्ही भारत"च्या पत्रकाराने विचारताच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मेट्रो ३ च्या प्रमुख अश्विनी भिडे यांना राग अनावर झाला. मेट्रोचे प्रश्न पालिकेत विचारू नका असे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेत गुंडाळून निघून गेल्या.
20:46 October 17
आठ लाख 71 हजार 960 रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा कोंढवा येथे छापा टाकुन जप्त
पुणे:- अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडून पुण्यातील कोंढवा येथील येवलेवाडी येथे ८आठ लाख 71 हजार 960 रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा छापा टाकून जप्त करण्यात आलं आहे.
19:21 October 17
अंधेरी मरोळ नाक्यावरील बजरंग पेट्रोल पंपमधील कार्यालयाला आग
मुंबई - अंधेरी मरोळ नाका येथील बजरंग पेट्रोल पंपमधील कार्यालयाला आग. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना. कोणीही जखमी नसल्याची माहिती.
19:09 October 17
ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप नंबर वन, बावनकुळे यांचा दावा
नागपूर - राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर वन पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले.
18:43 October 17
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगेंना लाच घेताना रंगेहाथ अटक
दौंड - दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे हे लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात सापडले आहेत. डॉक्टर बरोबरच एका शिपायालाही लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
18:24 October 17
ज्वेलरी दुकानाच्या मालकाने कर्मचार्यांना दिवाळी भेट म्हणून दिल्या कार आणि बाईक भेट
चेन्नई - तामिळनाडूत एका ज्वेलरी दुकानाच्या मालकाने आपल्या कर्मचार्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक भेट दिल्यात. या कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत सर्व चढ-उतारांमधून काम केले आहे. हे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. आम्ही 10 जणांना कार आणि 20 जणांना बाईक भेट देत आहोत असे ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल यांनी सांगितले.
17:14 October 17
नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत सत्तांतर, भाजपाच्या सुप्रिया गावित झाल्या अध्यक्ष
नंदुरबार - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. भाजपाच्या सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. काँग्रेस बंडखोर सुहास नाईक उपाध्यक्षपदी निवड झाले. भाजपा उमेदवारांना ३१ तर काँग्रेस उमेदवारांना २५ मते मिळाली. शिवसेना उध्दव गटाने भाजपला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या बंडोखोर ४ सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. व्हीप डावलून पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या सदस्यावर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून दिली आहे.
17:04 October 17
महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांचा आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव - एरंडोल तहसील कार्यालयाबाहेर उत्रान येथील महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेताना पोलिसांसोबत झटापट झाली. नजीक असलेल्या गिरणा नदी मधून अवैध वाळू वाहतूक विरोधात सरपंच शारदा भागवत पाटील यांनी आपले पती व कुटुंबीयांसमवेत केला आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे राज्यभरात ग्रामपंचायतचे निकाल सुरू असताना एरंडोलमध्ये मात्र सरपंचावर आत्मदहनाची वेळ आली. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर ग्रामस्थांसह व आपल्या कुटुबियांसमवेत सरपंच शारदा पाटील यांनी तहसील कार्यालयात दाखल होत केला आत्मदहनाचा प्रयत्न.
16:51 October 17
अंधेरी निवडणूक बिनविरोध होईल असे आताच म्हणता येणार नाही - शरद पवार
मुंबई - भाजपने निवडणुकीतून माघार घेऊन योग्य निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिवसेना भाजपमधील संघर्षाला तात्पुरता पूर्णविराम मिळाला असे म्हणावे लागले. मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल असे आताच म्हणता येणार नाही असेही पवारांनी स्पष्ट केले.
16:27 October 17
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान संपले
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान संपले. आता उत्सुकता निकालाची आहे. खरगे आणि थरुर यांच्यात निवडणूक झाली आहे.
16:22 October 17
काँग्रेस शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंना भारत जोडो यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी भेटणार
मुंबई - काँग्रेस शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना पाच वाजता मातोश्री येथे भेटणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात महाराष्ट्रात येत आहे. त्यासाठी त्यांना निमंत्रण देणार आहे. काँग्रेस नेते एच के पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण ठाकरेंना भेटणार आहेत. सायंकळी साडेसहा वाजता शरद पवार यांनाही ते भेटणार आहेत.
