ETV Bharat / city

BREAKING : राज्यातील मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत राहणार खुले, राज्य शासनाची नवी नियमावली जाहीर

MAHARASHTRA BREAKING
MAHARASHTRA BREAKING
author img

By

Published : Aug 16, 2021, 8:40 AM IST

Updated : Aug 16, 2021, 9:20 PM IST

21:20 August 16

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा, 40 हजारांचा दंड

अमरावती - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना न्यायालयाने तीन महिन्यांनी शिक्षा सुनावली असून ४० हजारांचा दंडही ठोठावला आहे. काही वर्षांपूर्वी आ. देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केले होते. कलम 353 अंतर्गत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

19:44 August 16

राज्यातील मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत राहणार खुले, राज्य शासनाची नवी नियमावली जाहीर

मुंबई - राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी. 18 वर्षांवरील सर्वांचे दोन लसीकरण व दुसऱ्या लसीनंतर 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.  18 वर्षांखालील सर्वांना वैध ओळखपत्राच्या आधारे प्रवेश. राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी.  18 वर्षांवरील सर्वांचे दोन लसीकरण व दुसऱ्या लसीनंतर 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक. 18 वर्षांखालील सर्वांना वैध ओळखपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. 

17:14 August 16

राज्यसभेतील 'तो' प्रकार म्हणजे संसद सदस्यांवरील हल्लाच होता - शरद पवार

मुंबई - राज्यसभेत झालेल्या गोंधळाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर माहिती दिली. सभागृहात घुसलेल्या मार्शलनी महिलांना धक्काबुक्की केली. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना अक्षरश: उचलले होते. यापूर्वी मी असा प्रकार कधीच पाहिला नव्हता. राज्यसभेत त्या दिवशी घडलेला हा प्रकार म्हणजे संसद सदस्यांवरील हल्लाच होता, असं शरद पवार यांनी सांगितले.

17:06 August 16

शेजाऱ्यांबाबत आपले परराष्ट्र धोरण किती प्रभावी राहिले, याचा आढावा घेण्याची वेळ - शरद पवार

मुंबई - राष्ट्रवादीचे प्रमुख आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना भारताच्या शेजारील देशांतील राजकीय परिस्थितीतील बदलाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, भारताचे परराष्ट्र धोरण असे आहे की,  पाकिस्तान आणि चीन वगळता सर्व शेजारी राष्ट्रांशी आपले चांगले संबंध होते. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकाशी आता परिस्थिती बदलली आहे. शेजाऱ्यांबाबत आपले परराष्ट्र धोरण किती प्रभावी राहिले आहे, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. पण हा एक संवेदनशील मुद्दा आहे, मी त्यावर जास्त बोलणार नाही. गरज पडल्यास आम्ही सरकारला पाठिंबा देऊ कारण ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे. 

16:55 August 16

केंद्राने जेवायला आमंत्रण दिले, पण हात बांधून ठेवले! केंद्राकडून ओबीसींची शुद्ध फसवणूक, शरद पवारांचा हल्लाबोल

मुंबई - केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्याने आता राज्यांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला असे अनेकांना वाटले. मात्र याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे,  असे सांगतानाच जेवणाचे  आमंत्रण  दिले पण हात बांधून ठेवले,  असा हा प्रकार असून केंद्राने ओबीसींची शुद्ध फसवणूक  केल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रावर केली आहे.

16:31 August 16

Maharashtra Rain : राज्यात पुढील तीन दिवस सरीवर-सरी, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

15:40 August 16

केंद्र सरकारने 50 टक्क्यांची मर्यादा उठल्याशिवाय राज्य आरक्षण देऊ शकत नाही - शरद पवार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले की,  घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारने ओबीसी समाजाचे नुकसान केले आहे. केंद्राने आरक्षणासाठीची 50 ट्क्क्यांची मर्यादा काढल्याशिवाय राज्य आरक्षण देऊ शकत नाही.  

14:55 August 16

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पारंपारिक आदिवासी नृत्यावर धरला ठेका

मुंबई - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पालघमधून सुरुवात झाली आहे. या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी पारंपारिक आदिवासी नृत्य करत ठेका धरला.

