ETV Bharat / city

Maharashtra live updates today: गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारू आणली तरी मोक्का लावणार - शंभूराज देसाई

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Oct 3, 2022, 6:42 AM IST

Updated : Oct 3, 2022, 8:01 PM IST

20:00 October 03

नवऱ्यानेच केला बायकोच्या डोक्यात बॅटरी घालून खून

पालघर - आवढाणी येथे नवऱ्यानेच केला बायकोच्या डोक्यात बॅटरी घालून खून. 24 तासात आरोपीला पोलिसांननी केले जेरबंद.

19:47 October 03

गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारू आणली तरी थेट मोक्का - मंत्री शंभूराजे देसाईंचा इशारा

गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारू आणली तरी थेट मोक्का लावला जाईल. मंत्री शंभूराजे देसाई यांनी दारूबाजांना असा थेट इशारा दिला आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.

19:31 October 03

ठाण्यात वडिलांनी जाळलेल्या दोन मुलींचा अखेर आज मृत्यू

ठाणे - वडिलांनी जिवंत जाळलेल्या दोन मुलींचा सोमवारी महाराष्ट्रातील येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. डोंबिवली शहरातील बोपर भागात शनिवारी सकाळी घराला लागलेल्या आगीत समीरा शांताराम पाटील (14) आणि तिची बहीण समिक्षा (11) या 91 टक्के भाजल्या होत्या. त्यांची आई प्रीती (३५) यांचा रविवारी भाजल्याने मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

19:09 October 03

उल्हासनगरमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण

ठाणे - उल्हासनगर शहरातील कँम्प नंबर ३ परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये एका इमारतीमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आज लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

18:39 October 03

मुंबईतून तीन दहशतवाद्यांना अटक

दसरा मेळावे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर? मुंबईतून तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. सध्या कोरोनानंतर मोठ्या प्रमाणावर दसरा साजरा होत आहे. त्यातच दोन्ही गटाचे दसरा मेळावेही होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर ही कारवाई महत्वाची मानण्यात येत आहे.

18:23 October 03

अमित ठाकरे यांनी ठाण्यातील टेंभी नाका दुर्गेश्वरी देवीचे घेतले दर्शन

ठाणे - अमित ठाकरे यांनी ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेतले. अमित ठाकरे यांच्यासोबत मनसे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे नवी मुंबई येथील नवरात्री मंडळाना ते भेट देत आहेत.

18:11 October 03

काबूलच्या वर्गातील आत्मघातकी बॉम्बस्फोटात 46 मुली महिलांसह 53 ठार

काबूलच्या वर्गातील आत्मघातकी बॉम्बस्फोटात 46 मुली महिलांसह 53 ठार झाल्याची माहिती एएफपी न्यूज एजन्सीने यूएनचा हवाला देत दिली आहे.

17:32 October 03

कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून पत्नीसह मुलांना शीतपेयातून विष पाजून केली आत्महत्या

मुंबई - शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शकील जलील खान यांनी कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून राहत्या घरी पत्नीसह मुलांना शीतपेयातून विष पाजले. शकील जलील खान याने पत्नीच्या अंगावरील ओढणीने गळफास घेऊन स्वतः देखील आत्महत्या केली.

17:12 October 03

वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक सुरू

मुंबई - वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक सुरू. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी. धनुष्यबाण चिन्हाबाबत लढा लढण्याबाबत चर्चा सुरू. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना चिन्ह मिळू नये यासाठी शिंदे गटाची रणनीती. उद्धव ठाकरे यांनी चिन्ह वापरल्यास त्याला न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्याची शिंदे गटाची तयारी.

16:55 October 03

राहुल मुखर्जीने केला होता मोठा अपघात, सुनावणीत माहिती उघड

2010 ला राहुल मुखर्जीने एका गरोदरमहिलेला मोटरसायकलने उडवले होते. या अपघातामुळे गरोदर महिलेचे बाळ पोटातच गेले होते. मात्र या अपघाताची पोलिसात कोणतीही नोंद नाही. हे सर्व प्रकरण राहुल याने पैसा खर्च करून दाबले असा आरोप आज करण्यात आला. राहुलच्या वतीनं सोहेल बुद्धा या साक्षीदारानंच, पोलिसांना प्रकरण दाबण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते. त्या महिलेलाही मॅनेज केले होते. इंद्राणीच्या वकिलांनी याबाबत राहुलला प्रश्न विचारले. मात्र, राहुलने कानावर हात ठेवले. तसेच अपघात झाल्याचे मात्र कबूल केले. त्याचवेळी हा अपघात किरकोळ असल्याचा केला त्याने केला.

