पाकिस्तानचा डाव आटोपला; भारतासमोर १४८ धावांचे आव्हान
Breaking News पाकिस्तानचा डाव आटोपला; भारतासमोर १४८ धावांचे आव्हान - रोहित पवार ईडी चौकशी

21:36 August 28
पाकिस्तानचा डाव आटोपला; भारतासमोर १४८ धावांचे आव्हान
21:07 August 28
पाकिस्तानला सहावा धक्का
पाकिस्तानच्या 112 रणांवर सहा विकेट पडले असून, 16 ओव्हर पूर्ण झाल्या आहेत.
20:43 August 28
पाकिस्तानला तिसरा झटका; इफ्तिखार अह्मद आऊट
पाकिस्तानला तिसरा झटका बसला असून इफ्तिखार अह्मद आऊट झाला आहे.
19:04 August 28
भारत पाक महामुकाबल्याला सुरुवात
भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2022 मध्ये आज आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानसोबत करणार आहे. क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत आणि प्रत्येकजण खूप दिवसांपासून त्याची वाट पाहत होता. या सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
18:36 August 28
भायखळ्यात निवासी इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु
मुंबई - भायखळा पश्चिमेतील एका निवासी इमारतीला आग लागली आहे. आग कशामुळे लागली याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्याची माहिती आहे. शिवाय आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
17:15 August 28
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार
आज रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी वड्रा या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित आहेत. यात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १७ ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
16:12 August 28
सोनिया गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु
विविध निवडणुका आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी वड्रा या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित आहेत.
15:46 August 28
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भुज येथील चेक डॅमला दिली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भुज येथील चेक डॅमला भेट दिली आहे.
14:44 August 28
अखेर ट्वीन टॉवर इमारत जमीनदोस्त
सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर आज रविवारी या दोन्ही इमारती Twin Tower building Demolished पाडण्यात आल्या आहे. अवघ्या देशाचं लक्ष या इमारतींकडे लागले होते. अखेर या दोन्ही इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
13:34 August 28
सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील तीन आरोपी कर्लीजचा मालक एडविन न्युन्स, ड्रग्ज विक्रेता रामा मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
12:38 August 28
मोहित कंबोज यांची राष्ट्रवादी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका, म्हणाले, नवाब और राउट मत बनना...
मुंबई - संजय राऊत आणि नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत आपल्या शैलीत टीका केली आहे.
12:18 August 28
आज संध्याकाळी रंगणार भारत पाक महामुकाबला
आशिया चषक 2022 Asia Cup 2022 या स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघात होणार आहे. रविवारी म्हणजेच आज दुबई स्टेडियमवर दोन्ही देशांचे संघ आमनेसामने असतील. आज जेव्हा संध्याकाली साडेसातला क्रिकेटचा सामना सुरू होईल तेव्हा उन्हाळ्यात दुबईतील वातावरण वेगळेच रंग दाखवेल. मात्र, सोशल मीडियावर भारत-पाक India vs Pakistan सामन्याबाबत सट्टा लावला जात आहे. एकदा खेळ पुन्हा सुरू झाला की, भारत-पाकिस्तान संघर्षाचा उत्साह चाहत्यांना अधिकच गुंतवून ठेवेल.
11:51 August 28
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास गरज पडल्यास सीबीआयकडे सोपवला जाईल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती
भाजपा नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणात Sonali Phogat Murder Case अंजुना पोलिसांनी आणखी २ जणांना अटक केली आहे. गोवा पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून सोनाली फोगटला दिलेले ड्रग जप्त केले आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे ड्रग्ज दत्तप्रसाद गावकर याने पुरवले होते. आता या प्रकरणी गरज पडल्यास तपास सीबीआयकडे सोपवला जाणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिली आहे.
10:24 August 28
भुज येथे जनतेकडून पंतप्रधानांचे जोरदार स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील भुज येथील जनतेकडून जोरदार स्वागत करण्यात आले. 2001 च्या भूकंपात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मृतीवन स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
10:22 August 28
पाकिस्तानात पुरामुळे १ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू,
पाकिस्तानात पावसाने हाहाकार केला आहे. पुरामुळे १ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. अद्याप पाऊस सुरूच आहे
08:57 August 28
काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर होणार चर्चा
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज दुपारी 3.30 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या अंतिम वेळापत्रकावर चर्चा अपेक्षित आहे.
08:56 August 28
२३ वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक
पीएस आदर्श नगर अंतर्गत आझादपूर येथील केवल पार्क परिसरात २३ वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कलम 302 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
08:10 August 28
ट्विन्स टॉवर पाडण्यापूर्वी कुत्र्यांची एनजीओकडून काळजी, ५६० पोलीस घटनास्थळी तैनात
आज ट्विन्स टॉवर पाडण्यापूर्वी शेवटच्या क्षणी कुत्र्यांना वाचवण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. आम्ही आज जवळपास 30-35 कुत्र्यांना वाचवले आहे, आम्ही त्यापैकी प्रत्येकाला बाहेर काढण्याचे काम करत आहोत, असे एनजीओच्या कार्यकर्त्याने म्हटले आहे. 2.15 च्या सुमारास स्फोट होण्यापूर्वीच एक्स्प्रेस वे बंद केला जाईल. स्फोटानंतर अर्ध्या तासाने धूळ कमी झाल्यावर ते उघडले जाईल. इन्स्टंट कमांड सेंटरमध्ये 7 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. येथील वाहतूक तज्ज्ञ आमच्यासह सर्व गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून आहेत, असे डीसीपी राजेश एस यांनी सांगितले. या कामासाठी 560 पोलीस कर्मचारी, राखीव दलातील 100 लोक, 4 क्विक रिस्पॉन्स टीम आणि NDRF टीम तैनात आहेत.
