ETV Bharat / city

भाजपचा एल्गार : शेतकरी, महिला सुरक्षतेबाबत सरकार अपयशी; भाजपचे राज्यव्यापी धरणे आंदोलन - उद्धव ठाकरे

भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यातील महाविकासआघाडी सरकार विरोधात मंगळवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून हे आंदोलन करण्यात आले.

BJP statewide Elgar agitation against state government
राज्य सरकार विरोधात भाजपचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
author img

By

Published : Feb 26, 2020, 12:52 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यातील महाविकासआघाडी सरकार विरोधात मंगळवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील अनेक शहरात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. याच राज्यव्यापी आंदोलनाचा घेतलेला आढावा..

महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजपचे राज्यव्यापी 'एल्गार' आंदोलन...

हेही वाचा... 'गृहमंत्र्यांना देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे जमत नसेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा'

धुळे : भाजपचे महाविकासआघाडी सरकार विरोधात धरणे आंदोलन

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपच्यावतीने संपूर्ण धुळे जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. भाजपने पुकारलेल्या धरणे आंदोलनाला संपूर्ण धुळे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

गोंदिया : माजी मंत्री राजकुमार बडोलेंच्या नेतृत्वात राज्य सरकार विरोधात धरणे आंदोलन

महाराष्ट्रात सध्या महाविकासआघाडीचे सरकार आहे. हे सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टीका करत, गोंदिया शहरासह इतर सात तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यलयासमोर धरणे आंदोलन केले.

जालना : भोकरदन तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात भाजपचे धरणे आंदोलन

महाराष्ट्रात मंगळवारी सर्वत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून भोकरदन तहसील कार्यालयासमोर महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद : राज्य सरकारच्या विरोधात भाजपतर्फे पैठणमध्ये 'एल्गार' आंदोलन

राज्य सरकारच्या धोरणांविरुद्ध तसेच राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे पैठण येथे मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.

भंडारा : राज्य सरकारच्या फसव्या अश्वासनांविरोधात भाजपचे आंदोलन

महाविकास आघाडीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने भाजपतर्फे मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात ठिय्या आंदोलन केले गेले. कर्जमाफी असो किंवा सानगृह अनुदान अथवा कायदा, सुव्यवस्था या सर्व पातळीवर सरकार अपयशी झाल्याचा आरोप, यावेळी करण्यात आला. भंडारा शहरातील जिल्हाधिकारी चौकात हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा... दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा

पुणे : राजगुरुनगरमध्ये महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजपकडून धरणे आंदोलन

भाजपचा विश्वासघात करून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. तसेच शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असे आरोप करत मंगळवारी भाजपच्यावतीने राजगुरुनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यवतमाळ : सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, भाजपचे जिल्ह्यातील 16 तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

जनादेशाचा अपमान करून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून सरकार स्थापन केले. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असे आरोप करत भाजपने यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.

पालघर : महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भाजपचा एल्गार

राज्य सरकार विरूद्ध भाजपकडून मंगळवारी राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वाडा तहसील कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले. तसेच पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यात सरकारविरोधात भाजपने एल्गार आंदोलन केले.

लातूर : महाविकासआघाडी सरकार विरोधात निलंग्यात भाजपचा 'एल्गार'

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकाराला सत्तेत आल्यानंतर दिलेल्या अश्वासनांचा विसर पडला आहे, असे सांगत त्या आठवणींची जाणीव करून देण्यासाठी निलंगा भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

हिंगोली : शासनाच्या विरोधात भाजपचा 'एल्गार', पाचही तालुक्यात धरणे आंदोलन

भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. तसेच आताचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत, भाजपने राज्य सरकार विरोधात एल्गार आंदोलन केले.

हेही वाचा... २६ फेब्रुवारी : याच दिवशी पडली होती इंग्रजाविरुद्धच्या लढ्याची पहिली ठिणगी

नाशिक : मनमाडमध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन

महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजपतर्फे पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मंगळवारी मनमाड भाजपच्यावतीने आंदोलन केले गेले. नांदगाव तालुका व मनमाड शहर भाजपतर्फे तलाठी कार्यलयावर धरणे आंदोलन करण्यात आले

सांगली : वाळवा तालुका भाजपच्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

महिलांवरील वाढते अत्याचार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्द्यांवरून वाळवा तालुका भारतीय जनता पक्ष आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

वाशिम : महाविकासआघाडी सरकार विरोधात भाजपकडून धरणे आंदोलन

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, अशा अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यभर भाजपच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. वाशिममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

नंदुरबार : आघाडी सरकार विरोधात तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

भाजपच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तहसील कार्यालयांसमोर राज्य सरकारच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले.

अमरावती : कर्जमाफी आणि महिला अत्याचार विरोधात अमरावतीत भाजपचे धरणे आंदोलन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची केवळ दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली. मात्र, ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात भाजपने राज्यभर एल्गार आंदोलन केले. अमरावती जिल्ह्यातही भाजपच्या वतीने तालुकास्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा... अतिदुर्गम आदिवासी गाव.. वीज-वाहतुकीची पुरेशी सोय नाही; तरीही कोमल बनली माडिया समाजातील पहिली महिला डॉक्टर

सातारा : सरसकट कर्जमाफीसाठी कराडमध्ये भाजपचे धरणे आंदोलन

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी भाजपच्यावतीने कराडमध्ये सत्तेतील आघाडी सरकार विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपच्यावतीने कराडच्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.

जालना : भाजपचे राज्य सरकार विरोधात आंदोलन, आंदोलनाला 'हायफाय' स्वरूप

राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत भाजपने मंगळवारी राज्यभर एल्गार आंदोलन पुकारले. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाला अगदी हायफाय स्वरूप प्राप्त झाले होते. कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या, पिण्यासाठी पाणी, सुसज्ज तंबू अशा अनेक सुविधा कार्यकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.