ETV Bharat / city

Antilia Scare Case: सचिन वाझेला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, तळोजा कारागृहात रवानगी - भाजप

LIVE UPDATES : सचिन वाझेंची एनआयए कोठडीची मुदत आज संपणार, एनआयए करणार कोर्टात हजर

author img

By

Published : Apr 9, 2021, 11:25 AM IST

Updated : Apr 9, 2021, 7:33 PM IST

19:06 April 09

सचिन वाझेची रवानगी तळोजा कारागृहात

वाझेंची तळोजा कारागृहात रवानगी

मुंबई पोलिसचे माजी एपीआय सचिन वाझे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता सचिन वाझे याचा पुढील मुक्काम 23 एप्रिलपर्यंत तळोजा कारागृहात असणार आहे.  अँटिलिया केस प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरण याचा तपास एनआयए करत आहे. 

15:40 April 09

सचिन वाझेला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

सचिन वाझेला न्यायालयात नेत असताना

मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने सचिन वाझेला 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत धाडले आहे. मागील 25 दिवस सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत होता. सचिन वाझेसाठी एनआयएने न्यायालयीन कोठडी मागितली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाकडून सचिन वाझेंची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सचिन वाझे 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. सचिन वाझेचा वैद्यकीय अहवाल कोर्टात सादर करण्यात आला. वाझेंची प्रकृती ठणठणीत असून कुठल्याही उपचारांची गरज नाही अशी माहिती एनआयएने कोर्टात दिली. 

एनआयएच्या ताब्यात असलेली कागदपत्रे सीबीआयला दाखवण्यास कोर्टाची परवानगी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर कलेल्या आरोपांची CBI चौकशी करत आहे. सचिन वाझेची डायरी व इतर जे काही जमा केलेले पुरावे आहेत ते सीबीआयलाही मिळणार आहेत.

11:50 April 09

मीरा रोड, वसईतील फार्म हाऊसवर झाली होती वाझे आणि शिंदेंची बैठक, एनआयएचा दावा

मुंबई : अँटिलियासमोर स्कॉर्पिओ पार्क करण्यापूर्वी सचिन वाझे, विनायक शिंदे व काही इतर संशयितांची बैठक मीरा रोड, वसईमधील दोन वेगवेगळ्या फार्महाऊसवर झाल्याचं या फुटेजमधून स्पष्ट झाल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीत जिलेटीनच्या कांड्या कोणी आणायच्या? गाडी मुंबईत दाखल करताना कुठली नंबर प्लेट वापरायची? याबरोबरच वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट कुठून आणायच्या? त्या कोणी बनवून आणायच्या? यासंदर्भातील कामाची वाटणी या बैठकीदरम्यान करण्यात आलेली होती.

11:12 April 09

LIVE UPDATES : सचिन वाझेंची एनआयए कोठडीची मुदत आज संपणार, एनआयए करणार कोर्टात हजर

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या एनआयएच्या कोठडीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे एनआयएकडून त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाईल. यापूर्वी 7 एप्रिल रोजी मुदत संपल्यानंतर न्यायालयाने एनआयएला वाझेंची कोठडी 9 एप्रिलपर्यंत वाढवून दिली होती. साचिन वाझेंची कोठडी चार दिवसांसाठी एनआयएने वाढवून मागितली होती. परंतु न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत कोठडीची मुदत वाढवून दिली होती.
 
UAPA नुसार 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची तपास यंत्रणेकडून एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला विनंती केली होती. मनसूख हिरेन हा मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कटात सामील होता. त्यातूनच त्यांचा जीव गेला, असा दावा एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला. सचिन वाझे यांच्याकडून 36 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कोठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक आहे, असे सांगत 'शेवटी यामागे काहीतरी मोठा आर्थिक हेतू होता हे स्पष्ट आहे', मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक असा युक्तिवाद एनआयएकडून कोर्टात केला गेला. या प्रकरणात सहआरोपी असलेले विनायक शिंदे आणि नरेश गोरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी म्हणजे 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे एनआयए कोर्टाने निर्देश दिले.
 
वाझेंचा दावा, एनआयएचा युक्तिवाद

तत्पूर्वी झालेल्या सुनावणीत वाझेंना बळीचा बकरा बनवंल जातंय, असा सचिन वाझेंचा वकिलांनी कोर्टात दावा केला होता. दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो अचानक मला सांगितलं की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत, तुला अटक करतोय. जी काही चौकशी करायची होती ती करून झालीय, आता आणखीन पोलीस कोठडी देऊ नका, अशी वाझेंनी एनआयए कोर्टाकडे विनंती केली होती. परंतु ती कोर्टाने नाकारली होती. सचिन वाझेंवर लावलेल्या आरोपांशी संबंधित 120 TB चे सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सचिन वाझे कुठे गेले?, कुणाला भेटले?, का भेटले?, स्फोटकांचं सामान कसं गोळा केलं?, मिठी नदीतून सापडलेल्या गोष्टींतून डेटा रिकव्हर करायचा आहे, अशी माहिती कोर्टाला एनआयएकडून देण्यात आली.

वाझे प्रकरणात माझा काडीचाही संबंध नाही - अजित पवार

सचिन वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नसताना आपले नाव घेतले जात आहे. त्याबाबत आपल्याला हसू येते. या प्रकरणावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का, याबाबत चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पंढरपूर दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली देशमुखांची याचिका

परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी अनिल देशमुख आणि राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणात सीबीआय चौकशी होणार आहे. आरोपांचे स्वरूप पाहता स्वतंत्र एजन्सीद्वारे चौकशी आवश्यक आहे. ही लोकांच्या विश्वासाची बाब आहे, असे न्यायमूर्ती कौल यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. तर कपिल सिब्बल यांनी अनिल देशमुख यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. अनिल देशमुख यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले, प्राथमिक चौकशी होऊ नये, असे माझे म्हणणे नाही. पण, किमान अनिल देशमुख यांची बाजू ऐकावी. ते याप्रकरणी न्यायालयात तथ्य मांडू शकतात. त्यांची बाजू न ऐकता सीबीआय चौकशीचा आदेश दिला. तर ते चुकीचे असेल, असे सिब्बल म्हणाले. राज्यातील उच्च अधिकारी या प्रकरणात सामील आहेत. ही तपासणीची बाब आहे, असे न्यायमूर्ती गुप्ता सुनावणीदरम्यान म्हणाले. अनिल देशमुख आणि परमबीर सिंग दोघांनीही जवळून काम केले. दोघेही प्रतिष्ठित पदी होते. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी गरजेची आहे, असे न्यायामुर्ती कौल म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच आपण केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर, परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती. या याचिकेसह अजून एक याचिका अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. यानंतर हायकोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे निर्देश दिले होते.

Last Updated : Apr 9, 2021, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.