राज्यातील अनेक ठिकाणी महापुराने नुकसान झालेल्या भागासाठी आर्थिक मदत म्हणून पुणे महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागास देणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली, पुणे या जिल्ह्यातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
MAHARASHTRA BREAKING : राज्यात यंदाच्या पावसाने घेतला २५१ लोकांचा बळी, १०० जण बेपत्ता - अजित पवार पाहणी दौरा
21:58 July 26
पुण्यातील भाजपाचे 100 नगरसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देणार!
21:12 July 26
देशसेवा बजावितांना कळंबुचा सुपुत्र शहीद, सोनगीरला होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
धुळे - शहादा तालुक्यातील कळंबू येथील सुपुत्र असलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान निलेश अशोक महाजन यांचा मणिपूर येथे झालेल्या गोळीबारात जखमी झाल्याने उपचाराअंती निधन झाले आहे. त्यामुळे कळंबुचा सुपुत्र देशाचे कर्तव्य बजवितांना शहीद झाला आहे. ही माहिती कळंबु व सोनगीर येथे कळताच शोककळा पसरली. शहीद जवान निलेश महाजन हा लहानपणापासून मामांकडे राहत असल्याने तो धुळे तालुक्यातील सोनगीर येथे स्थायिक झाला होता. उद्या मंगळवारी (दि.27) रोजी सोनगीर येथे शहीद जवान निलेश महाजन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
21:09 July 26
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा, रोगराई पसरूनये यासाठी आरोग्य सुविधा देण्याचे निर्देश
मुंबई - पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, तसेच पूराबाबत इशारा देणारी ‘आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
20:04 July 26
राज्यात यंदाच्या पावसाने घेतला २५१ लोकांचा बळी, १०० जण बेपत्ता
- यंदाच्या पावसाने राज्यात घेतला २५१ लोकांचा बळी
- १०० लोक बेपत्ता, १०७ जखमी
- २५ हजार ५८१ जनावरांचा मृत्यू
- ४३ रस्ते, पुलाचे नुकसान
19:11 July 26
चिपळूणमधील वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी खुला; अवजड वाहनांना बंदी, नवीन पुलाच्या कामालाही वेग
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पूल महापुरात खचल्याने हा मार्ग पाच दिवस बंद होता. पूल खचलेल्या ठिकाणी तातडीने भराव व काँक्रीटीकरण करत हा मार्ग सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून सुरु केला आहे. परंतु या पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली असून त्यासाठी दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.
19:05 July 26
पिसा धरण ओव्हरफ्लो; दरड कोसळून तीन दिवसात १३ नागरिकांचे बळी
ठाणे - ठाणे जिल्ह्यातील ८ मोठी धरणे अजूनही काठोकाठ भरली नसली तरी ठाणे, भिवंडी व मुंबई महानगरपालिकेचे उदंचन केंद्र असलेला पिसा धरण ओव्हरफ्लो झाला आहे. भातसा धरणाच्या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून त्यातील पाणी उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. शहापूर व भिवंडी ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे हा बंधारा गेल्या २४ तासांपासून ओव्हरफ्लो झाला आहे. तर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीन दिवसात आतापर्यत १३ नागरिकांचे बळी गेले आहेत.
पुराच्या प्रवाहामुळे अनेक मार्गासह लहान मोठ्या पुलाचे नुकसान
गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात सर्वच नद्यांना पूर आला आहे. दरड कोसळून आतापर्यत १३ नागरिकांनी आपला जीव गमावला लागल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तर अनेक मार्गासह लहान मोठ्या पुलाचे पुराच्या प्रवाहामुळे नुकसान झाले असून काही प्रमुख मार्गावरील पुलाची युद्धपातळीवर दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.
19:04 July 26
साताऱ्यातील ६४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
- सातारा जिल्ह्यातील ६४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत
- ३६३ गावातील वीजपुरवठा सुरू, ५९ गावे बाकी
- भर पावसात वीज कंपनीचे दुर्गम भागात काम
19:00 July 26
नाशकातील 2 धरणं 100 टक्के भरली, 6 धरणांचा पाणी साठा 50 टक्के
नाशिक - नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे 2 धरणं 100 टक्के तर 6 धरणं 50 टक्के भरले आहे. भावली धरणापाठोपाठ नांदूरमध्यमेश्वर धरण देखील भरले 100 % भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 68 टक्के भरले आहे. मात्र, असे असले तरी शहरात पाणी कपात ही कायम आहे. अजून देखील जिल्ह्यात समाधानकाराक पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
18:43 July 26
राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस
मुंबई - कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली. तसेच संपूर्ण देशात एक कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने स्वत:च्या नावावर नोंदवल्याचा दावा केला आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तोंडभरून कौतुक केले.
17:35 July 26
पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार व 5 हजारांची धान्य मदत देण्यात येणार- विजय वडेट्टीवार
सांगली - महापूर आणि इतर आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यसरकार पथके निर्माण करून कायमस्वरूपी तैनात ठेवणार आहे. दरवर्षी पूरपरिस्थिती येणार असेल तर कायमस्वरूपी काही कुटुंबं, गाव आणि डोंगराच्या खालील गावांचे पुनर्वसन करण्यात येणार, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रोख आणि 5 हजारांची धान्य मदत देण्यात येणार ही प्राथमिक मदत आहे, अशी घोषणा विजय वडेट्टीवार केली.
