मुंबई - शुक्रवारी पुण्यातील 5 हजार 647 घरांसाठी लॉटरी फुटणार आहे. या लॉटरीत ९२ हजार ३३५ पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत. महत्वाचे म्हणजे यावेळी 68 भूखंडाची ई लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची म्हाडाकडून सांगितले आहे.
अजित पवारांच्या हस्ते लॉटरीचा शुभारंभ -
पुणे मंडळाने पुणे, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पातील 5 हजार 647 घरांसाठी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन अर्ज मागवले होते. याला इच्छुकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळेच या लॉटरीसाठी 92 हजार 335 अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे आता हे इच्छुकांपैकी कुणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार हे उद्या समजेल. उद्या सकाळीकॅन्टोन्मेंट येथील नेहरू मेमोरियल हॉल येथेऑनलाइन लॉटरी होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लॉटरीचा शुभारंभ होणार आहे. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत.
लॉटरीचे वेबकास्टिंग -
म्हाडाच्या लॉटरीचे नेहमीच लाईव्ह वेबकास्टिंग होते. त्यानुसार उद्याच्या लॉटरीचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. http://bit.ly/PuneLottery2021 या लिंकवरून या लॉटरीचे थेट प्रेक्षपण केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेबकास्टिंग महत्वाचे ठरणार आहे. तर https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उद्या सायंकाळी 6 वाजता लॉटरीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.