सातारा - कोयना धरणाचे दोन दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहेत. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे आणि पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद ४२०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात १०४.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. पावसामुळे धरणात प्रतिसेकंद ६१२५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
Breaking News Live : पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचे दोन दरवाजे १ फुटाने उघडले - Dussehra Melawa
21:28 October 07
पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचे दोन दरवाजे १ फुटाने उघडले
19:48 October 07
मुंबईत उद्या आकाश ढगाळ राहणार, गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
मुंबई - मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाने हजेरी लावली आहे. उद्या शनिवारी आकाश ढगाळ राहणार असून गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबईमध्ये आज सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुलाबा येथे २२.४ तर सांताक्रूझ येथे ३२.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई महापालिकेच्या पाऊस नोंदणी केंद्रवार नोंद झाल्या नुसार शहर विभागात ३७.५१, पूर्व उपनगरात ३६.३८ तर पश्चिम उपनगरात २५.२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
19:18 October 07
पवारांच्या घरावर हल्ला करणारे आंदोलक पुन्हा सेवेत रुजू होणार?
मुंबई - एसटी विलिनीकरणसहित विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता. या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परिवहन विभागाची मंत्रालयात बैठक घेतली. दरम्यान, गुन्ह्यांची पार्श्वभूमीवर तपासून कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत.
19:10 October 07
मुंबईत आज १३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई - मुंबईत आज १३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर शहरात कोरोनाने आज एकाचाही मृत्यू झाला नाही. सध्या शहरात ७९२ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
18:45 October 07
भिवंडी निजामपुरा महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी तरुणाला अटक
ठाणे -जिल्ह्यातील भिवंडी निजामपुरा महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
18:23 October 07
अंधेरी सबवे जलमय, चार ते पाच फूट पाणी साचल्याने वाहतुकीस बंदी
मुंबई - उपनगरात मागील दीड दोन तासापासून धुँवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा सब वे देखील पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणाहून पूर्व आणि पश्चिम बाजूला वाहनांना व नागरिकांना जाण्यास वाहतूक पोलिसांनी मनाई केली आहे.
18:08 October 07
पनवेल मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; बोनस प्रस्ताव महापालिकेत मंजूर
नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. आयुक्त आणि प्रशासक गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत हा दिवाळी बोनसचा विषय मार्गी लावण्यात आला. पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 25 हजार बोनस मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर कंत्राटी तत्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, परिश्रमिक कर्मचारी, राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी, आशा वर्कर्स-गट प्रवर्तक तसेच शिक्षण विभागातील शिक्षक यांना 5 हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता मंजूर करण्यात आला आहे. 240 व त्याहून अधिक दिवस काम केलेल्या एकुण 901 पात्र कर्मचा-यांना महापालिका दिवाळी बोनस देणार आहे.
18:02 October 07
धनुष्यबाण चिन्हाचा वाद - उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतचा म्हणणे मांडण्याची उद्धव गटाला मुदत
शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हावर दावा प्रकरणी आज सुनावणी झाली. आज, भारत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना त्यांच्या टिप्पण्या आणि संबंधित कागदपत्रांसह आयोगाला 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
17:35 October 07
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता
मुंबई - वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे भरण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. ठाणे महानगरपालिकेने यासंदर्भात आपत्ती प्रतिसाद पथकात वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये ७९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला होता.
17:30 October 07
आगामी महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी एकटी लढेल - आंबेडकर
जालना - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जालना दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीची आंबेडकरांनी आढावा बैठक घेतली. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसला युतीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र दोन्हीही पक्षांकडून या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी एकटी लढेल असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
17:30 October 07
17:23 October 07
उद्धव ठाकरेंसह सहकाऱ्यांना मनोरुग्णालयात भरती करण्याची मागणी
ठाणे - उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या भाषेच्या विरोधात ठाण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. ठाणे मनो रुग्णालयात त्यांना दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे तसेच त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना मनोरुग्णालयात भरती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन रुग्णालयात देण्यात आले.
