मुंबई- एकनाथ शिंदे कॅम्पचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार लटके यांच्या बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपशी बोलण्याची विनंती केली आहे.
Breaking News Live : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपशी बोला; प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - महाराष्ट्र लाईव्ह अपडेट
22:59 October 16
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपशी बोला; प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
21:11 October 16
मुंब्रा परिसरातील गोदामाला भीषण आग
ठाणे - शहरातील मुंब्रा परिसरात एका गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि मुंब्रा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
21:11 October 16
विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17 ऑक्टोबर) मतमोजणी होईल.
19:09 October 16
कुख्यात गुंड गज्या मारणेला पुणे पोलिसांनी साताऱ्यातील वाई येथून घेतले ताब्यात
सातारा - कुख्यात गुंड गज्या मारणेला पुणे पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून न्यायालयाने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
18:57 October 16
निवडणूक आयोगावर शंका होणार नाही याची काळजी आयोगानेही घेतली पाहिजे - शरद पवार
मुंबई - निवडणूक आयोगावर शंका होणार नाही याची काळजी आयोगानेही घेतली पाहिजे - हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्याच्या निवडणुका जाहीर होणार होत्या. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र, गुजरातच्या निवडणुका अद्याप जाहीर नाही. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने सर्वांच्या निवडणुका सोबत घेतल्या असत्या तर निवडणूक आयोगावर ज्या शंका घेतल्या जात आहेत. त्या घेतल्या गेल्या नसत्या. निवडणूक आयोग स्वायत्त सस्था आहे. त्यामुळे त्याबद्दल शंका उपस्थित होऊ नये अशी अपेक्षा सर्वाची आहे. मात्र, ही काळजी निवडणूक आयोगाने देखील घेतली पाहिजे, असे पवार यावेळी म्हणाले.
18:57 October 16
काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी सोमवारी टिळक भवन येथे मतदान
मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मलिकार्जून खर्गे विरुद्ध शशी थरूर अशी लढत होणार आहे.
17:08 October 16
चक्क कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्मवर धावली रिक्षा, चालकावर गुन्हा दाखल
मुंबई - कुर्ल्यामध्ये एक ऑटो रिक्षा चक्क प्लॅटफॉर्मवर धावताना पाहायला मिळाली. ही घटना १२ ऑक्टोबर च्या रात्रीची असल्याचं म्हटलं जातंय. रात्री जवळपास १ वाजताच्या दरम्यान कुर्ला स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक रिक्षा चालकाने थेट आपली रिक्षाचा आणली. प्लॅटफॉर्मवर रिक्षा पाहतात प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांची भांबेरी उडाली.
17:07 October 16
सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानं तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या, बीड येथील घटना
बीड - परतीच्या पावसाने तळहाताच्या फोडासारखी जपलेली सोयाबीन उद्धवस्त झालीय. यामुळं उद्धवस्त झालेली सोयाबीन पाहून, अल्पभुधारक शेतकऱ्याने, सोयाबीनच्या ढिगाऱ्यासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना, बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव येथे आज घडलीय.
16:33 October 16
राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला रात्री भेटतात - शंभूराज देसाई
नवी मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला रात्री भेटतात त्यामुळे भीतीपोटी अजित पवार सारखे-सारखे माध्यमांसमोर येऊन शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे सांगतायत. आमच्या 170 चे 175, 180 आमदार कधी झाले हे कळणार देखील नाही. पाण्याविना माशाप्रमाणे सत्तेविना अजित पवारांची अवस्था झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले.
15:26 October 16
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष घेतले. काही दिवसांपासून त्यांच्या होत असलेल्या आरोपांमुळे ते त्रस्त होते. त्यातून त्यांनी विष प्राशन केले. मुंबईत जेजे हॉस्पिटल मधे भरती केले आहे.
14:19 October 16
आम आदमी पार्टीने गुजरात निवडणुकीसाठी जाहीर केली पाचवी यादी
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी (AAP) ने 12 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.
14:07 October 16
राज ठाकरे यांच्या पत्राचा आम्ही विचार करू - देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे यांच्या पत्राचा आम्ही विचार करू. पण यासाठी मला मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
13:23 October 16
भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या विधवा ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यायला हवे. पत्नी आमदार झाल्यास रमेश लटके यांच्या आत्म्यास शांती मिळेल, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
12:50 October 16
मेक्सिकन शहरातील बारमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा गोळीबार, सहा महिला आणि सहा पुरुषांचा मृत्यू
शनिवारी संध्याकाळी मध्य मेक्सिकन शहरातील इरापुआटोमधील एका बारमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात सहा महिला आणि सहा पुरुषांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत गुआनाजुआटो राज्यातील दुसरी सामूहिक गोळीबाराची घटना आली आहे.
12:39 October 16
मनीष सिसोदिया यांना पुन्हा सीबीआयचे समन्स
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले की त्यांना सीबीआयने उद्या 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मुख्यालयात बोलावले आहे. त्यांनी ट्विट केले की ते तेथे जाऊन पूर्ण सहकार्य करतील.
