मुंबई - शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या वरळी मतदार संघात सुशोभिकरण करण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्ध उद्यानाचे ( Lord Gautam Buddha Garden ) आज ( 9 जुलै ) उद्घाटन होणार होते. मात्र, उद्घाटनाची वेळ झाली तरी, या उद्यानात सुशोभीकरणाचे काम सुरुच होते. दरम्यान, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रम रद्द झाल्याने पालिकेला काम पूर्ण करण्यास आणखी कालावधी मिळाला आहे.
उद्घाटनाच्या वेळेपर्यंत कामं सुरुच - वरळी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व आदित्य ठाकरे करतात. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामे वरळीमध्ये केली आहेत. त्या कामांची चर्चाही झाली आहे. वरळी सी फेस येथे असलेल्या भगवान गौतम बुद्ध उद्यानात सुशोभीकरण केले जात आहे. या कामाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. सकाळी ११ ची वेळ यासाठी देण्यात आली होती. मात्र, उद्घाटनाची वेळ आली तरी उद्यानात रेलिंग दरवाज्याला रंगरंगोटी, उद्यान पाण्याने धुवून स्वच्छ करणे, नको असलेली झाडे काढणे, कचरा स्वच्छ करणे, दिव्यांची देखरेख आदी कामे सुरूच होती. आज या उद्यानातील कामांचे उद्घाटन होणार होते. तर, ते उद्यान आधीच सज्ज ठेवण्याची गरज होती. पण, असे झालेले दिसत नाही.
उद्यानात काय - भगवान गौतम बुद्ध उद्यान येथे मेडिटेशन, योगा यासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. संपूर्ण बांबूचा डोम बनवण्यात आला आहे. उद्यानातील एकही झाड न तोडता सौंदरीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - Krupal Tumane : आमदारांनतर सेनेचे खासदार राजकीय धक्का देण्याच्या तयारीत?, खासदार तुमाने म्हणाले...