ETV Bharat / city

मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंधाची मागणी; आरोपीला अटक - गोरेगाव फिल्मसिटी

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये क्राईम पेट्रोलसह डझनभर मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीचा चित्रपट निर्मिती नियंत्रक असलेल्या स्वप्नील लोखंडेने (40) विनयभंग केला. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडेने ( Swapnil Lokhande ) मालिकेत काम मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती.

Swapnil Lokhande
स्वप्नील लोखंडे
author img

By

Published : Dec 4, 2021, 7:31 AM IST

मुंबई - चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव स्वप्नील लोखंडे ( Swapnil Lokhande )आहे. अभिनेत्रीने चित्रपट निर्मिती नियंत्रकाविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे, कलम 354A, 509,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला गोरेगाव फिल्मसिटीच्या ( Goregaon Film city ) सेटवरून अटक करण्यात आली.

मालिकेत काम मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये क्राईम पेट्रोलसह डझनभर मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीचा चित्रपट निर्मिती नियंत्रक असलेल्या स्वप्नील लोखंडेने (40) विनयभंग केला. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान प्रोडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडेने मालिकेत काम मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. पीडितेने सांगितले, की मी सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत नंदिता पाटकरच्या बॉडी डबलवर काम करत आहे. एके दिवशी स्वप्नील लोखंडेने माझा फोन नंबर मागितला आणि मग त्याने मला विचारले की मी त्याच्यासोबत पुण्यात काम करायला तयार आहे का? मी हो म्हणाली आणि त्या बदल्यात मला काय देणार. मी कमिशन द्यायला हो म्हणाले. पण त्याला माझ्याशी शारीरिक संबंध हवे होते. हे ऐकून मी त्याला नकार दिला, त्यानंतर तो मला शिवीगाळ करू लागला आणि धमक्या देऊ लागला.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. क्राईम पेट्रोल, फुल सुगंधा मातीचा या मालिकांमध्येही काम केले आहे. पण मला असा अनुभव कधीच आला नाही. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.