16:52 October 03

PFI प्रकरणातील संशयित पाचही आरोपींच्या एटीएस कोठडीत वाढ

मुंबई - PFI प्रकरणातील संशयित पाचही आरोपींची एटीएस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

16:41 October 03

रयत शिक्षण संस्थेला पवार शिक्षण संस्था द्या, खासदार उदयनराजे भोसले

सातारा - रयत शिक्षण संस्थेला आमच्या आजीने जागा दिली. त्यावेळी संस्थेचा अध्यक्ष किंवा चेअरमन हा राज्याचा मुख्यमंत्री असावा, असे नियमावलीत होते. परंतु, काहींनी नियमात बदल केला. त्यामुळे सर्वसामान्यांची संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेला 'पवार शिक्षण संस्था' नाव देऊन टाका, अशी उपरोधिक मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. रयत शिक्षण संस्थेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

16:12 October 03

इम्रान खान यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला रद्द

इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय मोठ्या खंडपीठाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती अथर मिनाल्लाह यांच्या नेतृत्वाखाली पीठाने हा निर्णय घेतला.

15:49 October 03

शीना बोरा इंद्राणीची मुलगी असल्याची कबुली

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा मुंबई सत्र न्यायालयात नवीन खुलासा केला आहे. मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तिने खुलासा केला आहे. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून प्रथमच शीना बोरा इंद्राणीची मुलगी असल्याची कबुली दिली आहे.

15:15 October 03

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वंते पाबो यांना जाहीर

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विलुप्त होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या जीनोमबद्दलच्या शोधांसाठी स्वंते पाबो यांना जाहीर करण्यात आले आहे.

15:02 October 03

बाँबने उडवून देण्याची धमक मिळालेले विमान अखेर चीनमध्ये सुखरूप पोहोचले

इराणपासून भारत आणि चीनमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या इराणच्या W581 विमानाने अखेर ग्वांगझूमध्ये सुरक्षित पोहोचले आहे. हे विमान बाँबने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

14:53 October 03

देशभरातील 200 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणार - रेल्वेमंत्री वैष्णव

औरंगाबाद - देशभरातील 200 रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधांसह नवीन रूप दिले जाईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी येथे ही माहिती दिली.

14:36 October 03

विरारमध्ये गरबा खेळणे उठले जिवावर, पिता पुत्राचा मृत्यू

विरार - विरारमध्ये गरबा खेळणे पिता-पुत्राच्या जीवावर बेतले आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवरात गरबा खेळत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्याच्या वडिलांनी व तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोसळले. त्यांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच दिवशी घरातील दोन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

14:26 October 03

उद्धव ठाकरे गट ही खरी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई - निवडणूक आयोगाकडे निर्णय प्रलंबित असला तरी उद्धव ठाकरे गट ही खरी शिवसेना आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी सांगितले. निवडणूक आयोगाकडे निर्णय प्रलंबित आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

14:15 October 03

विजय नायरच्या 4 दिवसांच्या वाढीव कोठडीची सीबीआयची मागणी

सीबीआयने विजय नायरच्या आणखी 4 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. रिमांडच्या कालावधीत त्यांनी सहकार्य केले नाही असा सीबीआयचा आरोप आहे. काही साक्षीदारांसमोर त्याचा जबाब घेण्यासाठी आम्हाला त्याच्या आणखी कोठडीची आवश्यकता आहे, असे सीबीआयने म्हटले आहे.

14:08 October 03

उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिले तर दसरा मेळाव्याला जाईन, राणेंची स्पष्टोक्ती

उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिले तर दसरा मेळाव्याला जाईन असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होेते.

11:57 October 03

मुलुंड येथे 25 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू

मुंबईमध्ये गरब्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलुंडमध्ये नवरात्रीनिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी गरबा खेळत असताना एका तरुणाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

11:51 October 03

पुण्याच्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस च्या महिला डब्याला किरकोळ आग

पुणे रेल्वे स्थानकातून निघणारी डेक्कन क्वीन या एक्सप्रेस ला मंकीहील परिसरात महिलांच्या डब्याच्या ब्रेक पॅडला किरकोळ आग लागल्याची घटना घडली. यामुळे काही वेळ भीतीच वातावरण होत. रेल्वे थांबवून महिलांना तातडीने बाहेर पडण्यास सांगितलं. यामुळं डेक्कन क्वीनला मुंबईत पोहचण्यास उशीर होईल. असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस ला लोणावळा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावरच महिलांच्या डब्या च्या ब्रेक पॅडला किरकोळ आग लागली. ही घटना सकाळी घडली आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महिलांनी तो डबा तातडीने खाली करण्यास सांगितला होता. मोटरमनने पाहणी करून करून काही वेळ एक्सप्रेस थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, ब्रेक पॅड ला किरकोळ आग लागल्याने ती विझवण्यात आली. मग, पुन्हा डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन काही मिनिटं उशिरा मुंबईला पोहचणार आहे

