मुंबई - चार महिने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मात्र, मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने ( Municipal Corporation ) रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार ( corporation does not have any measures save rain water ) आहे.
नागपुरात पावसाचा धुमाकूळ - नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी ( Nagpur rains update ) लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक ( Nagpur traffic update ) बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.
गडकरी म्हणतात पाणी साचायला नको - दरवर्षी शहरात अनेक भगत पाणी साचत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे आमदारांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन पावसामुळे पाणी साचणाऱ्या भागांची नोंद घेण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पाणी साचत असलेली रस्ते एनएमसीचे आहे की अजून कोणाचे याचा अहवाल तयार करण्याचे सांगत पुढच्या वर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी उपयोजना करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्या आहेत.
सततच्या पावसाने भाविकांची बाजाराकडे पाठ, पंढरपुरातील छोट्या व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट - आषाढी एकादशीच्या ( Ashadi Ekadashi ) सोहळ्या निमित्ताने पंढरपूरमध्ये ( Pandharpur ) भाविकांची प्रचंड गर्दी असते. आषाढी वारीमधून ( Ashadhi Wari ) लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. यानिमित्ताने येथील व्यावसायिकांचा व्यवसायही चांगला होतो. मात्र दोन-तीन दिवसांपासून पावसाला खंड पडत नसल्याने भाविक बाजारात येत नाहीत. त्यामुळे आपल्या दुकानामधील वस्तुंची विक्रीच होत नसल्याने येथील छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले ( Small Businesses In Financial Crisis ) आहेत.
मोठा वार्षिक सोहळा - संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा अध्यात्मिक सोहळा पंढरपूर ( Pandharpur ) येथे आषाढी एकादशी ( ( Ashadi Ekadashi ) निमित्ताने होत असतो. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भावी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दाखल होत असतात. ही वारी अध्यात्म बरोबरच मोठी आर्थिक उलाढाल करून जाते. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर मध्ये व्यवसायाची मोठी तेजी असते. विविध व्यवसायाच्या रूपाने कोट्यावधी रुपयांची वाढल पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त होत असते. मोठ्या व्यवसायकांबरोबर छोटे व्यवसायिक सुद्धा आषाढी एकादशीमध्ये चांगली आर्थिक उलाढाल करतात, परंतु पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे भाविकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
दोन दिवस सलग पाऊस - दोन दिवसाच्या रिमझिम पावसामुळे अनेक भाविक बाहेर पडलेच नसल्याचे चित्र दिसत असून छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात ( Small Businesses In Financial Crisis ) सापडले आहेत. यापूर्वीच्या आषाढी एकादशीमध्ये छोटे व्यवसायिक 50 ते 60 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल करत असत. त्याच व्यवसायांची गेल्या तीन दिवसापासून केवळ चार ते पाच हजार रुपये सुद्धा आर्थिक उलाढाल झाली नसल्याचे सांगत आहेत. एकंदरीतच कोरोनाच्या महामारीनंतर मोठ्या आशेने आषाढी एकादशीची वाट पाहणाऱ्या व्यवसायिकांमध्ये गेल्या दोन दिवसांच्या पावसाने नाराजी पसरली आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( continuous rains in Nashik ) आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील ( water storage in Nashik dams ) पाणी साठ्यात वाढ होत आहे. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पालखेड धरणातून 15 हजार 408 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात ( Palakhed Dam water release ) सुरू आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल असे, जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.
पावसाचा जोर कायम - नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुवाधार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 12 तासांत नाशिकसह परिसरात 57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर (दि १०) रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान 7.7 मिलिमीटर पाऊस झाला. यानंतर रात्री साडेदहा ते साडेअकरा दरम्यान 6.4 मिलिमीटर पाऊस झाला. तर रात्री साडेअकरा ते पहाटे 35.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गंगापूर धरणातून पाणी सोडणार - गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत झाली आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी 2 वा गंगापूर धरणातून 1 हजार क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपुरात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा - भारतीय हवामान खाते ( Indian Meteorological Department ) यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता 10, 11 व 12 जुलै 2022 या दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली ( forecast torrential rains for Chandrapur ) आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी ( IMD alert for Chandrapur ) केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह व विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी देखील वाढत असल्यामुळे नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन ( Chandrapur administration on IMD alert ) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन - धरण क्षेत्रात पडणारा पाऊस ( Rain in Chandrapurs dams ) व आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाकामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता दारे असणारे मोठ्या धरणाचे दारे केव्हाही उघडण्यात येऊ शकतात. दारे नसणारे धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावर नदी नाल्यातून पुराचे पाहणी वाहणार असल्याकारणाने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी - भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरणाबाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेवून सतर्क रहावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका. पुलावरून नदी नाल्याचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
नियंत्रण कक्षात संपर्क करावा- अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच अफवा पसरू नका. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका. घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या 07172 - 251597 या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.
हेही वाचा - Mumbai Rain : पावसाचे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडे उपाययोजना नाही