ETV Bharat / city

राष्ट्रवादी प्रचंड आशावादी !

सोमवारी मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांनी त्यांच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असा स्पष्ट अंदाज व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा एकदा विरोधी बाकावर विराजमान होण्याची शक्यताही वर्तवली आहे... मात्र राष्ट्रवादीला वेगळ्याच निकालाची अपेक्षा आहे...

राष्ट्रवादी प्रचंड आशावादी !
author img

By

Published : Oct 23, 2019, 10:40 AM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. निवडणुकीचा निकाल गुरूवारी २४ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधी कोणाच्या पारड्यात किती मते पडू शकतील याचे अंदाज बांधले जात आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यमांच्या मतदानोत्तर चाचण्या जाहीर झाल्या आहेत. राज्यात या संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार यंदा शिवसेनेला सर्वाधिक फायदा होताना दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र या सर्व अहवालांवर आक्षेप घेत निकाल वेगळे लागतील असे म्हटले गेले. यामुळे राष्ट्रवादीचा हा आशावाद पाहून 'राष्ट्रवादी पण प्रचंड आशावादी' असे म्हटले जात आहे...

हेही वाचा... शरद पवारांनी 15 दिवसात घेतल्या 60 सभा अन् दोन रॅली

काय सांगतायत एक्झिट पोल ?

सीएनएन न्यूज १८, एबीपी-सीवोटर, टाइम्स नाऊ, TV ९ - सिसेरो, झी- पोल डायरी, News १८-इपसोस, रिपब्लिक-जनता की बात आदी संस्थानी व माध्यम संस्थांनी केलेल्या सर्वेतून महाराष्ट्राच्या संभाव्य निकालाबाबत आकडेवारी मांडली. ताज्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये यंदा भाजपला १४६ जागा मिळताना दिसत आहेत. तर शिवसेनेला ८४, काँग्रेसला २१, राष्ट्रवादीला २७ आणि इतरांना १० जागा मिळताना दिसत आहेत. या सर्व्हेनुसार भाजपला यंदा २४ जागांचा लाभ होताना दिसत आहे. मात्र या सर्व एक्झि़ट पोल आणि चर्चांना राष्ट्रवादीने मात्र निरर्थक ठरवले आहे.

हेही वाचा... महाराष्ट्राच्या डोक्यावर शरद पवारांची 'छत्री', राष्ट्रवादीचे कार्टुन

राष्ट्रवादीला का वाटतंय निकाल वेगळा असेल?

2014 च्या चुका न गिरवता या वर्षी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणूकीपूर्वीच आघाडीची घोषणा केली. यामुळे बहुसंख्य ठिकाणी बंडखोरी टाळण्यात राष्ट्रवादीला यश आले. जागा वाटपानंतर महत्वाचा मुद्दा होता तो, उमेदवारीचा. याबाबतीत राष्ट्रवादीने कमालीचे राजकीय चातुर्य दाखवलेले दिसते. प्रामुख्याने पक्षाचे आमदारांचे मोठ्या प्रमाणात झालेले आऊटगोईंग अनुभवल्यानंतर राष्ट्रवादीने एका नव्या नेतृत्वाला उभारी देण्याचा मार्ग अवलंबला. यामुळे सर्वाधिक तरूण उमेदवारांची संख्या देखील राष्ट्रवादीत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांना हाताशी धरत राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. यामुळे या निवडणूकीत पक्षीय राजकारण आणि उमेदवारी बाबतीत राष्ट्रवादीने स्वतःला मोठ्या प्रमाणात संरक्षित करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा... शरद पवार आणि पाच आश्चर्य !

शरद पवारांचा झंझावात

निवडणुकीला दहा-बारा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवर सर्वत्र पवारच दिसत होते. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांनी पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले. एवढच नाही तर राज्यात काढलेल्या दौऱ्यातून पवारांनी तरुणांना आकर्षित करण्यात यश मिळवले. त्यातच ईडीनेदाखल केलेल्या गुन्ह्यामुळे पवाराविषयी आणखीच आकर्षण निर्माण झाले. त्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर पवारांनी साताऱ्यातील सभेत भर पावसात केलेले भाषण हे कार्यकर्त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मनावर कोरलं गेलं. त्याचा फायदा राष्ट्रावादीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे एकंदरीत निवडणूक प्रचारात पवारांचा झंझावात निर्माण झाला होता, हे सत्य आहे. यामुळे या सगळ्याचा फायदा राष्ट्रवादीला नक्की होऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे.

हेही वाचा... पवार साहेब! तुम्ही एकटे तरी किती लढणार...?

शेवटच्या दिवसांत चित्र फिरलं

एकीकडे अनेक एक्झिट पोलच्या माध्यमातून युती सत्तेत येईल, असे निश्चित मानले जात आहे. मात्र असे असले तरी ती २०० पार जाईल असे वाटत नाही. कारण प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसाता वातावरण फिरले आहे, असे वाटत होते. आघाडीमध्ये समर्थ नेतृत्व दिसून आले नाही, मात्र शरद पवार एकटेच मोठ्या हिमतीने किल्ला लढताना दिसून आले. काँग्रेसकडे नेतृत्वाची पूर्णतः वानवा होती, मात्र त्यांनीही शेवटच्या दिवसात बऱ्यापैकी जोर लागवला. त्यामुळे अशा स्थितीत आघाडीच्या काही जागा यंदा निश्चित वाढतील, असं वाटत आहे. याचे कारण, युतीच्या उमेदवारांमध्ये अंतिम टप्प्यात दिसून आलेला बेबनाव. अगोदर ज्या पद्धतीने एकतर्फी निवडणुकीचे चित्र वाटत होते तसे शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहू शकले नाही, त्याला युती मधील बेबनाव आणि अन्यही अनेक कारणे आहेत. त्यातच शरद पवारांनी प्रचारादरम्यान त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा होईल असे वाटत आहे.

हेही वाचा.... राज्यातील '75' मतदारसंघांचे भविष्य ठरवणार 'बंडखोर'

Intro:Body:

state news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.