ETV Bharat / city

महाविकास आघाडी मजबूत आणि स्थिर, नाना पटोलेंनंतर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण

नाना पटोलेंनी स्वबळाच्या विधानानंतर थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र यानंतर नाना पटोलेंनी स्वतः स्पष्टीकरण देत महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असे म्हटले. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचे म्हटले आहे.

महाविकास आघाडी मजबूत आणि स्थिर, नाना पटोलेंनंतर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण
महाविकास आघाडी मजबूत आणि स्थिर, नाना पटोलेंनंतर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण
author img

By

Published : Jul 13, 2021, 12:34 PM IST

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वबळाच्या विधानानंतर थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र यानंतर नाना पटोलेंनी स्वतः स्पष्टीकरण देत महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असे म्हटले. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचे म्हटले आहे.

थोरातांचे स्पष्टीकरण

बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकार मजबूत असून तिन्ही पक्षांमध्ये कसलाही कलह नसल्याचे स्पष्ट केले. हे सरकार निश्चितपणे राज्याच्या विकासासाठी काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत नाना पटोलेंच्या विधानामुळे सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

नाना पटोलेंकडून सारवासारव

लोणावळ्यात केलेल्या विधानानंतर सुरू झालेल्या चर्चांनंतर सोमवारी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच मेळाव्यातील आपल्या विधानाचा विपर्यास केला जात आहे असे ते नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. महाविकास आघाडी एकदिलाने काम करत असून हे सरकार पाच वर्षे टिकेल यात कसलिही शंका नाही असेही पटोले म्हणाले.

सर्वांना आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार-पवार

दरम्यान काँग्रेसकडून दिल्या जाणाऱ्या स्वबळाच्या नाऱ्यावर बोलताना सर्वांना आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. काँग्रेस स्वबळाचा नारा देत असेल तर त्यात काहीही वावगे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवत आहोत, पक्ष नाही असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते पटोले

लोणावळ्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना नाना पटोलेंनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवरच आरोप केले होते. काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर राज्यातील महाविकास आघाडीत धुसफुस असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

हेही वाचा - भाजप चुकीच्या बातम्या पसरवत आहे - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.