16:17 October 17
अंबरनाथ लापसिया हॉस्पिटल दरोडा प्रकरणातील 9 आरोपींना बेड्या
मुंबई - अंबरनाथ लापसिया हॉस्पिटल दरोडा प्रकरणातील आरोपींना बेड्या. हॉस्पिटलमधील महिला लॅब टेक्निशियन सहित एकूण ९ जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये दोन ज्वेलर्सचाही समावेश आहे. पोलिसांकडून ६४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
15:43 October 17
नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राचार्यांविरोधात उपोषण
सोलापूर - सोलापूर शासकीय रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राचार्याविरोधात उपोषण सुरू केले आहे. प्राचार्यांची बदली करा, ते आमच्या, वैयक्तिक आयुष्यात दखल देत आहेत. आम्हाला ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. प्राचार्या मनीषा शिंदे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करा, अन्यथा त्यांची बदली करा अशी मागणी करत नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे.
15:18 October 17
अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे हे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण
मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकमध्ये सुरू असलेल्या आखाड्यातून अखेर भाजपने माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे खरतर भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. या निवडणुकीसाठी सुरू असलेले डावपेच ज्यामध्ये ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने कोर्टात जावे लागणे, हा सर्व प्रकार अत्यंत क्लेषदायक व वेदनादायक होता. यासोबतच पक्षाचे चिन्ह गोठवणे, नाव गोठवणे हा प्रकारही या निवडणुकीसाठीच करण्यात आला, असेही ते म्हणाले.
15:02 October 17
कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाने सरपंचपदाचे खाते उघडले
सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी धुरे विजयी झाल्यात. भुदरगड तालुक्यातील फये गावात शिंदे गटाची सत्ता आली. 7 पैकी 3 जागा शिंदे आणि भाजप गटाने जिंकल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या. मात्र सरपंच शिंदे आणि भाजप गटाचा झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गट-भाजप यांच्यात झाली होती लढत.
14:56 October 17
'भाजपने परंपरा राखली'; भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेने मानले आभार
मुंबई -: भारतीय जनता पक्षाने आता अंधेरी पूर्व विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर भाजपने आपला उमेदवार देऊ नये असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. अखेर आज भाजपने आपले अधिकृत उमेदवार मुर्जी पटेल यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आभार मानले आहेत.
14:33 October 17
पराभवाची चाहूल लागल्याने भाजपाने उमेदवार अर्ज मागे घेतला - संजय राऊत
मुंबई - अंधेरी पूर्व पोट निवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे स्क्रिप्टचा भाग होता असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अंधेरी पूर्व निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 45 हजाराच्या मताधिक्याने जिंकणार होती. यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला. पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपाने उमेदवार अर्ज मागे घेतला, असे ते म्हणाले. भाजपने या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारा यासंदर्भात माहिती मिळाली होती. मुंबई सत्र न्यायालय परिसरात आज खासदार संजय राऊत यांची कार्यकरत्यांसोबत चर्चा करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
14:17 October 17
नंदुरबार ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसला 53 तर भाजपाला 49 ठिकाणी विजय
नंदुरबार 148 ग्रामपंचायत निकाल हाती. त्यापैकी काँग्रेस - 53. भाजपा - 49. राष्ट्रवादी - 04. शिवसेना उद्वव गट - 12. शिवसेना शिंदे गट -12. इतर - 15. माकपा - 02. ईश्वरचिठ्ठी फैसला बाकी - ०१.
14:13 October 17
मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर दिल्या ऋतुजाताईंना शुभेच्छा
मुंबई - मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमचे नेते नरेंद्र मोदी , अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहू. पद असो किंवा नसो आम्हाला काही फरक पडत नाही असे ते म्हणाले. अंधेरीत जनतेची सेवा करत राहीन आणि त्यांच्याबरोबर रात्र भर काम करत राहीन. मी अपक्ष लढणार नाही. मी ऋतुजा ताई यांना शुभेच्छा देतो.
