- 'आर्यनची समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो' - एनसीबी
- पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो - एनसीबी
- एनसीबीनं केवळ आर्यन, अरबाझ आणि मुनमुनच्या अर्जावर उत्तर सादर केलं
- इतर पाच आरोपींच्या जामीनावर अद्याप उत्तर का नाही? वकिलांचा आक्षेप
- ज्या तीन जणांच्या जामीनावर उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश होते, ते आम्ही दिले - एनसीबी
- आमच्यावर कुणीही पक्षपातीपणाचा आरोप करू नये- एनसीबी
- इतरांच्या जामीनावर 22 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करू - एनसीबी
- मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज केवळ आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्याच जामीन अर्जावर सुनावणी
- आर्यन खानच्या वतीनं जेष्ठ कायदेतज्ञ अमित देसाईंचा युक्तिवाद
- रिकव्हरी केलेले ड्रग्स आर्यनकडून नाही तर चोकर, इस्मित आणि अरबाज यांच्याकडून रिकव्हर केले आहे - देसाई
- ड्रग्सचा वापर, विक्री आणि व्यापाराची माहिती तेव्हा आर्यन खानला नव्हती - देसाई
- तिन्ही आरोपींच्या जामीनावर युक्तिवाद संपल्यावर आम्ही युक्तिवाद करू - एएसजी अनिल सिंह
- एनसीबीनं काय केस बनवलीय, यापेक्षा सध्या आर्यन खानला जामीन मिळवून देणं आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा - देसाई
- 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खान एका निमंत्रणावरून त्या क्रुझवर गेला
- आतमध्ये प्रवेश करत असतानाच अचानकपणे NCB नं तिथं धाड टाकली
- त्यानंतर त्यांना शोध असलेल्या काही व्यक्तींचीच झाडाझडती सुरू केली
- त्यातनंतर एकापाठोपाठ एक अमली पदार्थ सापडत गेले
- एनसीबीनं खूप चांगलं काम केलंय असं दाखवलं गेलं, मात्र त्यांची माहीती चुकीची होती
- तपासात काही जणांकडे अमली पदार्थ सापडले, मात्र ते फारच कमी प्रमाणात होते
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यन खानकडे कोणताही अमली पदार्थ सापडलेला नाही
- आर्यन अमली पदार्थ इतरांमार्फत घेत होता, असा जर त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे
- हे आरोप सिद्ध करण्यासाठी मुळात आरोपींकडून अमली पदार्थ हस्तगत होणं गरजेचं असतं, जे इथं झालेलंच नाही - देसाई