12:12 October 16
ठाण्यातील अंबिका नगर येथील शिवसेना शाखेचे बाळासाहेबांची शिवसेना असे नामकरण
ठाण्यातील अंबिका नगर येथील शिवसेना शाखेचे नामकरण करण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. ठाणे शहरातील ही पाहिली शाखा असून यावेळी ढाल तलवार हातात घेऊन घोषणा देण्यात आले आहेत. तर यावेळी सगळे जुने शिवसैनिक तसेच महिला पदाधिकारी व युवा सैनिक उपस्थित आहेत
12:12 October 16
मुरजी पटेलांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणे हे षडयंत्र-चंद्रशेखर बावनकुळे
मुरजी पटेलांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणे हे षडयंत्र आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही जिंकू असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
11:23 October 16
पवन कल्याण यांची पोलिसांविरोधात तक्रार
पोलिसांनी 100 हून अधिक JSP (जनसेना पक्ष) समर्थकांना अटक केली आणि जनवाणी कार्यक्रमासाठी परवानगी मागणाऱ्या 15 सदस्यांवर 307 गुन्हे दाखल केले. शनिवारी मध्यरात्री, पोलिस माझ्या हॉटेलच्या खोलीत आले आणि माझ्या दारावर धडक दिली, असे जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी सांगितले.
11:13 October 16
बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करत गर्भवती करणाऱ्या नराधमास 22 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
सांगली - पुतणीची वर्ग मैत्री असणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत गर्भवती करणाऱ्या एका नराधमास सांगली न्यायालयाने 22 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.रवी भोसले,असे या नराधम आरोपीचे नाव आहे.
09:51 October 16
देशात प्रथमच हिंदीतून वैद्यकीय शिक्षण मध्यप्रदेशात सुरू होणार
खूप मोठा दिवस आहे. देशात प्रथमच हिंदीतून वैद्यकीय शिक्षण मध्यप्रदेशात सुरू होणार आहे. एचएम अमित शहा आणि मुख्यमंत्री एसएस चौहान आज सकाळी 11 वाजता 1 ली वर्षाच्या सर्व 3 विषयांच्या पाठ्यपुस्तकांच्या हिंदी आवृत्त्यांचे प्रकाशन करणार आहेत. शरीरशास्त्र, शरीरशास्त्र आणि जैवरसायन आज सकाळी 11 वाजता एमपी मेडिकल एडू मिन विश्वास सारंग यांनी सांगितले.
09:47 October 16
उद्धव ठाकरे अजून तुम्हाला कशाची सहानुभूती हवी आहे! संदीप देशपांडेंचे खरमरीत पत्र
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावे लागले. त्यानंतर पक्षात मोठी फूटही पडली. शिवसेनेला आपल्या पक्षाची निशाणी धनुष्यबाण आणि पक्षाचे नावही गमवाव लागले. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे राज्यभरातून जनता सहानुभूतीने उभी राहिल्याचे चित्र आहे.
09:43 October 16
मदुराईमधील मीनाक्षी सुंदरस्वर मंदिर सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर राहणार बंद
मदुराईमधील मीनाक्षी सुंदरस्वर मंदिर सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 7 वाजेपर्यंत बंद राहील. सकाळी 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर भाविकांना परवानगी असेल. हे मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराच्या सर्व उप-मंदिरांना लागू होते, असे मंदिर प्राधिकरणाने म्हटले आहे.
09:12 October 16
चीनने हाँगकाँगवर सर्वसमावेशक नियंत्रण मिळवले - शी जिनपिंग
चीनने हाँगकाँगवर सर्वसमावेशक नियंत्रण मिळवले आहे आणि ते अराजकतेतून शासनाकडे वळले आहे, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी रविवारी बीजिंगमध्ये म्हटले आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषणात सांगितले.
09:12 October 16
पंजाबचे माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांना अटक
मनमोहन कुमार, एआयजी यांना ५० लाख रुपयांची लाच देऊ केल्याबद्दल दक्षता ब्युरोने पंजाबचे माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांना अटक केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला, आरोपींकडून ५० लाख रुपयांची लाच जप्त करण्यात आली आहे.
09:11 October 16
पंतप्रधान 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट लॉन्च करणार
पंतप्रधान मोदी आज 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट लॉन्च करणार आहेत
08:57 October 16
भंडारा जिल्ह्यात 28 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार
भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्याच्या 19 ग्रामपंचायतची थेट सरपंचासह सार्वत्रिक निवडणुकीचा मतदानाला रविवारी सकाळी 7.30 वाजेपासून सुरुवात झाली आहे. 19 पैकी 16 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी 72 तर 122 सदस्य पदासाठी 325 उमेदवार रिंगणात आहेत. दहा सदस्य अविरोध निवडून आलेले आहेत. जिल्ह्यातील 65 मतदान केंद्रांवर 28 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
07:52 October 16
कर्नाटकात टेम्पो ट्रॅव्हलर वाहन आणि दूध वाहनाचा अपघात, ९ जणांचा मृत्यू
मंदिरांना भेट देऊन घरी परतत असताना अर्सिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर वाहन आणि केएमएफ दूध वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
07:12 October 16
1 हजार 165 ग्रामपंचायतीत आज होणार मतदान
राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
06:54 October 16
उद्यान विकसित व देखभालीचे काम करणाऱ्या खासगी संस्थांची होणार चौकशी
मुंबईतील महापालिकेने उद्यान विकसित व देखभालीसाठी खाजगी संस्थेला दत्तक दिले होते हा कालावधी पूर्ण झाले असतानाही देखील मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या बारा बुद्धाने अद्यापही खाजगी संस्थेच्या ताब्यात असल्याने या विरोधात एका सामाजिक संस्थेच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान मुंबई महापालिकेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दत्तक योजनेंतर्गत उद्यान विकसित व देखभालीसाठी खासगी संस्थेने दत्तक घेतलेल्या 12 उद्यानांच्या गैरवापराच्या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे.
06:31 October 16
Maharashtra Breaking news and live updates
वॉशिंग्टन/मुंबई- ईडी पूर्णपणे स्वतंत्र आहे. ईडीकडे काही प्रथमदर्शनी पुरावे असतात, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात केला.