ETV Bharat / city

Maharashtra Breaking news साई संस्थानच्या नावाखाली भक्तांची ऑनलाइन फसवणुक, संस्थान प्रशासनाकडून कारवाईचे आदेश

author img

By

Published : Aug 21, 2022, 6:32 AM IST

Updated : Aug 21, 2022, 3:23 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking news

15:19 August 21

साई संस्थानच्या नावाखाली भक्तांची ऑनलाइन फसवणुक, संस्थान प्रशासनाकडून कारवाईचे आदेश

शिर्डीला येणारे भाविक विश्वासाने साईबाबा संस्थानच्या भक्त निवासातील रुम बुक करणे पसंत करतात. साई संस्थानकडूनही भक्तांना ऑनलाइन बुकींग करुनच शिर्डीत येण्याच आवाहनही केले जाते. मात्र साईभक्तांच्या आस्थेला आणि खिशाला खात्री लावण्याचे काम ऑनलाईन फसवणूक Online Cheat Sai Bhakta Niwas करणाऱ्याकडून आता केले जात आहे. साई संस्थानच्या द्वारावती भक्त निवासातील Devotee residence by Sai Sansthan खोल्या बुक करण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर एक मोबाइल नंबर दिला गेला आहे. साई संस्थान मार्फत चालविल्या जाणाऱ्या द्वारावती भक्त निवासाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत. रुम बुकींगसाठी 7602853094 या नंबरवर फोन केल्यानंतर रुम बुक करण्यासाठी क्रेडीट कार् द्वारे पेमेंट करा, असे सांगत पुढील प्रक्रिय करत भक्तांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

12:53 August 21

आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, राज्य अधोगतीला जात होते, राधाकृष्ण विखे पाटील

करवीर निवासिनी अंबाबाईचे, जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात आलो

काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहील आहे,

मंत्रिपदासाठी अस्तित्व राहिलं होतं,

पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वारस्य राहिलं ना पक्ष नेतृत्वाला राहिलंय

वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, यातून गुन्हेगारी वाढलेली आहे

याला थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल

अवैध वाळू उपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार

शिर्डी लोकसभा मतदार संघ हा राखीव आहे

पक्ष जो निर्णय घेतील त्या पद्धतीने काम करायचे आहे

आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, राज्य अधोगतीला जात होते, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

11:22 August 21

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने काल रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10:59 August 21

जयललिता यांचे उपचार योग्य वैद्यकीय पद्धतीनुसार, एम्स बोर्डाचे स्पष्टीकरण

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री, जयललिता यांचे उपचार योग्य वैद्यकीय पद्धतीनुसार होते. उपचारामध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत, असे एम्स बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे.

10:53 August 21

भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची करणार पाहणी

बारसू इथल्या माळरानावर सुरू आहे सर्वेक्षण

रिफायनरीसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांशी साधणार संवाद

रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षणासाठी केला आहे विरोध

10:44 August 21

रोज सकाळी सीबीआय ईडीचा हा खेळ सुरू, अरविंद केजरीवाल

ज्या वेळी सर्वसामान्य माणूस महागाईशी झुंज देत आहे, कोट्यवधी तरुण बेरोजगार आहेत, अशा वेळी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांसह बेरोजगारी आणि महागाईशी लढा दिला पाहिजे. त्याऐवजी रोज सकाळी सीबीआय ईडीचा हा खेळ सुरू करतात. अशा प्रकारे देशाची प्रगती कशी होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.

10:44 August 21

2024 मध्ये जनता त्यांना लूक आऊट नोटीस देईल, मनीष सिसोदिया

सीबीआयचे लूक आउट सर्क्युलर आज कोणाच्या विरोधात जारी करायचे याचा विचार पंतप्रधान करत आहेत हे दुर्दैव आहे. महागाई, बेरोजगारी यावर उपाय सांगणारा नेता आज देश शोधत आहे. 2024 मध्ये जनता त्यांना लूक आऊट नोटीस देईल, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.

10:42 August 21

तेलंगणातील प्रमुख नेत्यांची 23 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होणार

मुंगोडे पोटनिवडणुकीवर चर्चा करण्यासाठी तेलंगणातील प्रमुख नेत्यांची 23 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांची भेट घेतील तसेच केसी वेणुगोपाल आणि मणिकम टागोर यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.

