ETV Bharat / city

BIG BREAKING NEWS : मागचे सरकार चावी नाही तर गाजर वाटप करायचे - आदित्य ठाकरे - 07 October BREAKING NEWS

maharashtra breaking news
maharashtra breaking news
author img

By

Published : Oct 7, 2021, 6:45 AM IST

Updated : Oct 7, 2021, 8:54 PM IST

20:49 October 07

मागचे सरकार चावी नाही तर गाजर वाटप करायचे - आदित्य ठाकरे

बीडीडी चाळीतील घरांच्या चाव्यांचे वाटप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील राजकीय वातावरण बदलायचे आहे. मागचे सरकार चावी नाही तर गाजर वाटप करायचे, आपण जे शब्द दिला आहे तो पाळला आहे. इथून कुठे जाऊ नका मुंबईत राहा असे आदित्य ठाकरे यांनी आवाहन केले.

19:21 October 07

'हा' तर अधिकाराचा अतिरेक - शरद पवार

बारामती - एखाद्या विषयासंबंधी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. परंतु, गुरुवारी (दि. ७) अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरी छापे टाकणे, हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. बारामतीतील गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते.

17:08 October 07

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन; पथकाकडून तपासणी सुरू

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा पणजी (गोवा) कंट्रोल रूमला एका अज्ञाताने फोन केला आहे. फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने तत्काळ बंद केले आहे. बॉम्ब शोध पथकाकडून मंदिर परिसराची तपासणी सुरू आहे. 

16:05 October 07

Cruise Drugs Party Case : आर्यन खानसह 8 जणांची एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत मागितली कोठडी

मुंबई: क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने 11 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा आणि इतर पाच जणांची कोठडी मागितली.

14:44 October 07

Cruise Drugs Party Case :आर्यन खानसह आठ जणांना थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार, NCB करणार रिमांडची मागणी?

मुंबई - आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा आणि इतर 5 जणांना आज (गुरूवार) रिमांडसाठी मुंबईतील न्यायालयात हजर केले जाणार आहे. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आर. एम. निर्लेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने त्यांना 3 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

12:28 October 07

नंदुरबारमधील आयान मल्टीट्रेंड एल.एल.पी. साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा

नंदूरबार- आयान मल्टीट्रेंड एल.एल.पी. साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा, पाच ते सहा अधिकारी कर्मचारी पथकाकडूनची तपासणी सुरू...

कारवाई बाबत मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही...

कारखान्याचे कार्यालय आतल्या बाजूस असल्याने तिथल्या घडामोडी अस्पष्ट...

12:27 October 07

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील वाद विकोपाला

चांदुर रेल्वेत काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहारच्या कार्यकर्यांची दगडफेक

निवडणूकीच्या विजयी जल्लोषात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा प्रहार कार्यकर्त्यांचा आरोप

हळलोखोर प्रहार कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मारहाण

हल्ला करणारे प्रहारचे कार्यकर्ते चांदुर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

11:50 October 07

डीबी रियालिटी आणि इतर काही बांधकाम कंपन्यांवर आयकर छापे

मुंबई, पुणे, सातारा, दौंड आणि कोल्हापूर येथील डीबी रियल्टी आणि इतर काही बांधकाम कंपन्यांवर आयकर छापे

11:12 October 07

BREAKING : साखर कारखाने घोटाळा प्रकरणी बारामतीतील बड्या नेत्याच्या निटवर्तीयाच्या घरावर छापेमारी

09:59 October 07

मुक्ताईनगर येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताई मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताई मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करून मंदिर उघडण्यात आले आहे

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद होते. आज संत मुक्ताईच्या जयंती दिनी तसेच नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला मंदिर उघडण्यात आल्याने भाविकांची दर्शनासाठी सकाळपासून लगबग सुरू आहे

09:42 October 07

येवल्यातील कोटमगावचे जगदंबा माता मंदिर राहणार बंद, नवरात्र काळात भाविकांना प्रत्यक्ष दर्शन नाही

राज्यातील मंदिरे आज खुली झाली असली तरी येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेचे मंदिर हे नवरात्र काळात बंदच राहणार आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सकाळी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. जगदंबा मातेच्या दर्शनाकरता नगर, औरंगाबाद, धुळे जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शन करता येत असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांची संख्या बघता गर्दी टाळण्याकरता जगदंबा मातेचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्ट व प्रशासनाने घेतला आहे. भक्तांना ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

09:11 October 07

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक घेतले मुंबादेवी देवीचे दर्शन

मुंबई फ्लॅश

कोरोनामुळे बंद ठेवलेली मंदिरे आज उघडण्यात आली

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील घेतले दर्शन

07:39 October 07

वीज अंगावर कोसळून तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू, जालन्यातील बरंजळा लोखंडे येथील घटना

भोकरदन:भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथे  बुधवारी ६ ऑक्टोंबर ३ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. कैलास नामदेव भोकरे( वय ३२ रा. बरंजळा लोखंडे) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कैलास भोकरे हा शेतकरी शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेला होता. त्यावेळी  पाऊस सुरू झाल्याने लिंबाच्या झाडाखाली थांबला असता, अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  त्याच्या पश्चात आई वडील ,पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

07:37 October 07

 एनसीबीच्या पथकाने एका नायजेरियन ड्रग्स पेड़लर्सला ताब्यात घेऊन एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणले

06:21 October 07

महाराष्ट्रात आजपासून भाविकांसाठी मंदिरे होणार खुली

06:09 October 07

BIG BREAKING NEWS : पती पत्नीच्या भांडणातून मुलाचा झाला मृत्यू

कोल्हापूर - जिल्ह्यात एका चिमुकल्याची हत्या झाल्यानंतर नरबळी असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र तर त्या चिमुकल्याचा मृत्यू हा नरबळीचा प्रकार नसून पती-पत्नीच्या भांडणात बळी गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर  आली आहे.  भांडणावेळी रागाच्या भरात वडिलांनी मुलाला हातोडा फेकून मारला आणि त्यातच मुलाचा मृत्यू झाला. या बाबत मुलाच्या वडिलाने पोलिसांसमोर कबुली दिली आहे. अवघ्या 48तासात त्या चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणाचा कोल्हापूर पोलिसांनी छडा लावला आहे.

Last Updated : Oct 7, 2021, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.