ETV Bharat / city

Saint Narhari sonar Jayanti : विठ्ठलाने घेतली होती श्री संत नरहरी सोनार यांच्या भक्तीची परीक्षा; जाणून घ्या - श्री संत नरहरी सोनार जयंती

श्री संत नरहरी सोनार ( Saint Narhari sonar ) यांच्या साक्षात्काराची कथा आपल्यामधील अनेकांना माहित नाही. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा, वारकरी संप्रदायाचा म्हणावा तसा प्रचार होत नाही. भाविकांमधील हरि-हराचा वाद मिटवण्यासाठीश्री संत नरहरी सोनार हे आयुष्यभर झटले. शिव उपासक असूनही जीवन विठ्ठलमय केले.

Saint Narhari sonar Jayanti
श्री संत नरहरी सोनार जयंती
author img

By

Published : Aug 10, 2022, 11:43 AM IST

मुंबई - भाविकांमधील हरि-हराचा वाद मिटवण्यासाठीश्री संत नरहरी सोनार हे आयुष्यभर झटले. शिव उपासक ( Lord Shiva Devotee ) असूनही जीवन विठ्ठलमय केले. माघ वद्य तृतीयेला नरहरी सोनार समाधीस्त झाले. परळी वैजनाथ ( Parli Vaijnath ) येथे आणि राज्यातील विविध ठिकाणी संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आज साजरी केली जात आहे ( Saint Narhari sonar Jayanti ). त्यांच्या साक्षात्काराची ( Realization ) आज आपण माहिती घेणार आहोत. हरि-हर साक्षात्काराची घटना खाली दिली आहे.

श्री संत नरहरी सोनार यांचा हरि-हर साक्षात्कार - एके दिवशी पांडुरंगाने श्री संत नरहरी सोनार ( Saint Narhari sonar ) यांच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हा गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्ररत्न झाले होते. त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी असा विचा त्या सावकाराने केला. त्यावर अपेक्षेप्रमाणे संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला. याचे कारण त्यांना पण होते. भगवान शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघत नव्हते. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार हे विठ्ठलाला सोनसाखळी बनवण्यास तयार झाले. दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली. पण ती एक वीतभर जास्त झाली होती. म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे साखळीचे माप बरोबर करून घेण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतू विठ्ठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. शेवटी स्वतः ते मंदिरात गेले. देव दिसून नये म्हणून त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून सोनसाखळी विठ्ठल मूर्तीच्या कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली.मात्र समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर त्यांनी परत पुन्हा मूर्तीला हात लावला. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले.

हेही वाचा - Saint Narhari sonar Jayanti : श्री संत नरहरी सोनार यांची जयंती; "शिव भक्त ते विठ्ठल भक्त" पर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.