14:08 October 17
भंडारा जिल्ह्यात भाजपचे पानीपत, 19 पैकी फक्त 1 ग्रामपंचायत हाती
भंडारा जिल्हा एकूण ग्रामपंचायत निवडणूक 19 गावात झाली. हाती आलेले ग्रामंपचायत निकाल - 19. भाजपा - 01. काँग्रेस - 05. राष्ट्रवादी - 01. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट - 03. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00. इतर - 09.
14:03 October 17
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाचा धुव्वा, ठाकरे गटाकडे 24 ग्रामपंचायती
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालाची अंतिम आकडेवारी हाती आली आहे. एकूण ग्रामपंचायत-51. मतदान झालेल्या ग्रामपंचायती - 36. बिनविरोध ग्रामपंचायती- 15. एकूण निकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 24. शिंदे गट - 07. भाजप- 01. राष्ट्रवादी- 2. काँग्रेस- 00. इतर-17.
14:00 October 17
संजय राऊत यांच्यावतीने उद्या उद्या पुन्हा होणार युक्तिवाद
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला. संजय राऊत यांच्यावतीने उद्या उद्या पुन्हा सकाळी साडेअकरा वाजता युक्तिवाद करण्यात येणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन देण्यात येऊ नये असा ईडीने युक्तिवाद केला. संजय राऊत यांना जामीन दिल्यास या प्रकरणातील इतर साक्षीदारांना धोका असल्याचा हा युक्तवाद होता. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल आहे.
13:55 October 17
अनिल परब यांनी मानले सर्वांचे आभार
मुंबई - ऋतुजा लटके शिवसेनेच्या उमेदवार होत्या. महाराष्ट्राची परंपरा आहे, एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला श्रद्धांजली म्हणून त्यांच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर निवडणूक बिनविरोध करतो. शरद पवार यांनी त्यांना या परंपरेच्या आठवण करून दिली. राज ठाकरेंनीही या संदर्भात पत्र दिले. भाजपने प्रतिसाद दिला आहे, महाराष्ट्राची परंपरा भाजपने राखली. त्याबद्दल सर्वांचे आभार अनिल परब यांनी मानले.
13:39 October 17
संदीप देशपांडे यांनी मानले शरद पवारांचे आभार
महाराष्ट्राची परंपरा आहे की एकाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला आणि घरातील उमेदवार असेल तर बिनविरोध केला जातो. भाजपने परंपरा राखली हे चांगले झाले. सर्वांच्या मनात होत की ही निवडणूक होऊ नये. पवार साहेबांचे खास आभार मानतो, राज ठाकरेंनी देखील पत्र लिहले होते. राज ठाकरेंनी आणि पवारांनी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले होते. त्यामुळे आता ऋतुजा लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
13:29 October 17
साई रिसॉर्ट प्रकरणी मालकांना तूर्तास दिलासा
रत्नागिरी - दापोलीच्या साई रिसॉर्ट मालकाला मुंबई उच्च न्यायालाचा तूर्तास दिलासा. यासंदर्भात कारवाई करण्यापूर्वी सदा कदम यांना रितसर नोटीस पाठवण्याचे कोर्टाने दिले निर्देश. जेणेकरून त्या विरोधात कदम यांना कोर्टात दाद मागता येणार आहे. हे रिसॉर्ट परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
13:25 October 17
ग्रामपंचायत निवडणुकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना तिसरा धक्का
रत्नागिरी - उद्योगमंत्री उदय सामंत यांना तिसरा धक्का. फणसोप ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सत्ता. राधिका साळवी सरपंच म्हणून विजयी. तर 11 पैकी 10 सदस्य ठाकरे गटाचे विजयी. फणसोप राजन साळवी यांचे गाव आहे.
12:54 October 17
नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश, सुरुवातीच्या निकालात भाजपचा ३० ठिकाणी झेंडा
नंदुरबार - एकूण ग्रामपंचायत- २०६. आतापर्यंतचे निकाल ८८. शिवसेना - ०९. शिंदे गट - ११. भाजप - ३०. राष्ट्रवादी- ०२. काँग्रेस- २८. इतर-०८.