10:31 August 21

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाजवळ आरे वाचवा आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान कॅडबरी जंक्शन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मार्फत आरे वाचवा आंदोलन सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरा जवळ होणार हे पहिलंच आंदोलन

पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात

10:15 August 21

दोन संशयित दहशतवाद्यांना आसाम पोलिसांनी केली अटक

अल कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट आणि अन्सारुल्ला बांग्ला टीमशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना काल रात्री पोलिसांनी गोलपारा जिल्ह्यात अटक केली. ही आसाम पोलिसांनी माहिती दिली आहे.

मुंगोडे पोटनिवडणुकीवर चर्चा करण्यासाठी तेलंगणातील प्रमुख नेत्यांची 23 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांची भेट घेतील तसेच केसी वेणुगोपाल आणि मणिकम टागोर यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील, असे सूत्रांनी सांगितले

10:12 August 21

ITBP द्वारे रिले लाँग रेंज पेट्रोल अमृतचे आयोजन

ITBP द्वारे रिले लाँग रेंज पेट्रोल अमृत आयोजित केले जात आहे. रिले LRP 1 ऑगस्ट रोजी लडाखमधील काराकोरम पासपासून सुरू झाली. सुमारे 7,575 किमी अंतर कापून 75 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशातील जेचपला येथे समाप्त होईल होणार आहे.

09:13 August 21

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध लुक आउट जारी

सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात नाव असलेल्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केले आहे.

08:52 August 21

वैष्णोदेवी यात्रा आज पुन्हा सुरू होणार

खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर वैष्णोदेवी यात्रा आज पुन्हा सुरू होणार आहे.

08:10 August 21

हिमाचल प्रदेशात पावसामुळे १३ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे १३ जणांना जीव गमवावा लागला आहे तर ६ जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या मदतीने शोधमोहीम आजही सुरू राहणार आहे.

08:10 August 21

नेपाळी गिर्यारोहक सानू शेर्पा यांचा विश्वविक्रम

नेपाळी गिर्यारोहक सानू शेर्पा याने जगातील सर्व 14 सर्वोच्च शिखरे दोनदा चढून विक्रम केला आहे. त्याने नेपाळमधील सर्व 8 शिखरे 8000 च्या वर चढली. तो देशात परत आल्यावर उत्सव साजरा करण्यात आला.

08:10 August 21

आठवड्यात युक्रेनियन लोकांना सतर्क राहण्याचा इशारा

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी येत्या आठवड्यात युक्रेनियन लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे कारण ते त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत. क्रिमियामध्ये ताज्या स्फोटात आणि अणुऊर्जा प्रकल्पाजवळ क्षेपणास्त्राने 12 नागरिक जखमी झाले आहेत.

08:10 August 21

समांतर टेलिफोन एक्सचेंज प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

केरळमध्ये समांतर टेलिफोन एक्सचेंज प्रकरणातील मुख्य आरोपी पीपी शबीरला अटक केली आहे. वर्षभरापासून तो फरार होता. सर्व आरोपींच्या खात्यांद्वारे एकूण ४६ कोटी रुपयांचा व्यवहार उघडकीस आला होता. या प्रकरणात चार आरोपी आहेत.

07:49 August 21

विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात मंत्रिमंडळात बदल

गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पूर्णेश मोदी आणि राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडून खाती काढून घेण्यात आली आहेत. राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे महसूल खाते आणि पूर्णेश मोदी (पूर्णेश मोदींचा पोर्टफोलिओ) यांच्याकडे रस्ते आणि बांधकाम खाते होते. राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे हर्ष संघवी यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पूर्णेश मोदींचा कार्यभार जगदीश पांचाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या टप्प्यांकडे अनेक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

07:13 August 21

तुर्कीमध्ये शनिवारी अपघातात किमान 32 लोक ठार

आग्नेय तुर्कीमध्ये शनिवारी अपघातात किमान 32 लोक ठार झाले आहेत.

