ETV Bharat / city

Vaccination Against Lumpy Virus : 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व जनावरांचे लसीकरण; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मत - Vaccination of all animals in state

लंपी व्हायरस पासून जनावरांची सुटका व्हावी (Vaccination against lumpy skin disease) आणि जनावरे मृत्यृमुखी पडू नयेत यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात आलेली लसीकरणाची मोहीम (Vaccination against lumpy disease in Maharashtra) लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil on lumpy vaccination) यांनी व्यक्त केला आहे. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व जनावरांना लस देण्यात येणार आहे एकूणच येत्या 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यात एक कोटी चाळीस लाख जनावरांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Vaccination Against Lumpy Virus
Vaccination Against Lumpy Virus
author img

By

Published : Sep 26, 2022, 5:36 PM IST

मुंबई : लंपी व्हायरस पासून जनावरांची सुटका व्हावी (Vaccination against lumpy skin disease) आणि जनावरे मृत्यृमुखी पडू नयेत यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात आलेली लसीकरणाची मोहीम (Vaccination against lumpy disease in Maharashtra) लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil on lumpy vaccination) यांनी व्यक्त केला आहे. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व जनावरांना लस देण्यात येणार आहे एकूणच येत्या 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यात एक कोटी चाळीस लाख जनावरांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

७९६ जनावरे दगावली - आतापर्यंत राज्यात ७९६ जनावरे दगावली असून राजाने अद्याप योग्य नियंत्रण राखल्याचे त्यांनी म्हटले आहे. लंपी व्हायरस मुळे राज्यभरात पसरलेल्या जनावरांच्या साथीमध्ये अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत राज्यातील 796 जनावरे दगावली आहेत. अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिली.

जळगावात सर्वाधिक मृत्यू - लंपी या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील सर्वच 35 जिल्ह्यांमध्ये झाला आहे मात्र जळगाव जिल्ह्यात सर्वात अधिक झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील 165 जनावरे आतापर्यंत मृत्युमुखी पडली आहे त्या पाठोपाठ अकोला जिल्ह्यातील 124 जनावरांना जीव गमवावा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यात 84 जनावरे दगावली आहेत तर अमरावती जिल्ह्यात 80 आणि अहमदनगर जिल्ह्यातील 71 जनावरांना जीव गमवावा लागला आहे.

एक कोटी चाळीस लाख जनावरांचे लसीकरण - राज्य शासनाने लंबी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यभरात जनावरांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी लसीकरण मोहीम जोरदारपणे सुरू केली आहे. आतापर्यंत राज्यातील 60 लाख जनावरांना लस देण्यात आली आहे तर उर्वरित जनावरांना येत्या 3 ऑक्टोबर पर्यंत लस देण्यात येणार आहे एकूणच येत्या 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यात एक कोटी चाळीस लाख जनावरांना लस देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.