14:12 August 16

वैजापूर तालुक्यातील हिंगोनी गावात महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना मारहाण

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील हिंगोनी गावात महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना मारहाण, अभियंतासह  इतर कर्मचारी यांना बेदम मारहाण..

वैजापूर पोलिस ठाण्यात 5 व काही अज्ञात विरोधात गुन्हा दाखल.

13:50 August 16

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर काबूल विमानतळावर देश सोडून जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोक काबूल सोडून जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे विमानात चढण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शेकडोंच्या गर्दीत 5 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती वृत्त संस्थांकडून देण्यात येत आहे.

13:41 August 16

बेलापुरातून अल्पवयीन मुलीला पळवले, लव्ह जिहादचा आरोप करत हिंदूत्वावादी संघटनाचे आंदोलन

श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लागला नाही. या निषेधार्थ पुकारलेल्या श्रीरामपूर आणि बेलापुरात बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. या मुलीच्या अपहरणामागे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिदुत्ववादी संघटनांनी केला आहे.

12:59 August 16

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह, उपचारानंतर सोडले घऱी

11:57 August 16

मराठी नाट्य दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी पुण्यातून एकाला केली अटक

*मराठी नाट्य दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी पुण्यातून एकाला केली अटक,  गंगेश्वरी श्रीवास्तव असे त्या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे

11:26 August 16

गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरोधात मुंबई क्राईम ब्रँचने केला गुन्हा दाखल

कुख्यात गुंड छोटा शकीलचा भाऊ अन्वर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीच्या प्रकरणात मुंबईच्या गुन्हे विरोधी शाखेने हा गुन्हा दाखल केला आहे, याच बरोबर अन्य दोघां विरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

11:24 August 16

अफगाणिस्तानच्या हमीद करझाई विमानतळावरून व्यावसायिक विमानांची उड्डाणे रद्द

11:21 August 16

पवनदीप राजन ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल

अष्टपैलू गायक पवनदीप राजन बनला नवीन इंडियन आयडॉल! 

11:11 August 16

अखंड हिंदुस्थानचे स्वप्न हे भारतीय जनता पक्षाचा आहे, ते त्यांनी पूर्ण करावे - संजय राऊत

लालकृष्ण अडवाणी यांना जेव्हा जेव्हा आणि भेटलो तेव्हा तेव्हा आम्ही त्याच्या लाहोर आणि कराची आठवणी त्याच्यावर चर्चा केली आहे.  आज हिंदुस्तानात काही मोजके लोक आहेत त्यांच्या फाळणीच्या वेदना पाहिल्यात आणि अनुभवले आहेत. जे पंजाबमधून आले ,लाहोर मधून आलेले, पाकिस्तानातून आलेले ,सिंध प्रांतातून आलेले सर्वस्व गमावून येथे आले. त्यावर अनेक चित्रपट आणि पुस्तकं निघाली ती पण आम्ही प्रत्यक्ष कानांनी ऐकलेले आहे. 

पंतप्रधान म्हणतात 14 ऑगस्ट की वेदनेचा दिवस आहे व ही वेदना हे सदैव आम्हाला आहे. फाळणीची वेदना इंदिरा गांधी यांनी थोड फार कमी केली ती म्हणजे पाकिस्तानची फाळणी करून. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून दाखवून दिले होते.  अखंड हिंदुस्थानचे स्वप्न हे भारतीय जनता पक्षाचा आहे, ते त्यांनी पूर्ण करावं आणि ही वेदना त्यांनी कायमची दूर करावी, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

आमचे कश्मीरी पंडित आजही हजारोच्या संख्येने लोक निर्वासित आहेत. फाळणीच्या नंतर जे लोक इथे आले ते निर्वासित म्हणून जगले, आजही निर्वासितांच्या अनेक वस्त्या आहेत. आजही अनेक काश्मिरी पंडित हे निर्वासित म्हणून जगत आहेत त्यांची घरवापसी कधी होईल,असा सवाल राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे.

