मुंबईतील चारकोप पोलिसांनी एका जिम ट्रेनरला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिने आरोप केला आहे की ट्रेनर तिला ट्रेनिंगच्या बहाण्याने अयोग्यरित्या स्पर्श करत असे.
Breaking News Live : मुंबईतील चारकोप पोलिसांनी एका जिम ट्रेनरला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली - Etv Bharat Maharashtra news
22:58 October 10
मुंबईतील चारकोप पोलिसांनी एका जिम ट्रेनरला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली
21:20 October 10
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी - राज्यपाल
पुणे - जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
21:19 October 10
'मशाल' चिन्ह घराघरात पोहचवा - किशोरी पेडणेकर
मुंबई - काळ रात्र होता होता उशकाल झाला. अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली. आपल्या पक्षाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव मिळाले आहे. खरी लढाई पहिली जिंकली. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवा. ज्यांनी पक्षात काळ रात्र करण्याचे ठरवली तो उशकाल सूरु झाला आहे. पेटवा आयुष्याच्या मशाली असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
19:39 October 10
शिंदे गट आणि ठाकरे गटाला चिन्ह तसेच नाव मिळाले
नवी दिल्ली - शिंदे गट आणि ठाकरे गटाला चिन्ह तसेच नाव मिळाले. ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले
19:16 October 10
मुंबईत आज १११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई - मुंबईत आज १११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर राजधानीत आज एकजणाचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरात सध्या ९०७ सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
18:47 October 10
आयोध्यावरून महंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्यामध्ये दाखल
ठाणे - आयोध्यावरून महंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्यामध्ये दाखल. मुख्यमंत्र्यांना भेटून अयोध्येला येण्यासाठी ते निमंत्रण देणार आहेत. याच महंतांनी राज ठाकरे यांचीदेखील भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी पुढे आलेले आहेत. यासाठी महाराष्ट्रामध्ये सनातन धर्म मोठा व्हावा म्हणून महंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेत.
18:44 October 10
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळाल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर शिंदे गट देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
18:39 October 10
दिवाळी आली खाजगी ट्रॅव्हलचे भाव वाढले
मुंबई - नागपूर ते मुंबई पंधराशे रुपये तिकीट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चार हजार रुपये झाले आहे. दिवाळी जवळ आली आणि खाजगी ट्रॅव्हलचे भाव वाढले आहेत.
18:14 October 10
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू
मुंबई - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
17:40 October 10
लोकांची दिशाभूल केली जात आहे - केसरकर यांचा आरोप
मुंबई - लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव यांच्याबद्दल आदर आहे, असेही ते म्हणाले. ४० लोकांमुळे चिन्ह गोठवले नाही, ही बाबही केसरकर यांनी स्पष्ट केली. याच लोकांमुळे आपण मुख्यमंत्री होतात याचीही त्यांनी आठवण करुन दिली. हिंदुत्वापासून दूर जाऊ नये यासाठी वाद होता असे केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
17:34 October 10
करण जोहरचा मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला रामराम
मुंबई - बॉलीवूडचा दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने सोमवारी सांगितले की, अधिक सकारात्मक उर्जेसाठी इतरांना जागा निर्माण करता यावी यासाठी मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर सोडत आहे.
16:15 October 10
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांचे पॅनल
मुंबई - एमसीए अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांनी पॅनेल उभे केले आहे. सेक्रेटरी पदासाठी अमोल नाईक सदस्य पदासाठी जितेंद्र आव्हाड मुंबई प्रीमियर लीग टी-ट्वेंटी अध्यक्षपदासाठी विहंग सरनाईक यांचा पॅनलमध्ये समावेश.
16:12 October 10
किरण लोखंडे हत्या प्रकरणातील फरारी संशयिताला सातारा पोलिसांनी केले जेरबंद
सातारा - जालना शहरातील अंबड चौफुली भागातील अर्चना नगरमध्ये पत्नीने दोन मित्रांच्या मदतीने पती अॅड. किरण लोखंडे यांची हत्या केली होती. या गुन्ह्यात फरारी असलेल्या विकास गणेश म्हस्के या संशयितास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोळाचा ओढा या परिसरातून ताब्यात घेतले आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सातारा पोलिसांनी त्याला जालना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
15:34 October 10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथी गृहावरील सर्व बैठका केल्या रद्द
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथी गृहावरील सर्व बैठका रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री आज ठाण्यातच राहून सर्वच मुख्य नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. या बैठकांमध्ये चिन्ह पक्षाचे नाव हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपवन येथील महापौर बंगल्यावर दाखल झाले आहे.
