ETV Bharat / city

Maharashtra Assembly Winter Session 2021 : आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार? वाचा हिवाळी अधिवेशाचे ताजे अपडेट - Latest News Winter Session Maharashtra

Maharashtra Assembly Winter Session 2021

author img

By

Published : Dec 28, 2021, 10:10 AM IST

Updated : Dec 28, 2021, 12:41 PM IST

12:37 December 28

लोकप्रतिनिधींच्या वर्तवणुकीवर सुधीर मुंगटीवार बोलत आहेत

  • सभागृहात आपण सर्वांनी आचारसंहितेचं पालन करावं
  • आपण स्वत:च्या चुकीचे वकील आणि दुसऱ्यांच्या चुकीचे न्यायाधिश बनू नये
  • अधिकारी आम्हाला उत्तर देत नाही, त्यांच्यासाठीही आचारसंहिता तयार करावी.

12:27 December 28

सभागृहात देवेंद्र फडणवीस बोलत आहेत

  • प्रत्येकाला कायदेमंडळाचे महत्त्व समजलं पाहिजे
  • 12 महिन्यांसाठी सदस्यांचं निलबंन करणं चुकीचं याची जाणीव उपमुख्यंत्र्यांना आहे याचा मला आनंद
  • चुकीची घटना घडल्यास शिक्षा व्हावी

12:21 December 28

  • लोकप्रतिनिधींच्या सभागृहातील वर्तवणुकीवर अजित पवार विधानसभेत बोलत आहेत.
  • लोकप्रतिनिधींची वागणूक सुधारावी - अजित पवार
  • आपण कुत्रे, मांजर आदी प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही - अजित पवार
  • प्राण्यांचे आवाज काढणं हे जनतेचा अवमान आहे - अजित पवार
  • सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, अजित पवारांचे आवाहन - अजित पवार
  • सदस्यांनी सभागृहाची मर्यादा पाळावी - अजित पवार
  • कोणी चूकलं तर त्याला चार तास किंवा एक तास सभागृहाबाहेर राहण्याची शिक्षा द्यावी - अजित पवार

12:19 December 28

  • प्रत्येकाने सभागृहात नैतिकतेने वागावे - अजित पवार

11:48 December 28

  • भ्रष्टाचाराची चौकशी असलेल्या अधिकाऱ्यांची तपासणी करून दोन महिन्याच्या आत कारवाई केली जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच यासाठी विभागातील एक आमदार आणि संबंधित आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

11:44 December 28

उदय सामंतांचा माध्यमांशी संवाद

  • मुख्यमंत्री यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की एखाद्याची टिंगल करणं योग्य नाही म्हणून आम्ही राणेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. याबाबत अध्यक्ष निवडणूक घेतील.
  • विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. अध्यक्षांचं पद रिकामी असणं योग्य नाही, असे उदय सामंत म्हणाले.

11:43 December 28

  • विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू

11:42 December 28

  • विधानसभेचे कामकाज सुरू

11:08 December 28

काँग्रेसकडून व्हिप जारी

आज कार्यक्रम पत्रिकेत विधानसभा अध्यक्ष निवडणूक कार्यक्रम दर्शवला नसला, तरी विशेष बाब म्हणून जर निवडणूक झालीच तर धोका नको म्हणून कॉंग्रेसतर्फे व्हिप जारी करण्यात आला आहे.

10:48 December 28

  • हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू

10:45 December 28

  • राज्यपाल हे राज्य किंवा केंद्र सरकारचे नोकर नाहीत. हे घटनेने दिलेले पद आहे. राज्यपाल जर अश्याच पद्धतीने वागत असतील, तर कधी ना कधी राज्य सरकारला राज्यपाल यांच्या बरोबर दोन हात करावे, हे माझं वयक्तिक मत असल्याचे भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

10:33 December 28

  • अधक्षांच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांनी उत्तर द्यावे, अशी अपेक्षा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. जे नियम लोकसभेत आहे, तेच नियम केले आहेत. आम्ही कायदेशीर नियमात बदल केला आहे. त्यामुळे ज्यांना कोर्टात जायचे, त्यांनी जावे, आम्ही उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

10:30 December 28

विधानभवनाबाहेर दिलीप वळसे पाटील यांचा माध्यमांशी संवाद, काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

  • विधानसभा निवडणूक हा विषय माझा नाही, यावर संसदीयकार्य मंत्री बोलतील. राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. विधिमंडळ सार्वभौम आहे. सर्व अधिकार अध्यक्षांचे असतात, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसेच नितेश राणेंच्या अटकेसंदर्भात स्थानिक पोलीस निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

10:27 December 28

विधानभवनाबाहेर चंद्रकांत पाटलांचा माध्यमांशी संवाद, काय म्हणाले चंद्रकात पाटील?

  • आजच्या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नाही आहे
  • राज्यपाल व महाविकास आघाडी सरकार संघर्ष यावर बोलायला मी काही त्यांचा प्रवक्ता नाही
  • नितेश राणेंबाबतीत सरकार सुढ बुध्दीने वागत आहे. मनमानी कारभार चालू आहे
  • १२ आमदारांचे निलंबन गैरप्रकारे करण्यात आले होते. ज्याला घटनेचा काही पुरावाच नाही, त्याबाबत इतकी मोठी शिक्षा देणे हे चुकीचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

09:39 December 28

हिवाळी अधिवेशन 2021

मुंबई - हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटाचा दिवस आहे. नितेश राणेंच्या निलंबनावरून कालचा दिवस वादळी ठरल्यानंतर आज अध्यक्षांच्या निवडणुकीवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. काल अध्यक्षांच्या निवडणुकीची नवी नियमावली घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी म्हटले होते. त्यामुळे राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या वादाचे पडसाद आज विधानसभेत उमटण्याची शक्यता आहे.

Last Updated : Dec 28, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.