ETV Bharat / city

Loudspeaker Sale in Maharashtra : भोंगा राजकारणात राज्यातील भोंगे विक्रेत्यांना 'अच्छे दिन'; पुण्यात मात्र विक्रीत घट - महाराष्ट्रात भोंग्यांवरून राजकारण तापले

राज ठाकरे (Raj Thackeray on Loudspeakers) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी भोंग्यांबाबतची (Maharashtra loudspeaker controversy) भूमिका मांडली होती. तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापत चालले आहे. मात्र, याच भोंग्याच्या राजकारणाचा फायदा भोंगे विक्रेत्यांना (Loudspeaker Sale Hike in Maharashtra) झाला आहे. मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये भोंगे विक्रीत वाढ झाली आहे. तर पुण्यात मात्र भोंगे विक्रीत घट झाल्याचे 'ई टीव्ही भारत'च्या तपासणीत समोर आले आहे.

Loudspeaker Selling
भोंगा फाईल फोटो
author img

By

Published : Apr 20, 2022, 7:54 PM IST

Updated : Apr 20, 2022, 10:41 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Loudspeakers) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी भोंग्यांबाबतची (Maharashtra loudspeaker controversy) भूमिका मांडली होती. तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापत चालले आहे. मात्र, याच भोंग्याच्या राजकारणाचा फायदा भोंगे विक्रेत्यांना (Loudspeaker Sale Hike in Maharashtra) झाला आहे. भोंगे विक्रीसंदर्भात ई टीव्ही भारतने राज्यातील अनेक महत्त्वांच्या शहरांमध्ये आढावा घेतला आहे. यात असे दिसून आले की भोंगा राजकारण सुरू झाल्यापासून भोंग्यांच्या विक्रीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भोंगे विक्रेत्यांना सध्या अच्छे दिन (Maharashtra loudspeaker Businessman Reaction) आलेत.

हेही वाचा - Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर पुण्यात भोंगे विक्रीत घट

मुंबईतील भोंगे विक्रेत्यांना अच्छे दिन - मुंबईतील ग्रँड रोड परिसरात लॅमिंग्टन रोड येथे मागील तीस ते चाळीस वर्षांपासून भोंग्यांचा व्यापार करणारे शाहिद शेख सांगतात की, "हे सर्व राजकारण सुरू आहे आणि त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर देखील झालाय. आमचा व्यवसाय तसा सिजनल आणि नेहमीच मंदीत असतो, कधी सणवार आले तरच जास्त प्रमाणात भोंग्यांची विक्री होते. हे राजकारण सुरू होण्याआधी आमचे महिन्याला साधारण 20 ते 25 भोंगे विकले जायचे. आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर मात्र दोनच दिवसात आमचे जवळपास 150 ते 200 भोंग्यांची विक्री झाली आहे. इथल्या सर्वच दुकानदारांच्या विक्रीत वाढ झाली आहे. हे विकत घेणारे देखील सर्व राजकारणीच आहेत."

हेही वाचा - Village Without Loudspeaker : 'या' गावात पाच वर्षापासून भोंगाबंदी.. गावकऱ्यांनी एकमताने घेतला निर्णय

अमरावतीत भोंगे विक्रीत 30 टक्के वाढ - दुसरीकडे अमरावती शहर आणि जिल्ह्यातही भोंग्यांची विक्री वाढली (Loudspeakers Sale Hike in Amravati) आहे. अमरावती जिल्ह्यात मागील 10 ते 15 दिवसात 25 ते 30 टक्के भोंग्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे एकप्रकारे भोंगे विक्रेत्यांसाठी आता अच्छे दिन आले असेच म्हणावे लागेल. रमजान निमित्ताने भोंग्यांची विक्री तेजीत आहे. यासोबतच हनुमान जयंतीच्या पर्वावर अमरावती शहरासह ग्रामीण भागात भोंग्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती अमरावती शहरातील जोशी ब्रदर्स या साऊंड सिस्टिम प्रतिष्ठानचे संचालक राम जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

औरंगाबादेत भोंगे विक्री वाढली - औरंगाबादेतही भोंग्यांची विक्री वाढली आहे. मात्र, त्याचे कारण राज ठाकरे यांचे भाषण नसल्याचे मत तेथील भोंगे विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. यंदा भोंगे विक्री वाढली आहे. मात्र, राज ठाकरे किंवा राजकीय पक्ष यांच्यामुळे नाही, अशी माहिती शहागंज येथील व्यावसायिक कुशल खंडेलवाल यांनी दिली. दरवर्षी रमझान महिन्यात मशीदमधील देखभाल दुरुस्ती केली जाते. त्यावेळी खराब झालेले भोंगे दुरुस्ती केली जाते किंवा बदलले जातात. त्यात एप्रिल आणि मे महिन्यात महापुरुषांच्या जयंती, राम नवमी, हनुमान जयंती असे सण येतात, म्हणून दरवर्षी या दोन महिन्यांमध्ये भोंग्यांची विक्री वाढलेली असते, असेही खंडेलवाल म्हणाले.

हेही वाचा - Loudspeaker Controversy : भोंगा राजकारणात रस नाय, आम्ही भले अन् आमचा व्यवसाय भला; भोंगे व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया

पुण्यात भोंगे विक्री 90 टक्के घटली - पुणे मात्र याला अपवाद आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबतीत घेतलेल्या भूमिकेने पुण्यात भोंग्यांच्या विक्रीत तब्बल 90 टक्के घट झाली ( loudspeaker Sales Decreased in Pune ) आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक मार्केट आहेत. या ठिकाणी वेगवेगळे इलेक्ट्रिक वस्तू विक्री केली जातात. यात भोंग्याची देखील विक्री केली जाते. राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर शहरातील मार्केटमध्ये भोंगे विक्रीत कमालीची घट झाली आहे. महिन्याला जे काही 20 ते 25 भोंग्याची विक्री होत होती ती आता 5 ते 10 भोंगे विक्री होत आहे, अशी माहिती यावेळी विक्रेत्यांनी दिली आहे.

नागपुरातील भोंगा विक्रेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया - राज्यात भोंग्यावरून 'राज'कारण चांगलेच ढवळून निघाले (Maharashtra Loudspeaker Controversy) आहे. यातच बाजारात भोंग्याची विक्री वाढली (Loudspeaker Sale in Nagpur) तर काही ठिकाणी दुकानात येत्या आठ दहा दिवसांत नवीन भोंगे पाहिजे अशी मागणी दर्शवली आहे. पण पूर्वीच्या तुलनेत भोंगे आता सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कमीच लावले जात आहे हेही खरे आहे. या चार आठ दिवसात जरी विक्री काही प्रमाणात वाढली हे खरे असले तरी या व्यवसायात काम करणारे सांगतात. लोकांचा कल आता कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाऐवजी स्पष्ट आवाज असणारे साऊंड सिस्टमकडे अधिक आहे.

Last Updated : Apr 20, 2022, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.