15:20 October 10
अनिल देशमुख यांचा अँजिओग्राफीसाठीचा अर्ज मंजूर
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अँजिओग्राफीसाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला. जसलोक रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात आली.
14:54 October 10
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
14:50 October 10
काँग्रेस पक्ष अंधेरी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत - नाना पटोले
मुंबई - महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणुका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहील, त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. काँग्रेस पक्ष अंधेरी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणार आहे. सोनिया गांधी यांनी भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ही जागा काँग्रेसची आहे, पण सहकार्य करू असा निर्णय आम्ही घेतला आहे, असे पटोले यांनी सांगितले.
14:18 October 10
राहुल गांधी यांचा पुतळा भाजयुमो कार्यकर्त्यानी जाळला
नागपूर - भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) नागपूर महानगरातर्फे शंकरनगर चौक येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी त्यांनी जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा आपमान केल्याचा निषेध भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा यावेळी जाळला
13:55 October 10
शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे पक्षाची नावे आणि चिन्हांची निवड सादर
नवी दिल्ली - शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वकिलांनी आज भारत निवडणूक आयोगाकडे पक्षाची नावे आणि चिन्हांची निवड सादर केली. यानंतर निवडणूक आयोग त्यांच्यासंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित आहे.
13:47 October 10
इस्त्रीवाल्याने घाम पुसायला केला तिरंग्याचा वापर
विरार - इस्त्रीवाल्याने घाम पुसायला तिरंग्याचा वापर केल्याचे येथे दिसून आले. विरारच्या कोपरी गावातील हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला. गावातील तरुणांनी या इस्त्रीवाल्याला चांगलाच चोप दिला.
13:44 October 10
शरद पवार काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे राज्यात स्वागत करणार
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चे स्वागत करणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
13:04 October 10
खासदार नवनीत राणा यांना सत्र न्यायालयाचा दिलासा कायम
मुंबई - नवनीत राणा यांना जात पडताळणी प्रकरणात दाखल केलेल्या मुलुंड पोलीस स्टेशन प्रकरणात शिवडी कोर्टाने नवनीत राणा यांच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी केले होते. या विरोधात नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 18 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
12:54 October 10
नवे चिन्हचं शिवसेनेसाठी क्रांती घडवे - संजय राऊत
संजय राऊतांना चिन्ह गेल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ठोस प्रतिक्रिया दिली आहे. चिन्ह गेल्याची ही काही पहिली वेळ नाही, काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यादेखील अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. बहुदा नवे चिन्हचं शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, असे राऊत म्हणाले.
12:38 October 10
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दोन दिवसीय अकोला, मेळघाट, अमरावती दौऱ्यावर
मुंबई - अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व शेतीचे झालेले नुकसान यासोबत मेळघाट मधील कुपोषित बालकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दोन दिवसीय अकोला, अमरावती व मेळघाट दौऱ्यावर आज गेले आहेत.
12:08 October 10
संजय राऊत यांना भेटण्यासाठी अनेक शिवसैनिक न्यायालयात
मुंबई - खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी अनेक शिवसैनिक न्यायालयात पोहोचले आहेत. दसरा मेळाव्यानंतर आज पाहिल्यांदाच राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयात आणला जात आहे. लालबाग आणि परेल परिसरातून अनेक शिवसैनिक कोर्ट परिसरात आले आहेत. शिवसेना माजी आमदार दगडू दादा सकपाल पोचले आहेत. आमदार सुनील राऊतदेखील मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत.
12:01 October 10
भाजपा नेते किरीट सोमैयांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. प्रशासनाने याप्रकरणी दिलेल्या पडताळणीच्या निर्देशला विरोध कशाला करता, असा सवाल कोर्टाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा सवाल विचारला आहे. कोर्टाचे सोमय्यांविरोधात एसआरए प्रकरणी दाखल जनहित याचिकेचे सुमोटो याचिकेत रुपांतर करण्याचे संकेत मिळत आहेत.
11:50 October 10
नेपाळी राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याला पोलीस कोठडी
काठमांडू जिल्हा न्यायालयाने बलात्काराचा आरोपी नेपाळी राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याला पोलीस कोठडी सुनावली. त्याची अधिक चौकशी करण्यासाठी 7 दिवसांच्या पोलिस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले.
