मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातील गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागल्याने सोसायटी कॅम्पसमध्ये खळबळ उडाली. घाईघाईत सोसायटीच्या लोकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी आग लागली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सुरक्षा केबिनमध्ये आग लागली.
अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. या घटनेत अग्निशामक दलाचा एक कर्मचारी जखमी झाला आहे.
BREAKING : बोरिवलीतील गांजावाला इमारतीच्या सातव्या मजल्याला लागली आग, आग विझवताना कर्मचारी जखमी
12:37 September 04
बोरिवलीतील गांजावाला इमारतीच्या सातव्या मजल्याला लागली आग, आग विझवताना कर्मचारी जखमी
11:50 September 04
त्या उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात आरक्षण देण्याचा विचार - विजय वडेट्टीवार, मदत पुनर्वसन मंत्री
नागपूर - उत्तर भारतीया सोबत महाराष्ट्रातील लोकांचे रोटीबेटी व्यवहार वाढले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे जे अनेक वर्षे महाराष्ट्रात राहत आहेत, ज्यांचे जन्म महाराष्ट्रात झाले आहेच. अशांना आरक्षण देण्याचा विचार केला जात आहे. ही संख्या फार मोठी नाही. अनेक उत्तर भारतीय असे आहेत ज्यांना त्यांच्या राज्यात ओबीसीचा आरक्षण आहे, मात्र महाराष्ट्रात आडनावात नाही अशांसाठी हे विचार समोर आले आहे. त्यावर विचार होईल, असे मत मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले
ओबीसी आरक्षण संदर्भातल्या सर्वपक्षीय बैठकीत इंपेरिकल डाटा गोळा करण्याचा इतर राज्यांनी त्या संदर्भात काय पावले उचलली आहेत. याचा अभ्यास करण्याचा आणि तोपर्यंत निवडणुका न घेण्याचा मुद्दा चर्चेला आला आणि त्यावर सर्व पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
11:47 September 04
उत्तर भारतीयांना ओबीसींमध्ये आरक्षण मागणी निवडणुकीच्या तोंडावर मतांचे राजकारण - चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर - उत्तर भारतीयांना ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे, ही मागणी निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या राजकारणासाठी केलेली मागणी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले पण त्यांनी अजून मागणी केली नव्हती, पण आता केलेली ही मागणी म्हणजे निवडणुकीच स्टंट असल्याची टीका चंद्रशेखर बानवकुळे यांनी केली आहे.
केंद्रांना राज्यसरकारला अधिकार दिले आहे त्यानी निर्णय घ्यावा, मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला, धनगर आरक्षणाचे काही करत नाहीत, एकीकडे इतर समाजाचे आरक्षण अडचणीत आले असतांना ही नवीन मागणी करत आहेत, या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. महाविकास आघाडी सरकार विकासाच्या आधारावर फेल झाले आहे, म्हणून कोणीतरी उभे काहीतरी बोलते हा स्टंट असून, एक मागणी मागणी करतो दुसरा हो म्हणतो, लोकांना हे कळत असल्याचा टीका बावनकुळे यांनी केली.
10:10 September 04
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका नको - राष्ट्रवादी
जळगाव - ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणणे, त्यांना धमकावणे आणि त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांची बदनामी करण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे, हे आता सर्वांना माहिती झाले आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. ते चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जयंत पाटील आज चाळीसगावच्या दौर्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, अशी राष्ट्रवादीची देखील भूमिका आहे. त्यामुळे आता या विषयासंदर्भात कोणी काहीही वक्तव्य करणं योग्य नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनादेखील टोला लगावला.