ETV Bharat / city

मंगळवारपासून लोकलच्या ट्रेन धावणार पूर्ण क्षमतेने; आजपासून लसवंतांना लोकल प्रवास सुरु!

author img

By

Published : Aug 15, 2021, 7:56 PM IST

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आजपासून लोकल सेवा सुरू केली आहे. आता लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून पूर्ण क्षमतेने लोकल सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

file photo
file photo

मुंबई - कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आजपासून लोकल सेवा सुरू केली आहे. आता लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून पूर्ण क्षमतेने लोकल सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

अशी वाढणार लोकल फेऱ्या -

कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. त्यानुसार, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहेत. सध्या मध्य रेल्वेवरून आणि पश्चिम रेल्वेवरून 90 टक्के क्षमतेने लोकल धावत होत्या. तर, 16 आणि 17 ऑगस्टपासून यामध्ये वाढ केली जाणार आहे. मध्य रेल्वेवर कोरोना पूर्वी एकूण 1 हजार 774 लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, आता 1 हजार 612 फेऱ्या धावत आहेत. 16 ऑगस्टपासून 1 हजार 686 फेऱ्या धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर कोरोना पूर्वी 1 हजार 367 लोकल फेऱ्या होत होत्या. तर, एप्रिलनंतर फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी 14 ऑगस्टपर्यंत एकूण 1 हजार 201 फेऱ्या धावत होत्या. मात्र, 16 ऑगस्टपासून 1 हजार 300 फेऱ्या धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

प्रवाशांना लोकल प्रवासाची प्रतीक्षा !

कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन लागू करण्यात आलेला होता. त्यामुळे 22 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र शासनाच्या आग्रहानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी 15 जून 2020 पासून मर्यादित लोकल सेवा सुरु केली होती. त्यानंतर अनलॉकची सुरुवात होताच कर्मचार्‍याची संख्या वाढल्याने लोकल फेर्‍या वाढविण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर नवरात्रीमध्ये 17 ऑक्टोबर 2020 पासून मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर पुरुष प्रवाशांना सुद्धा लोकल प्रवासांची परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना वेळेची मर्यादीत घालून लोकल प्रवासांची परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे २२ एप्रिल २०२१ पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा एकदा लोकल प्रवासावर बंदी घातली होती. फक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय उपचारासाठी रुग्णाना लोकल प्रवासाची परवानगी होती. आता कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.