12:50 October 17
चांदखेड ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचे वर्चस्व
पुणे - चांदखेड ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचे वर्चस्व. सरपंच आणि ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचा विजय. संत रामजी बाबा ग्रामविकास आघाडीने 11 पैकी 9 जागा काबीज केल्या. तर सरपंच पदावर ही विजय मिळवला. मीना माळी यांची सरपंचपदी निवड होताच त्यांनी मतदारांचे आभार मानले. आमच्या स्थानिक आघाडीत सर्व पक्षीय समाविष्ट होते. गावच्या विकासासाठी आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही. असे त्या म्हणाल्या.
12:43 October 17
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, मुरजी पटेल यांचा अर्ज मागे
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे उमदेवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला आहे.
12:38 October 17
मोरगिरी ग्रामपंचायतीत ६० वर्षांनी सत्तांतर
सातार्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीत ६० वर्षांनी सत्तांतर झाले आहे. चार ग्रामपंचायती शिंदे गटाकडे तर एक राष्ट्रवादीकडे गेली आहे.
12:25 October 17
भंडारा जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, उद्धव शिवसेनेची सरशी
भंडारा जिल्हा - एकूण ग्रामपंचायत निवडणूक 19. हाती आलेले ग्रामंपचायत निकाल - 11. भाजपा - 1. काँग्रेस - 3. राष्ट्रवादी - 00. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) - 03. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00. इतर - 04
12:18 October 17
नागपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप काँग्रेसची काट्याची टक्कर
नागपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, 15 पैकी 12 सरपंचपदाचे निकाल जाहीर झालेत. भाजप 5 जागी सरपंच विजयी. काँग्रेस 4 जागी सरपंच विजयी. अपक्ष 3 जागी सरपंच विजयी झाले.
12:15 October 17
अंभोरा ग्रामपंचायतमध्ये भाजपला झटका
नागपूर - अंभोरा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस समर्थीत राजू कुकडे हे सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी. भाजप समर्थीत उमेदवार रामेश्वर बावनकुळे यांचा पराभव. अंभोरा ही कुही तालुक्यातील ग्रामपंचायत. कुही तालुक्यातील सिरसी ग्रामपंचायत काँग्रेस समर्थित उमेदवार सरपंचपदी निवडून आला आहे. भिवापूर तालुक्यातील गाडेघाट ग्रामपंचायतीत सरपंचपदी अपक्ष विष्णू मगर विजयी झाले. पांजरेपार ग्रामपंचायतीत सरपंचपदी अपक्ष आकांक्षा मानवटकर विजयी झाल्या. भिवापूर तालुक्यातील थुटानबोरी ग्रामपंचायतीत सरपंचपदी भाजपचे विनोद गुरपुडे विजयी झाले.
12:13 October 17
युवा एल्गार आघाडीने सरपंच पदाचे खाते खोलले
युवा एल्गार आघाडीने सरपंच पदाचे खाते खोलले. रायतली चांदवड ग्रामपंचायतीत जितेंद्र दळवी विजयी
12:08 October 17
नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघातील ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात
भंडारा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातील एकमेव ग्रामपंचायत सिरेगाव टोला निवडणुकीमध्ये भाजपाचे रोहित संग्रामे हे सरपंच पदासाठी निवडून आले आहे.
11:57 October 17
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी ज्योती जगताप यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील कबीर कला मंचाच्या सदस्य आरोपी ज्योती जगताप यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने फेटाळल्यानंतर त्या निर्णयाला उच्च न्यायालयात अहवाल देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने देखील जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आज सोमवार रोजी न्या. अजय गडकरी यांच्या एक सदस्य खंडपीठाने निर्णय दिला आहे.
11:44 October 17
पाटणमधील मोरगिरी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा
सातारा ग्रामपंचायत निवडणूक निकाल.

सातारा - पाटण तालुक्यातून ग्रामपंचायतीचा पहिला निकाल समोर आला असून मोरगिरी (ता. पाटण) या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. याठिकाणी पाटणचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणारे पॅनेल विजयी झाले आहे.