11:50 October 03

4.53 कोटी रुपयांचे 9115 ग्रॅम सोने जप्त

मुंबई विमानतळ कस्टम्सने 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी 4.53 कोटी रुपयांचे 9115 ग्रॅम सोने जप्त केले आणि सहा प्रकरणांमध्ये तीन जणांना अटक केली. खास डिझाईन केलेले जॅकेट, फ्लाइट, मिक्सर ट्रान्सफॉर्मर विंडिंग, ट्रॉलीची चाके, शूज आणि शरीरावर सोने लपवून ठेवलेले आढळले.

10:19 October 03

राहुल गांधी यांची म्हैसूर येथील सुत्तूर मठाला भेट

राहुल गांधी यांनी म्हैसूर येथील सुत्तूर मठाला भेट दिली. त्यांच्या चालू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान श्री शिवरात्री देशकेंद्र स्वामीजींची भेट घेतली.

09:21 October 03

मुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्त्वाची, धमकी देणाऱ्याला अटक- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याबाबतची माहिती आम्ही गांभीर्याने घेतली आहे. काल मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्त्वाची, त्यावर आमचे लक्ष असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

09:01 October 03

सेक्सटॉर्शेनच्या प्रकरणात आरोपीला अटक

बाह्य जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. सेक्सटॉर्शेनच्या फसवणुकीत सामील असलेल्या भरतपूर, राजस्थान येथील 23 वर्षीय आरोपीला अटक केली. पीडितेचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मॉर्फ करून आरोपी पैसे उकळायचे,

08:25 October 03

कोळसा डांबर कारखान्याला भीषण आग

भिलाई येथील कोळसा डांबर कारखान्याला रात्री उशिरा भीषण आग लागली. SDRF टीम, कारखाना मालक आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. बचावकार्य सुरू होते; आग नियंत्रणात आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कोणतीही जीवितहानी नाही. मालाचे नुकसान झाल्याची माहिती एएसपी शहर संजय ध्रुव यांनी दिली.

07:58 October 03

6 वर्षाच्या मुलाचा दोन माणसांनी दिला नरबळी

दिल्लीतील बांधकामाच्या ठिकाणी 6 वर्षाच्या मुलाचा दोन माणसांनी नरबळी दिल्याची घटना समोर आली आहे.

07:57 October 03

पंजाबी गायक अल्फाज रुग्णालयात दाखल

पंजाबी गायक अल्फाज जखमी झाल्याने त्याला पंजाबमधील मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

07:51 October 03

राहुल गांधींची म्हैसूर कर्नाटकातून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज म्हैसूर कर्नाटकातून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली. यात्रेचा केरळ टप्पा २९ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला होता.

07:21 October 03

दुर्गापूजेच्या मंडपात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू

दुर्गापूजेच्या मंडपात लागलेल्या आगीच्या घटनेतील मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे. 12 वर्षांचा मुलगा, 10 वर्षांचा मुलगा आणि 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती भदोहीचे डीएम गौरांग राठी यांनी सांगितले.

07:19 October 03

3 राज्यांमध्ये सुरू असलेले आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीचे रॅकेट उघडकीस

डीआरआयने 3 राज्यांमध्ये सुरू असलेले आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले. मुंबईतील फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये 'खाद्य वस्तू' म्हणून बनवलेल्या यूएस-मूळच्या पोस्टल खेपातून 2.36 कोटी रुपयांचे 5.3 किलो हायड्रोपोनिक विड जप्त करण्यात आले.

06:46 October 03

उद्धव यांच्या नेतृत्वाखालील गटाला दसरा मेळाव्याला परवानगी देण्याला आव्हान देणार नाही- मुख्यमंत्री

उद्धव यांच्या नेतृत्वाखालील गटाला दसरा मेळाव्याला परवानगी देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

06:33 October 03

Maharashtra live updates today मुलुंड येथे 25 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू

अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील तीन चारी जवळ राहत्या घरात एका अल्पवयीन मुलीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Last Updated : Oct 3, 2022, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.