16:59 October 07
पुण्यात खासदार शिंदेंच्या पत्राची बॅनरबाजी
पुणे - दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, वडील मुख्यमंत्री मुलगा खासदार बायको आमदार आता नातवाला नगरसेवक होण्याचे डोळे लावून बसले, असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर शिंदे यांनी खुले पत्र लिहिले होते. आता ह्याच पत्राची बॅनरबाजी पुण्यात केली जात आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेकडून या पत्राचा बॅनर लावण्यात आलेला आहे.
16:36 October 07
नोएडाच्या सेक्टर 3 मधील एका इमारतीला मोठी आग लागल्याचे वृत्त
नवी दिल्ली - नोएडाच्या सेक्टर 3 मधील एका इमारतीला मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. या इमारतीतून दाट काळ्या धुराचे लोड आकाशात निघताना दिसत आहे.
16:04 October 07
पंढरपूर गुन्हे शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धडक कारवाई, 44 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर - पोलिसांनी मोठी कारवाई करत कर्नाटक येथून टेंभुर्णीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. यामध्ये ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख सपोनी सी. व्ही.केंद्रे यांनी दिली आहे.
15:50 October 07
मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस
मुंबई - मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस सुरू आहे. परतीच्या पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपले. दुपारपासूनच दादर, परळ भायखळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बोर्ड परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसाचा लोकल सेवेवर प्रभाव पडला आहे. काही ठिकाणी लोकल धिम्या गतीने धावत आहेत.
15:32 October 07
शिवाजी पार्कवर शिमग्यासारखा दसरा मेळावा - नारायण राणे
मुंबई - शिवाजी पार्कवर शिमग्यासारखा दसरा मेळावा साजरा झाला अशी टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. वैचारिक पातळी भाषणात नव्हती. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला का, असा सवालही त्यांनी केला. शिवाजी पार्कवर विचाराचे सोने नाही तर शिव्या देण्याचं काम केलं, असेही ते म्हणाले. बाळासाहेबांकडून आम्हाला विचारांची मेजवानी मिळायची याची आठवणही त्यांनी करुन दिली.
15:18 October 07
आता तिसरीपासून परीक्षा सुरू होणार, शिक्षणमंत्र्यांचे सूतोवाच
पुणे- राज्यात आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार आहे. तसेच याबाबत राज्यातील शिक्षण तज्ज्ञांची चर्चा सुरू आरहे. त्यानंतरच अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याचा खुलासा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे.
15:02 October 07
T 90 रणगाड्याचे बॅरल फुटल्याने दोन जवानांना वीरमरण
झाशीजवळील बाबिना कॅन्टोन्मेंटमध्ये आज फील्ड फायरिंग सरावादरम्यान T-90 रणगाड्याचे बॅरल फुटल्याने जेसीओसह दोन भारतीय लष्करी जवान शहीद झाले. घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
14:58 October 07
नोबेल शांतता पुरस्कार बेलारूसमधील मानवाधिकार वकील अलेस बिलियात्स्कींसह दोन संघटनांना जाहीर
NobelPeacePrize2022 नोबेल शांतता पुरस्कार बेलारूसमधील मानवाधिकार वकील अलेस बिलियात्स्कींसह दोन संघटनांना जाहीर करण्यात आला आहे.
14:53 October 07
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अजूनही गंभीर
नवी दिल्ली - मुलायमसिंग यादव यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याना जीवनरक्षक औषधांवर ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर मेदांता हॉस्पिटल, गुरुग्राम येथील आयसीयूमध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.
14:33 October 07
कुर्लामध्ये गोणित सापडलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणी तीन महिलांना अटक
मुंबई - कुर्ला येथे नाल्यात गोणित सापडलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे.
13:54 October 07
सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस
सोलापूर - जिल्ह्यातील माढा, करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लोकांचीही त्रेधा उडाली.