11:18 October 10
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मीरा भायदंर महापालिका आयुक्त नियुक्ती प्रकरणात
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुंबई मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मीरा भाईंदर पालिका आयुक्तांविरोधातील दाखल याचिकेतून शिंदे फडणवीस यांचं नाव काढण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्देश
10:58 October 10
अनिल देशमुख यांच्या जामिनाविरोधात ईडीची सर्वोच्च न्यायालयात धाव
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंमलबजावणी संचालनालयाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
10:38 October 10
मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसस्कार
मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर उत्तर प्रदेशातील वडिलोपार्जित गाव सैफई येथे होणार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, दिग्गज राजकारण्याचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार आहेत.
10:17 October 10
मुलायम सिंह हे आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे प्रमुख सैनिक - पंतप्रधान मोदी
पीएम मोदींनी समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यादव यांची आठवण काढली. ते आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे प्रमुख सैनिक होते. त्यांचे संसदीय हस्तक्षेप अभ्यासपूर्ण होते आणि राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला होता, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
10:00 October 10
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात ६७० अंकांची घसरण
सेन्सेक्स 670 अंकांची घसरण झाली आहे.
09:03 October 10
इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
लाहोरी गेट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 304A, 336, 337, 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
09:01 October 10
पंतप्रधान जामनगरमध्ये विविध विकास कार्यक्रमांचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भरूच आणि जामनगरमध्ये विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मोदी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन होणार आहे.
08:48 October 10
आयोगाने चिन्हे गोठविणे नवीन नाही – अजित पवार
बारामती- शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाडे पक्षासंदर्भात दावे दाखल केले होते. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे,तो निर्णय राज्यासाठी आणि देशासाठी काही नवीन नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत सांगितले.
08:45 October 10
सीबआयकडून अभिषेक बोईनपल्लीला अटक
केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने दिल्लीच्या GNCTD च्या उत्पादन शुल्क धोरणाची आखणी आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या चालू तपासात अभिषेक बोईनपल्ली याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
08:40 October 10
कारखान्यातून 1600 जिलेटिनच्या काड्या, ब्लास्टिंग कॅप्स चोरीला!
एका स्टोन क्रशर कारखान्याच्या मालकाने माहिती दिली आहे की, लापसरी परिसरात असलेल्या त्याच्या कारखान्यातून 1600 जिलेटिनच्या काड्या, ब्लास्टिंग कॅप्स चोरीला गेल्या आहेत. स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी), पोलीस आणि इतर त्याचा तपास करत आहेत.
08:03 October 10
अनंतनाग येथील चकमकीत आणखी दहशतवादी ठार
अनंतनाग येथील चकमकीत आणखी दहशतवादी ठार झाला आहे.
07:03 October 10
अनंतनाग येथील चकमकीत एक दहशतवादी ठार
अनंतनाग चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. कारवाईची मोहिम चालू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.
06:46 October 10
लाहोरी गेटमध्ये इमारत कोसळून ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
दिल्लीच्या लाहोरी गेटमध्ये इमारत कोसळून ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, अनेक जखमी झाले आहेत.
06:46 October 10
मध्य व्हेनेझुएलामध्ये भूस्खलनात किमान 22 लोकांचा मृत्यू
मध्य व्हेनेझुएलामध्ये भूस्खलनात किमान 22 लोकांचा मृत्यू झाला आणि मुसळधार पावसामुळे नदी ओसंडून वाहू लागल्याने 50 हून अधिक बेपत्ता झाले, असे उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितले
06:44 October 10
36 वर्षांच्या बंदिवासानंतर महिलेची सुटका
36 वर्षांच्या बंदिवासानंतर सुटका झालेली मानसिक आजारी महिला बरी होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
06:43 October 10
किम जोंग-उन यांनी टॅक्टिकल न्यूक्लियर कवायतींचे केले निरीक्षण
उत्तर कोरियाने म्हटले आहे की, किम जोंग-उन यांनी नुकत्याच केलेल्या 'टॅक्टिकल न्यूक्लियर' कवायतींचे निरीक्षण केले
06:41 October 10
आग्रा येथील विविध वसाहतींची नावे नरक पुरी, कीचड नगर.. निषेध करण्याकरिता नागरिकांचा निर्णय
रस्त्यांची खराब स्थिती, पाणी साचणे यासह विविध समस्यांना विरोध करण्यासाठी आग्रा येथील विविध वसाहतींमधील रहिवाशांनी त्यांच्या वसाहतींचे नाव बदलून नरक पुरी, कीचड नगर, घिनोना नगर, नाला सरोवर असे ठेवले.
06:08 October 10
Maharashtra Breaking News मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई शिवसेनेचे धनुष्य बाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. एकीकडे शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे नेते शिंदे गट व भाजप टीका करत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते व शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. अशा परिस्थितीत शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाला कोणते चिन्ह व नाव मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.