*आम्ही अखंड काश्मीर निर्माण करू तो दिवस उगवेल पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणलं जाईल तेव्हा ती आमची फाळणीची वेदना कमी होईल. आम्हाला फाळणीचे वेदना आहे आणि अस्वस्थ असतो मोदींनाही ती अस्वस्थता जाणवली त्यांनी लाल किल्ल्यावरून ते स्पष्ट केले. ही वेदना घेऊन चालणार नाही त्या वेदनेवर ते उपचार करण्यासाठी तुम्हाला अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आहे ते पूर्ण करावे लागेल. पाकव्याप्त काश्मीर किंवा कश्मीरी पंडित वापसीचा प्रश्न मार्गी लावावा लागेल, तरच ही वेदना कमी होईल असेही ठाम मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

*इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला तोडून बांगलादेश बनवला, पाकिस्तानचा त्यांनी भाषण केलं खूप मोठ्या मर्दानगीच काम इंदिरा गांधी यांनी केल होते. अशा पद्धतीचे काम जर हे सरकार करणार असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. फक्त 14 ऑगस्ट ला वेदना नाहीतर 365 दिवस त्या वेदनेला समोर ठेवू शकतो असेही राऊत म्हणाले.

11:11 August 16

तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र अफगाणिस्तान बरोबर सध्या जे सुरू आहे, त्याबाबत संपूर्ण जगाला चिंता लागून राहिली आहे. संपूर्ण जगात त्याचा काय परिणाम होईल अमेरिकेपासून रशिया पर्यंत आणि हिंदुस्तान पासून सगळीकडे चिंता लागली आहे. तालिबानी लोक हे डेमोक्रसी मानत नाहीत.

तालिबानने ज्या पद्धतीने कब्जा केला आहे, हिंदुस्थाननेही सावध व्हायला हवे,  अनेक देशातील लोक अफगाणिस्तानमध्ये अडकून राहिली आहेत. पाकिस्तानने नेहमीच तालिबानच समर्थन केले आहे. हिंदुस्थानातील व्यवहार, कायदे सुव्यवस्था या सगळ्याच बाबतीत हिंदुस्तानला तर सतर्क राहणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया अफगाणिस्थानातील संघर्षावर राऊत यांनी दिली आहे

11:04 August 16

चीन सोबतचे व्यापारी संबंध तोडा, सरसंघचालकांच्या मताशी आम्ही सहमत - संजय राऊत

मुंबई - जोवर आपण चीनवर अवलंबून आहोत, तोवर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागणार आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी राजचे समर्थन हे सर्वात आधी चीनने केले. चीन आजवर आपल्यासाठी डोकेदुखी बनून राहिला आहे. आजही आपले आर्थिक व्यवहार हे चीनवर अवलंबून आहेत. चीनची आर्थिक परिस्थिती आपल्यावर अवलंबून आहे. मोहन भागवत यांनी जे म्हटलं त्यावर सरकारने विचार करायला हवा, गलवानमध्ये आपले अनेक सैनिक मारले गेले तेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही हा मुद्दा उचलला होता, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

चीनसोबत असलेला ट्रेड आणि आर्थिक व्यवहार, व्यापार तो संपवायला हवा, आत्मनिर्भर होऊन चीन सोबतचे नातं तोडायला हवे, आत्मनिर्भर भारत असं जेव्हा पंतप्रधान म्हणतात तेव्हा चीनशी व्यापार तोडून आत्मनिर्भर होण्यास मार्ग हा तिथून सुरू होतो. मोहन भागवत यांच्या मताशी आम्ही सगळेच सहमत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

08:26 August 16

राणे, पवार, पाटील आणि कराड या केंद्रीय मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट या काळात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा १६ ते २१ ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा १९ ते २५ ऑगस्ट या काळात निघणार आहे. यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, कपिल पाटील यांची यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटर प्रवास करणार आहे. डॉ. भारती पवार यांची यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर एवढा प्रवास करेल. 

Last Updated : Aug 16, 2021, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.