पाटण तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मोरगिरी आणि घाणव या दोन ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १६) चुरशीने मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर मोरगिरी (ता. पाटण) ग्रामपंचायतीचा पहिला निकाल समोर आला आहे. या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. घाणव या ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू झाली असून काही वेळातच निकाल हाती येईल.
11:44 October 17
भंडारा जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट
भंडारा जिल्हा
एकूण ग्रामपंचायत 19
1) राजेदहेगाव - स्वाती हुमणे (अपक्ष)
2) खराडी - आरती हिवसे (काँग्रेस)
3) गोसे बुजुर्ग- आशीष माटे (शिंदे गट)
४) परसोडि: नंदा वंजारी (अपक्ष)
(५) संगम (पू) : वंदना मेश्राम (अपक्ष)
डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायती
वेती वरोती सरपंच 800 मतांनी विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा
मोखाडा
खोडाला ग्रामपंचायत सरपंच पदाचे विजयी उमेदवार कविता प्रभाकर पाटील विजयी ,उध्दव गट
11:41 October 17
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर काही वेळात सुनावणी
मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात काही वेळात सुनावणी सुरू होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत सत्र न्यायालयात उपस्थित आहेत. आज ईडीतर्फे एएसजी अनिल सिंग हे करणार आहेत युक्तिवाद. या प्रकरणात राऊत यांच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. मात्र ईडीतर्फे युक्तिवाद करणे अद्याप बाकी आहे. पत्राचाळ कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना जामीन देण्यास विरोध केला आहे.
11:36 October 17
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पांबाबत आढावा बैठक
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत सुरू असलेल्या आणि प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
11:20 October 17
कबीर कला मंचचे सदस्य आणि आरोपी ज्योती जगताप यांचा जामिन उच्च न्यायालयाने फेटाळला
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदे प्रकरणात आरोपी ज्योती जगताप यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
कबीर कला मंचचे सदस्य आणि भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी ज्योती जगताप यांचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला
जामीन अर्जाला उच्च न्यायालयात एनआयए विरोध केला होता
तसेच एनआयएने म्हटले होते की माओवादी चळवळीत आरोपी जगताप यांचा सक्रिय सहभाग होता
तसेच त्यांनी शस्त्र आणि स्फोटक बनवणे आणि उपयोग करण्याचे प्रशिक्षण देखील घेतले होते
11:10 October 17
सोनिया, प्रियंका गांधींनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत केले मतदान, मल्लिकार्जुन खरगे यांनी बंगळुरू येथे केले मतदान
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी मतदान केले. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी बंगळुरू येथे मतदान केले
11:04 October 17
वसई तहसील कार्यालयात मतमोजणी दरम्यान गोंधळ

उमेदवारांसह, लोकप्रतिनिधिंना मतमोजणी केंद्रात प्रवेश नाकारल्याने राडा
11:02 October 17
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायती निकालात भाजपची बाजी
नंदुरबार
हाती आलेले ग्रामंपचायत निकाल - 20
भाजपा - 09
कॉग्रेस - 07
राष्ट्रवादी - 01
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 02
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 01
11:01 October 17
गांधी कुटुंबाशी माझे नाते असेच राहील- राजस्थानचे मुख्यमंत्री
आजचा दिवस ऐतिहासिक आहे, आज २२ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. ही निवडणूक पक्षातील अंतर्गत सौहार्दाचा संदेश देते. 19 ऑक्टोबर (मतमोजणीच्या दिवशी) नंतरही गांधी कुटुंबाशी माझे नाते असेच राहील, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले
10:52 October 17
सोनिया, प्रियंका गांधी यांच्यासह ७५ प्रतिनिधी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात मतदान करणार
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीत सोनिया, प्रियंका गांधी यांच्यासह 75 प्रतिनिधी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात मतदान करणार आहेत.
