सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे नवे आदेश जारी केले आहे.
MAHARASHTRA BREAKING : 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह 5 तालुक्यात कडक संचारबंदी - ekanath khadse
22:53 August 08
13 ऑगस्टपासून पंढरपूरसह 5 तालुक्यात कडक संचारबंदी
20:45 August 08
15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू होणार, मुख्यमंत्र्याची घोषणा
येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली आहे. मात्र यात ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांनाच परवानगी असणार आहे. तर लोकल पास मिळविण्यासाठी अॅपमध्ये नोंद करावी लागणार आहे. ज्याकडे मोबाईल नाही, अशाना महापालिकेमधून पास मिळवता येणार आहे. शिवाय राज्यातील निर्बंधात लकरच शिथिलता देण्याचा विचार सुरू आहे. ही शिथिलता देण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. उद्या (सोमवारी) टास्क फोर्ससोबत बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
17:01 August 08
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आठवड्यातील सहा दिवस सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आठवड्यातील सहा दिवस सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहणार, सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50% आसन क्षमतेसह काम करण्याची परवानगी रात्री 10 वाजेपर्यंत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय सर्व नियमांची शिथिलता 9 ऑगस्टपासून लागू राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ही रेट 7 टक्के पेक्षा अधिक झाल्यास निर्बंध कडक केले जाणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे. शिवाय दुकानदारांसह सेल्समॅनला विक्री करत असतांना मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणमधील दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
15:20 August 08
कोरोनाची दहशत उधळून लावायची आहे, मुख्यमंत्री ठाकरेंचे जनतेला आवाहन
14:15 August 08
सुशांत राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच कटकारस्थान होते; नवाब मलिकांचा आरोप
14:12 August 08
शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी मातोश्रीवर
13:06 August 08
गणपतरावां इतका स्वच्छ चारित्र्याचा नेता होणे हे महाराष्ट्राचे भाग्य - शरद पवार
शेतकऱ्यांसाठी तळमळ असलेले नेते म्हणजे गणपतराव देशमुख. माझ्या मंत्रिमंडळात गणपतराव देशमुख कृषी मंत्री होते, त्यावेळी त्यांनी कृषी मंत्री नाकरले होते, रायगड जिल्ह्यात हे पद देण्याचा आग्रह होता. गणपतराव देशमुख यांनी ग्रामीण भागातील माणसाला दोन वेळच्या अन्नाची गरज भासू नये त्यासाठी त्यांनी रोजगार हमी योजनाचे कार्यक्रम राबवण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या इतका स्वच्छ चारीत्र्याचा नेता होणे हे महाराष्ट्र भाग्य होते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली वाहिली.
11:19 August 08
शरद पवार सांगोला दौऱ्यावर, गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेणार
10:45 August 08
एम एस ई बी सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा - संजय राऊत
मुंबई - जे बिल सरकार आणता आहेत त्याच्यावर आमच्या पक्षात देखील चर्चा झाली . एम एस ई बी सारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे . त्याच्यावर राज्यांशी चर्चा झालेली नाही . कोणाशीही चर्चा न करता जर अशा प्रकारची विधेयक सरकार मंजूर करत असेल तर यावर सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे आहे. सध्या अधिवेशन चालू नाही त्याचाच फायदा घेऊन अशा प्रकारची बिल पास केली जात आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
10:42 August 08
वसईत औद्योगिक कंपनीतल्या बॅायलरचा भीषण स्फोट, १ कामगार ठार, ३ गंभीर
पालघर - वसईत औद्योगिक कंपनीतल्या बॅायलरचा भीषण स्फोट, १ कामगार ठार, ३ गंभीर घटना घडली. नेमुद्दीन सलमानी १८ असे मृताचे नाव आहे. तुंगारेश्वर फाट्याजवळील हेफ्ट इंजिनियरींग कंपनीतील घटना
तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका जोराचा होता की, कंपनीच्या भीतीला भगदाड पडले तर आजूबाजूच्या कंपनीतल्या साधनसामग्रीची नासधूस झाली आहे, भीषण स्फोटाचा शेजारील कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. वालीव पोलीस ठाण्यात कंपनीमालकाविरोधात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल
09:57 August 08
राष्ट्रीय तपास यंत्रणेची जम्मूमध्ये छापेमारी, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा प्रकरणी सुरू आहे कारवाई
09:57 August 08
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून या ठिकाणी अॅडमिट आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी खडसेंच्या पायावर शस्त्रक्रिया झालेली होती, त्यानंतर पुढील उपचारासाठी ते सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
09:17 August 08
त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेत, दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी- चित्रा वाघ
अकोल्यात १७ जून रोजी पीटा ॲक्ट नुसार पोलिसांनी कारवाई केलेली ज्यात एक अल्पवयीन मुलगी सापडली, तिला पोलिसांनी १९ वर्षाचं समजून सोडून दिले होते. मात्र, या ८ आठवड्याची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीवर अनन्वीत अत्याचार झालेत, पोलिसांनी या घटनेत अक्षम्य दुर्लक्ष्य केले आहे, त्यामुळे अकोला पोलिसांतील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
08:59 August 08
कोरोना काळात रेडिओ विश्वासने दिले नाशिक जिल्ह्यातील 50 हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
नाशिक - शहरातील कम्युनिटी रेडिओ विश्वास या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने रेडिओ विश्वासच्या माध्यामातून मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. या मुळे नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल 50 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे, अशी माहिती रेडिओ केंद्राचे संचालक हरी के यांनी दिली.
08:49 August 08
पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या २ आरोपींना विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या
विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला होता. या दोन्ही आरोपींना विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
08:45 August 08
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
राष्ट्रीय तपास यंत्रणेची जम्मूमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करण्यात येणाऱ्या संशयितांविरोधात ही कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळी जम्मूमध्ये बहुतांश ठिकाणी ही छापेमारीची कारवाई सुरू करण्यात आली.