13:46 October 07
दिल्लीच्या आंबेडकर भवनात सामूहिक धर्मांतर
नवी दिल्ली - दिल्लीच्या मध्यवर्ती जिल्ह्यातील आंबेडकर भवनाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक दिल्लीत सामूहिक धर्मांतर करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांना हिंदू देवतांची पूजा न करण्याची शपथ दिली जात आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. धर्मांतर करणाऱ्यांमध्ये दिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम देखील उपस्थित असल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे.
13:32 October 07
छत्तीसगडमध्ये मारकनार गावाजवळ आयईडी स्फोटात जवान जखमी
कांकेर (छत्तीसगड) - सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शुक्रवारी छत्तीसगडमधील कांकेरमधील कोयालीबेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारकनार गावाजवळ झालेल्या आयईडी स्फोटात जखमी झाला.
कोयलीबेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्कनार गावाजवळ आयईडी स्फोटात एक बीएसएफ जवान जखमी झाल्याची माहिती कांकेरचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी दिली.
13:04 October 07
मुंबईत आज ८० नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई - मुंबईत आज ८० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या शहरात ७७५ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
13:00 October 07
चपलांच्या जाहिरातीवर दुर्गा देवीचा फोटो लावून हिंदू देवतांचा अपमान - खासदार अनिल बोंडेंची तीव्र नाराजी
अमरावती - नवरात्र सुरू असताना चपलाच्या कंपन्यांनी आपल्या जोड्या चपलांच्या जाहिरातीवर दुर्गा देवीचा फोटो लावून हिंदू देवतांचा अपमान केला असल्याबाबत खासदार अनिल बोंडे यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला आहे. या कंपन्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. लोकांनीही त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
12:55 October 07
कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने
ठाणे - कोपरी येथील कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले. ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याने तणाव वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. याआधी देखील मनोरमानगर येथे दोन्ही गटात राडा झाला होता.
12:53 October 07
पुण्यात तरुणीला सायबर गुन्हेगाराकडून तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा
पुणे - पुण्यात एका तरुणीला सायबर गुन्हेगाराकडून तब्बल 1 लाख 13 हजारांना गंडा घातला आहे. यावरून नागपूरच्या 23 वर्षाच्या तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डायना स्पेन्सर नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12:12 October 07
सिद्धरामय्या यांच्या हाताला धरुन राहुल गांधी यांनी त्यांना पळवले, व्हिडिओ व्हायरल
बंगळूरु - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांचे व्हिडिओ आणि फोटा व्हायरल होत आहेत. कालचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये राहुल गांधी कर्नाटकचे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या हाताला धरुन त्यांना घेऊन धावत आहेत.
11:57 October 07
दिवाळी पॅकेज योजनेसाठी 513 कोटी रुपयांच्या वाटप योजनेचा जीआर सरकारने काढला
महाराष्ट्र सरकारने राज्यातील दीड कोटी शिधापत्रिकाधारकांसाठी दिवाळी पॅकेज योजनेसाठी 513 कोटी रुपयांच्या वाटप योजनेचा जीआर काढला. यातून विशेष दिवाळी किट देण्यात येणार आहे.
11:53 October 07
दिल्ली उच्च न्यायालयाने सचिन वाझे यांची यूएपीए अंतर्गत खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची याचिका फेटाळून लावली. त्यांनी अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात यूएपीए तरतुदींखाली खटला चालवण्यास दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती. हा मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली.
11:47 October 07
मुंबई उपनगर बोरिवली दहिसर भागात पावसाला सुरुवात
मुंबई - मुंबई उपनगर बोरिवली दहिसर भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे वातावरणात उकाडा देखील वाढला होता. मात्र आता मुंबई उपनगराच्या दहिसर बोरीवली भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. यामुळे हवेत काहीसा गारवा देखील निर्माण झाला आहे.
11:23 October 07
भारतीय कुटुंबाच्या हत्येतील संशयितास अमेरिकन पोलिसांकडून अटक
भारतीय कुटुंबाच्या हत्येतील संशयितास अमेरिकन पोलिसांनी अटक केली आहे.