10:45 October 17
अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणारा काँग्रेस पक्ष हा एकमेव राजकीय पक्ष-जयराम रमेश
अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणारा काँग्रेस पक्ष हा एकमेव राजकीय पक्ष आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी बल्लारीमध्ये मतदान करणार आहेत. पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी सकाळी 11 च्या सुमारास मतदान करतील अशी अपेक्षा आहे, असे काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
10:36 October 17
तळोदा तालुक्यातील आमलाड ग्रामपंचायतीत भाजपचा विजय
नंदुरबार जिल्ह्यातुन पहिला निकाल हाती आला आहे. तळोदा तालुक्यातील आमलाड ग्रामपंचायतीवर भाजपाने ताबा मिळवला आहे. पालघरच्या 83 ग्राम पंचायतीच्या निकालाला सुरवात. प्रथम बोईसर पास्थळ अक्करपटी केळवे या ग्रामपंचायतपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे.
09:58 October 17
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या कार्यक्रमाविरोधात तिबेटी युवक काँग्रेसचे धर्मशाला येथे निदर्शने
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या 20 व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या निमित्ताने तिबेटी युवक काँग्रेसने (TYC) काल धर्मशाला येथे चिनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
09:56 October 17
काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तपासणी सुरू
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री एआयसीसी कार्यालयात पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वी अंतिम तपासणी करत आहेत.
09:46 October 17
पुणे-रिसोड ट्रॅव्हल्सला बदनापूर येथे भीषण अपघात, 7 जण जखमी
बदनापूर येथे रिसोड कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला मोठा अपघात होऊन सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. पुण्याहून रिसोड कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ला बदनापूर येथे अपघात घडला आहे. रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स डिव्हायडेडला आदळली आणि रोडवर पलटी झाली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले तर 5 ते 7 जण किरकोळ जखमी झाले आ
08:49 October 17
पालकमंत्री भुमरे यांचे उपचार सुरू असताना गेली वीज, मोबाईल लाईट उजेडात घेतले उपचार
औरंगाबाद - गोरगरिबांना उपचार देणाऱ्या घाटी रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचं अनेकदा समोर आले. मात्र त्याचा प्रत्यय पालकमंत्र्यांना आला. शिंदे गटाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरू असताना अचानक वीज गेल्याने उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा लाईट सुरू करून उपचार केल्याने आता तरी सुविधा मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना निधी मंजूर झाल्याचं सांगण्यात आले.
07:32 October 17
केंद्र सरकारकडे 3 कोटी कोरोना लसींचा साठा
भारतातील कोविड लसीकरण अद्याप संपलेले नाही. सरकारकडे अद्याप 3 कोटी लसींचा साठा आहे.
07:27 October 17
काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज मतदान होणार
काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज मतदान होणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर रिंगणात आहेत. दिल्लीत १९ ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत.
07:14 October 17
पंतप्रधान आज दिल्लीत पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान 600 पीएम किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान 16,000 कोटी रुपयांचा पीएम-किसान निधी देखील जारी करणार आहेत.
06:56 October 17
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा !
राज्यातील सत्तातरांतर पहिल्याच लागलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीला मोठे नाट्यमय वळण लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नंतर आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
06:53 October 17
ज्वेलरी दुकानाच्या मालकाने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिल्या कार आणि बाईक
तामिळनाडूमध्ये एका ज्वेलरी दुकानाच्या मालकाने आपल्या कर्मचार्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक भेट दिल्या आहेत. ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल यांनी कर्मचाऱ्यांचे आभारदेखील मानले आहेत.
06:22 October 17
Breaking news अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, मुरजी पटेल यांचा अर्ज मागे
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणुकीचे चित्रच बदलून टाकले आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील उमेदवारी वापस घेण्याची त्यांची विनंती भाजपने थेट मान्य केली नाही. असे असले तरी उपमुख्यमंत्र्यांनी वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनीदेखील महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण शरद पवार यांनी करून दिल्याचे सांगत भाजपला टोला लगावला आहे. आमदार व खासदार यांचा पदावरून मृत्यू झाल्यास रिक्त जागेतील निवडणुकीत उमदेवारी द्यायची नाही, अशी महाराष्ट्राच्या राजकारणात पद्धत व संस्कृती आहे. याच संस्कृतीची आठवण भाजपला करून दिली जात असल्याने भाजपवर दबाव वाढत असल्याचे दिसत आहे.