17:25 July 26
वकील महिलेकडून 8 जणांविरोधात बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्याची तक्रार
मुंबई - मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात एका वकील महिलेने 8 जणांविरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार नोंदविली आहे. पीडित महिलेवर बलात्कार करून तिची अश्लिल व्हिडिओ क्लिप काढून महिलेकडे 50 लाखांची मागणी केल्याचा आरोपही महिला वकिलाने केला आहे. तसेच पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी केली होती. ऐवढ्यावरचं न थांबता आरोपींनी पीडितेचा चेहरा विद्रुप करून मारण्याची धमकी दिली.
17:14 July 26
अमरावती - गेल्या वर्षीचा पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. तब्बल दोन तासांपासून शेतकऱ्यांनी कार्यालयाचा घेतला ताबा आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कार्यालयाचा ताबा न सोडण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे. तसंच शेतकऱ्यांनी आत्मदहणाचाही इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्हा कृषी अधिकारीही शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसले आहे.
16:31 July 26
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी महाड येथे आपत्ती व्यवस्थापन मदत कार्याकरिता बेस्टची रेकर कम टोईंग व्हॅन पर्यवेक्षक, मेकॅनिक यांच्यासह पाठविली आहे.
16:16 July 26
आपत्ती परिस्थितीत मदत करण्यासाठी केंद्राने आपली जबाबदारी पार पाडवी- अजित पवार
सांगली-पुणे-बंगळूरु महामार्गावर पुराचे पाणी येत असल्याचे प्रकार समोर आल्याने त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्त्यांची उंची वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात येईल. तसेच महापूर आणि राज्यातील आपत्ती परिस्थिती मदत करण्यासाठी केंद्राने आपली जबाबदारी पार पडावी, राज्य सरकार मदत देण्यात तसू भर कमी पडणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
15:57 July 26
राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि मंत्री एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार- नवाब मलिक
15:50 July 26
पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी ४:३० वाजता वर्षा निवास्थानी आपतकालीन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल.
12:51 July 26
कोल्हापूर - NH-4 पुणे ते बेंगलोर या मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांची वाहतूक सुरू
NH-4 पुणे ते बेंगलोर या मार्गावर फक्त अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहनांची वाहतूक सुरु "पूर-परिस्थितीचा अंदाज घेऊन इतर वाहनांबाबत सायंकाळनंतर निर्णय घेण्यात येईल" - जिल्हा पोलीस प्रमुख
12:37 July 26
खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर परतले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कऱण्याकरिता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मात्र पुणे विमानतळावरून साताऱ्याकडे उड्डाण केल्यानंतर हवामान खराब असल्याने ते पुन्हा माघारी परतले आहेत. कोयना परिसरातील हवामान सध्या खराब आहे. त्यामुळे ते सध्या पुण्यात थांबले आहेत.
11:15 July 26
पूरग्रस्त नुकसान पाहणी दौरा , अजित पवार भिलवडीमध्ये दाखल
11:14 July 26
अजित पवार पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त नुकसान पाहणी दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्याहून सांगलीकडे मोटारीने रवाना. रविवारी साताऱ्यात होते मुक्कामी. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने दौरा रद्द करून मोटारीने ते सांगलीकडे रवाना झाले आहे.
07:57 July 26
कृष्णेची सांगलीतील आयर्विन पूल येथील पाणी पातळी 1 फुटाने उतरली
सांगली - कृष्णेची सांगलीतील आयर्विन पूल येथील पाणी पातळी 1 फुटाने उतरली - 53.5 इतकी सध्या पाणी पातळी आहे. शहरातील पाणीही ओसरू लागले. मात्र, त्याचा वेग अतिशय मंद असल्याने अद्याप रस्ते मोकळे झाले नाहीत
07:55 July 26
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, महाडचे माजी आ. माणिकराव जगताप यांचे निधन
माजी आमदार माणिकराव जगताप हे उत्तम संघटक होते, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली असून, मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना - अशोक चव्हाण
07:40 July 26
दक्षिण गोव्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 ऑगस्टपर्यंत कर्फ्यूमध्ये वाढ
07:32 July 26
हैदराबादला भूकंपाचे धक्के, रिश्टरस्केलवर 4.0 तिव्रतेची नोंद
दक्षिण हैदराबादच्या परिसरात आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टरस्केलवर या भूंकपाची तीव्रता 4.0 इतकी नोंदवली गेली आहे.
07:23 July 26
कोल्हापूर NH-4 हायवे : सद्यस्थितीत महामार्गावर अंदाजे तीन फूट पाणी कमी झाले. सदरचा महामार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे.
06:09 July 26
उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही दौरा
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार, दिनांक 26 जुलै, 2021 रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर, ता पाटण, जि.साताराकडे प्रयाण व हवाई पाहणी करणार आहेत. तसेच कोयनानगर परिसरातील महापुरातील बाधित लोकांच्या छावणीस भेट देऊन त्यांची विचारपूस व मदत वाटप करतील.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगली सातारा, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार आहेत. ते सकाळी 9.15 वाजता कोल्हापूर येथील शाहू सांस्कृतिक हॉलमधील पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्राला भेट देणार आहेत. त्यानंतर शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करून 10.15 वाजता प्रशासकीय बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तेथून ते हेलिकॉप्टरने शिरोळकडे प्रयाण करून दुपारी 12.00 वाजता शिरोळ परिसराची पाहणी करणार आहेत.