10:21 October 07
भारताचे सरन्यायाधीशांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची सरकारकडे केली शिफारस
भारताचे सरन्यायाधीश यूयू लळित यांच्या निवृत्तीला फक्त एक महिना शिल्लक असताना, केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या उत्तराधिकार्याचे नाव देण्यासाठी पत्र लिहिले आहे. हा चालू प्रक्रियेचा भाग आहे आणि नियम घालून दिले आहेत, असे सरकारी सूत्राने म्हटले आहे.
10:09 October 07
एनसीबीने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कवर कारवाई
एनसीबीने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कवर कारवाई केली. भारतीय नौदलासह संयुक्त ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. या कारवाईत काल सागरी मार्गाने मोठ्या प्रमाणात हेरॉईनची तस्करी जप्त करण्यात आली.
09:28 October 07
वंदे भारत एक्स्प्रेसला म्हशींच्या कळपाची धडक, रेल्वेने दिला दुजोरा
मुंबई सेंट्रल ते गुजरातच्या गांधीनगर मार्गे धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला सकाळी ११.१५ च्या सुमारास वटवा स्थानकातून मणिनगरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर म्हशींचा कळप आल्याने अपघात झाला. अपघातात इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचा दुजोरा पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ, जेके जयंत यांनी दिला.
09:00 October 07
अमित शाह सिक्कीमचा दौरा आज करणार
केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह आज सिक्कीममधील गंगटोक येथे पूर्व आणि उत्तर-पूर्व विभाग डेअरी कोऑपरेटिव्ह कॉन्क्लेव्हचे उद्घाटन करतील. भाजपचे प्रमुख जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा आसामच्या गुवाहाटी येथे पोहोचतील.
07:18 October 07
इंडियानाच्या पर्ड्यू विद्यापीठात 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या
इंडियानाच्या पर्ड्यू विद्यापीठात 20 वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याची रूममेटने हत्या केली. विद्यापीठातील वरिष्ठ वरुण मनीष चीडा यांचा त्यांच्या वसतिगृहात 'मल्टिपल शार्प फोर्स ट्रॉमॅटिक इंज्युरीज'मुळे मृत्यू झाला.
07:13 October 07
हिमस्खलन घटनेत दरडीतून एकूण 19 मृतदेह काढले बाहेर
उत्तरकाशी हिमस्खलन घटनेत दरडीतून एकूण 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रगत लाईट हेलिकॉप्टरने मृतदेह माटली हेलिपॅडवर आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. एकूण 30 बचाव पथके तैनात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
07:04 October 07
छठ पूजेपर्यंत विशेष रेल्वेच्या 2,269 फेऱ्या सुरू राहणार
सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. यावर्षी छठ पूजेपर्यंत 179 जोडी विशेष रेल्वेच्या 2,269 फेऱ्या सुरू राहणार आहेत.
06:43 October 07
उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल असताना आदित्य स्वित्झर्लंडमध्ये एन्जॉय करत होते-खासदार राहुल शेवाळे
उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल असताना आदित्य ठाकरे स्वित्झर्लंडमध्ये एन्जॉय करत होते, असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.
06:43 October 07
तिरुपती येथे 'बाग सावरी' उत्सव उत्साहात साजरा
तिरुमाला, तिरुपती येथे वार्षिक नऊ दिवसांच्या 'ब्रह्मोत्सवम' उत्सवाच्या समारोपाच्या दुसऱ्या दिवशी, 6 ऑक्टोबर रोजी 'बाग सावरी' उत्सव उत्साहात साजरा झाला.
06:40 October 07
उत्तर प्रदेश १५ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करावा- योगींचे आदेश
उत्तर प्रदेश १५ नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करावा, मुख्यमंत्री योगींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
06:09 October 07
Breaking news भारतीय कुटुंबाच्या हत्येतील संशयितास अमेरिकन पोलिसांकडून अटक
शिवसेनेचे दोन्ही दसरा मेळावे ( Dussehra Melawa ) आरोपांच्या फैरीनी गाजले. मात्र, या आरोपाची शाई वाळत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटाचा पहिला दसरा मेळावा ( Dussehra Melawa controversy ) वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.