मुंबई: दुरुस्ती-देखभाल आणि रूळ मार्ग तपासणी करीता उद्या ०२ ऑक्टोम्बर रोजी लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक (mumbai local train mega block) असून त्यामुळे अनेक ट्रेन रद्द तर काही ट्रेन यांचे मार्ग आणि फलाट क्रमांक तात्पुरत्या स्वरूपात बदलले जाणार आहेत. (mumbai local train cancelled)
बदलाचा तपशील पुढील प्रमाणे: माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत बंद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने आपल्या निश्चित स्थानकावर पोहोचतील. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
पनवेल मार्गावरील बदल: पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून), पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
कोणत्या सेवा उपलब्ध राहतील: ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ - खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी के के सिंग यांनी दिली आहे. तसेच प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.