07:12 August 21

कोडरमा भाजप आमदार नीरा यादव यांच्या घराजवळ गतिमंद व्यक्तीने फोडले फटाके

कोडरमा भाजप आमदार नीरा यादव यांच्या घराजवळ शिव नंदन नावाच्या व्यक्तीने फटाका फोडला. त्याला ताब्यात घेण्यात आले आणि तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या गतिमंद असल्याचे आढळून आले. आमदारांनी याबद्दल माहिती दिली आहे

07:12 August 21

गुंड प्रवीण यादवला सुरक्षा देण्याचे आदेश

न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला गुंड प्रवीण यादवच्या सुरक्षेची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

07:12 August 21

चीन नागरिकांकडून सुरू असलेल्या खंडणी रॅकेटचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

चीन, हाँगकाँग येथील सर्व्हरला वापरकर्त्यांचा डेटाबेस पुरवणाऱ्या खंडणी रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला.

07:11 August 21

ओडिशात ७० जणांना वाहून जाताना वाचविण्यात यश

केंद्रपारा जिल्ह्यातील महाकालपाडा येथे महानदीच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांची बोट समुद्राच्या मुखाजवळ वाहून गेल्याने 70 जणांना वाचवण्यात आले.

07:11 August 21

सोमाली सैन्याने हॉटेलवर जिहादी हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला केले ठार

सोमाली सैन्याने मोगादिशू हॉटेलवर जिहादी वेढा संपवला, बंदूकधारी ठार झाला आहे. सुरक्षा कमांडरने ही कारवाई 30 तासानंतर केली आहे.

07:11 August 21

गुजरातमध्ये जाणारा दारू तस्करीचा ट्रक राजस्थान पोलिसांकडून जप्त

गुजरात क्रमांकाचा एक ट्रक पंजाबमधून गुजरातकडे दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रक थांबवून त्याची झडती घेण्यात आली. त्यात दारूच्या शेकडो पेट्या घेऊन जात असल्याचे आढळून आले. ट्रक चालकाला राजस्थान पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

07:11 August 21

मुसळधार पावसामुळे राजौरी जिल्ह्यात दारहाली नदीला पूर

पीर पंजाल पर्वतराजीच्या वरच्या भागात मुसळधार पावसामुळे राजौरी जिल्ह्यातील दारहाली नदी ओसंडून वाहत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

07:11 August 21

इम्रान खान यांच्या भाषणावर पाकिस्तानात बंदी

इम्रान खान यांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण करण्यावर पाकिस्तानी माध्यमांनी बंदी घातली आहे

07:10 August 21

अलेक्झांडर डुगिनच्या मुलीचा मॉस्को कार अपघातात मृत्यू झाल्याची चर्चा

'पुतिनचा मेंदू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलेक्झांडर डुगिनच्या मुलीचा मॉस्को कार अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता होत आहे.

07:10 August 21

ग्वाल्हेरमध्ये तस्कराकडून 5 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

ग्वाल्हेरमध्ये एका शस्त्रास्त्र तस्कराला पकडण्यात आले. यापूर्वीच्या खटल्यांमध्ये त्याचा सहभाग होता आणि दोनदा तुरुंगात गेला होता. महिनाभरापूर्वी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. 5 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. तो ट्रेनमधून पंजाब आणि महाराष्ट्रात पिस्तूल घेऊन जायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

07:10 August 21

दूषित अन्न खाल्ल्याने १७ जण रुग्णालयात दाखल

कोनासीमा जिल्ह्यातील मंडपेटा येथे एका लग्न समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने १७ जण आजारी पडले. पीडितांना मंडपेटा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

06:34 August 21

कोयनासह सात धरणांमधून ४५ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग

सातारा कोयना धरणासह जिल्ह्यातील एकूण सात धरणांमधून ४५ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकट्या कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांमधून सर्वाधिक ३२ हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.

06:14 August 21

Maharashtra Breaking news आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, राज्य अधोगतीला जात होते, राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई 26 नोव्हेंबरसारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना आला Threat message to Mumbai Police होता. धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. यासंदर्भात तपास सुरु केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर Mumbai CP vivek phansalkar यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे Mumbai police alert आवाहन त्यांनी केले आहे. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती पसरली आहे. हे पेज दिवसभरात अपडेट होणार आहे. अपडेट बातम्यांसाठी हे पेज पाहत राहा आणि व्हा अपडेट. Read Maharashtra live news today

Maharashtra Breaking news, Live update on 21st August 2022

Last Updated : Aug 21, 2022, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.