ETV Bharat / city

सायबर गुन्ह्यात मुद्देमालाची रिकव्हरी सर्वात कमी, आर्थिक राजधानीची 'ही' स्थिती - सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया न्यूज

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात दर दिवशी होत असते. कोरोना संक्रमणामुळे देशात डिजिटल बँकिंग व डिजिटल व्यवहार वाढले असून यामुळे सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक लूटही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र, यात गुन्ह्याचा तपास लावणे आणि त्यानंतर मुद्देमालाची रिकव्हरी करणे अत्यंत कठीण काम आहे. जाणून घेऊ याची कारणे..

सायबर गुन्हे लेटेस्ट न्यूज
सायबर गुन्हे लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Jan 8, 2021, 7:17 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात दर दिवशी होत असते. कोरोना संक्रमणामुळे देशात डिजिटल बँकिंग व डिजिटल व्यवहार वाढले असून यामुळे सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक लूटही मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

सायबर गुन्ह्यात मुद्देमालाची रिकव्हरी सर्वात कमी, आर्थिक राजधानीची 'ही' स्थिती

2019 मध्ये घडलेले सायबर गुन्हे

2019 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला असे दिसून येईल मुंबई शहरात 2019 तब्बल 2225 सायबर गुन्हे घडलेले आहेत . मात्र या घडलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये केवळ 284 प्रकरणातच आरोपींचा शोध घेत मुंबई पोलिसांनी मुद्देमालाची रीकवरी केलेली आहे. 2019 या वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये संगणकाच्या 2019 मध्ये संगणकाच्या सोर्स कोड संबंधी छेडछाड करण्याच्या प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये दोन प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे. तर, संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ला करण्याच्या 26 घटना घडलेल्या असून या 26 गुन्ह्यांपैकी केवळ एका प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावलेला आहे.

असाच काहीसा प्रकार सायबर फिशिंग किंवा नायजेरियन फ्रॉडच्या संदर्भात 2019 मध्ये पाहायला मिळाला आहे. 2019 मध्ये नायजेरियन फ्रॉड ,हॅकिंग , फिशिंगच्या संदर्भात 34 गुन्हे नोंदविण्यात आले होते मात्र यामध्ये केवळ 2 प्रकरणांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे. बनावट ई-मेल , एसएमएस किंवा एमएमएस पाठवण्या संदर्भात 2019 मध्ये 239 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, यामध्ये केवळ 104 प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केलेला आहे. सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाईल मोर्फिंग बनवून गुन्हे घडण्याचे 61 प्रकार 2019 मध्ये घडले आहेत. ज्यात 23 प्रकरणाचा छडा पोलिसांनी आतापर्यंत लावला आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2019 मध्ये तब्बल 775 क्रेडिट कार्ड फसवणुकीचे गुन्हे घडलेले आहेत. मात्र, यामध्ये केवळ 40 प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केलेला आहे. इतर सायबर प्रकरणांमध्ये 1087 गुन्हे 2019 मध्ये नोंदवण्यात आले होते, ज्यात फक्त 112 प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे.

हेही वाचा - सुशिक्षित गुन्हेगारांची वाढती संख्या, चिंतेचा विषय

2020 मध्ये घडलेले सायबर गुन्हे

2020 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला असे दिसून येईल मुंबई शहरात 2020 तब्बल 2216 सायबर गुन्हे घडलेले आहेत . मात्र या घडलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये केवळ 158 प्रकरणातच आरोपींचा शोध घेत मुंबई पोलिसांनी मुद्देमालाची रीकवरी केलेली आहे. 2020 या वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये संगणकाच्या सोर्स कोडसंबंधी छेडछाड करण्याच्या प्रकरणात एक गुन्हा दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला नाही. तर संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ला करण्याच्या 13 घटना घडलेल्या असून या 13 गुन्ह्यांपैकी केवळ एका प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावलेला आहे.

सायबर फिशिंग किंवा नायजेरियन फ्रॉड च्या संदर्भात 28 गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र, यामध्ये केवळ 4 प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे. बनावट ई-मेल , एसएमएस किंवा एमएमएस पाठवण्या संदर्भात 215 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, यामध्ये केवळ 77 प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केलेला आहे. सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाईल मोर्फिंग बनवून गुन्हे घडण्याचे 28 प्रकार घडले असून यात 6 प्रकरणाचा छडा पोलिसांनी आतापर्यंत लावला आहे. 515 क्रेडिट कार्ड फसवणुकीचे गुन्हे घडलेले आहेत. मात्र यामध्ये केवळ 15 प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केलेला आहे. इतर सायबर प्रकरणांमध्ये 1416 गुन्हे नोंदवण्यात आले होते, ज्यात फक्त 55 प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे.

तपास अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट - अ‌ॅड धनराज वंजारी

मुंबई पोलीस खात्यातील माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्या मतानुसार सायबर गुन्हेगारी ही पोलीस तपासाच्या दृष्टिकोनातून अतिशय गुंतागुंतीची व क्लिष्ट प्रकारची आहे. एखाद्या व्यक्तीसोबत सायबर गुन्हेगारी घडली असेल किंवा ऑनलाइन फ्रॉड झाला असेल तर त्याची माहिती पोलिसांना काही विशिष्ट वेळेत देण्यात यायला हवी मात्र बऱ्याच वेळा पीडित व्यक्तींकडून पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा उशिरा नोंदवला जात असल्यामुळे सायबर गुन्हेगारांचा शोध घेणेही पोलिसांसाठी तेवढेच आव्हानात्मक होऊन बसते. सायबर गुन्हेगारीत गुन्हा करणारा व्यक्ती हा फक्त देशातच नाही तर, परदेशात बसून सुद्धा ही गुन्हेगारी करू शकतो. त्यामुळे केवळ आयपी ॲड्रेस किंवा युआरएलवरून या सायबर गुन्हेगारांचा शोध घेणे खूपच कठीण होऊन बसते. परिणामी, या प्रकरणात मुद्देमालाची रिकव्हरी करणे तेवढेच अवघड असल्याचे धनराज वंजारी म्हणतात.

पोलिसांना इतर संस्थांकडून वेळेत मदत मिळत नाही - रितेश भाटिया

सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांच्या मतानुसार सोशल मीडिया कंपनी व बँक यांच्याकडून पोलिसांना गरज पडल्यावर तत्‍काळ सहकार्य मिळत नसल्यामुळे बर्‍याच वेळा सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यास विलंब होत असल्याचाही रितेश भाटिया यांनी म्हटले आहे. यामुळे सायबर पोलिसांसोबत एक चांगली भागीदारी सोशल मीडिया कंपनी, बँक व संबंधित विभागांची असायला हवी, असेही भाटिया यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मुंबई पोलीस सायबर विभाग : अशी आहे सध्याची स्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.