08:10 August 28
वीर बालक स्मारकाचे आज होणार उद्घाटन
पंतप्रधान मोदी आज गुजरातमधील कच्छमध्ये वीर बालक स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत.
07:47 August 28
सोनाली फोगट खून प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक
सोनाली फोगट खून प्रकरण अंजुना पोलिसांनी रामा मांद्रेकर नावाच्या अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. या प्रकरणातील एकूण अटकेची संख्या पाच झाली आहे.
07:44 August 28
ट्विन टॉवर्सजवळ क्रेन दाखल, परिसर रिकामा करण्याकरिता पोलिसांकडून घोषणा
नोएडा येथील सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. घटनास्थळी क्रेन दाखल झाल्या आहेत.
07:29 August 28
नोएडा येथील ट्विन टॉवर पाडण्यापूर्वी जवळील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू
-
Uttar Pradesh | Police announce to vacate the area around Supertech Twin Towers in Sector 93A, Noida where cranes have started coming in. pic.twitter.com/ESyf4gFemm
— ANI (@ANI) August 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Uttar Pradesh | Police announce to vacate the area around Supertech Twin Towers in Sector 93A, Noida where cranes have started coming in. pic.twitter.com/ESyf4gFemm
— ANI (@ANI) August 28, 2022Uttar Pradesh | Police announce to vacate the area around Supertech Twin Towers in Sector 93A, Noida where cranes have started coming in. pic.twitter.com/ESyf4gFemm
— ANI (@ANI) August 28, 2022
नोएडा येथील ट्विन टॉवर पाडण्यापूर्वी खबरदारी घेण्यात येत आहे. जवळपासच्या दोन गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
07:10 August 28
काँग्रेसला आणखी धक्का
तेलंगणाती काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम ए खान यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
07:10 August 28
अबू धाबीला भेट देण्यात भारतीय आघाडीवर
2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत सर्वाधिक अबू धाबीला भेट देणाऱ्या प्रमुख प्रवाशांमध्ये भारतीयांचा समावेश आहे.
07:10 August 28
अब्दुल्ला शाहिद आज भारत दौऱ्यावर
संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद आज भारत दौऱ्यावर आहेत.
07:10 August 28
पत्रकार सिद्दीक कप्पन यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
पत्रकार सिद्दीक कप्पन यांच्या जामीन अर्जावर SC 29 ऑगस्ट रोजी सुनावणी करणार आहे.
07:10 August 28
भिवंडीत राम मंदिराची १२० फूट उंचीची प्रतिकृती
गणेशचतुर्थीच्या आधी भिवंडीतील ठाण्याच्या धामणकर नाका परिसरात अयोध्येच्या राम मंदिराची 120 फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे.
07:09 August 28
गणेश यात्रेसाठी सुरतमध्ये भक्तांची मोठी गर्दी
31 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थीच्या आधी गणेश यात्रेसाठी सुरतमध्ये रात्री उशिरा भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
07:09 August 28
जेपी नड्डा त्रिपुराच्या दौऱ्यावर
जे. पी. नड्डा यांनी उद्यापासून दोन दिवसीय त्रिपुरा दौऱ्याला सुरुवात केली आहे.
07:09 August 28
पूजा सिहागच्या पतीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
CWG कांस्यपदक विजेती पूजा सिहागच्या पतीचा रोहतकमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.
07:09 August 28
हिमाचल प्रदेशमध्ये 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
हिमाचल प्रदेशमध्ये 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव Gaiety थिएटरमध्ये सुरू आहे; जगभरातील 86 हून अधिक माहितीपट, लघु कथा आणि अॅनिमेशन चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत.
07:08 August 28
ट्विन टॉवर आज दुपारी होणार जमीनदोस्त
नोएडा येथील सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर्सचे मॉर्निंग व्हिज्युअल जे आज दुपारी अडीच वाजता पाडणार आहेत. एमराल्ड कोर्टचा एक भाग असलेले टॉवर्स बांधकामाबाबत अनेक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.
07:08 August 28
ट्रॅक्टर ट्रॉली पडल्याने एकाचा मृत्यू ५ जण बेपत्ता
यूपीतील हरदोई येथील गररा नदीत ट्रॅक्टर ट्रॉली पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर-ट्रॉलीसह 20 जण गररा नदीत पडल्याची माहिती आहे. त्यापैकी 14 जण वाचले आहे. बेपत्ता असलेल्या 5 लोकांचा शोध सुरू आहे.
06:28 August 28
Maharashtra Breaking News भुज येथे जनतेकडून पंतप्रधानांचे जोरदार स्वागत
मुंबई आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते व माजी मंत्री असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही सध्या कारागृहात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊतदेखील कारागृहात आहेत. त्यातच आता ईडीच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार MLA Rohit Pawar हे देखील आल्याचे दिसते आहे. रोहित पवार MLA Rohit Pawar यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी Green Acre Company investigated by ED करण्यास सुरुवात झाली आहे. विशे, म्हणजे यापूर्वीच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांची माहिती जाहीर करू असे सांगत इशारा दिला होता.
हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत आहे. क्षणोक्षणीचे अपडेट या पेजवर पाहा.
Etv Bharat Maharashtra news, Etv Bharat Marathi news, Maharashtra live news, Maharashtra breaking news, Maharashtra live update today