मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या आहेत.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; मुंबईची तुंबई, दोघे जखमी
19:27 August 05
मुख्यमंत्र्यांनी घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा
19:25 August 05
मुंबईच्या पावसाचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा...
मुंबई - मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्या बाहेरील रस्त्यावर पाणी साचले आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. पत्रकारांनाही सुरक्षित राहण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी केली.
- पावसामुळे 33 बसचे नुकसान
- मंत्रालयाच्या आरसा गेटबाहेर मोठया प्रमाणात पाणी जमा, ताडपत्री झाड कोसळले
- सीएसटी मशीदमध्ये कर्जत लोकल 2 तास अडकली, प्रवासी अडकले...आरपीएफची टीम 2 तासानंतर मदतीला
18:06 August 05
अतिवृष्टीमुळे आज कोकणात जाणाऱया एसटी बस रद्द
मुंबई - आज मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. अतिवृष्टीमुळे आज कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द करण्यात आल्या आहेत.
- मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे आणि अंधेरी मार्गाने डाऊन गाड्या सुरू
- पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान रद्द
17:51 August 05
मुंबईची परत एकदा तुंबई...उद्याही रेड अलर्ट
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. भायखळा, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईसह उपनगरात आज (5 ऑगस्ट) आणि उद्या (6 ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केल्या आहेत.
17:19 August 05
मुंबईत आज दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत पावसाची नोंद

- मुंबई शहरात पालिका मुख्यालय येथे 70 मिलिमीटर, मलबार हिल 68 मिलिमीटर, मेमनवाडा फायर स्टेशन येथे 52 मिलिमीटर, नायर हॉस्पिटल येथे 41 मिलिमीटर पावसाची नोंद
- पूर्व उपनगरात - चेंबूर येथे 48 , कुर्ला येथे 37 मिलिमीटर
- पश्चिम उपनगरात विलेपार्ले येथे -12 मिलिमीटर
17:14 August 05
पवईत पुन्हा दरड कोसळली, जीवितहानी नाही
मुंबई - सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई येथील इंदिरानगर झोपडपट्टीवर दरड कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
17:07 August 05
भायखळा, भेंडीबाजार, हिंदमाता आदी सकल भागात पाणी साचले
हिंदमाता, शेख मिस्त्री दर्गा, बीपीटी कॉलनी स्काय वॉक, अब्दुल रहेमान स्ट्रीट, गोल देऊळ, भायखळा जेजे जंक्शन, सक्कर पंचायत, खेतवाडी, पोस्टल कॉलनी चेंबूर, सीएसटी रोड कुर्ला, या ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी साचल्याने माटुंगा गांधी मार्केट येथील बेस्टच्या बसेसची वाहतूक भाऊ दाजी रोडवरून तर सायन रोड नंबर 24 वरील वाहतूक हेमंत मांजरेकर मार्गावरून वळवण्यात आली आहे.
16:47 August 05
सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर दुपारी कमी झाला
मुंबई - सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर दुपारी कमी झाला आहे. तरी तिन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकल रद्द केल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घरी परताना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
हार्बर मार्गावर मशीद ते सँडहर्स्ट रोड दरम्यान रुळावर पाणी साचल्याने सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची उपनगरीय मार्गावरील वाहतूक दुपारी 3 वाजून 35 मिनिटानंतर बंद करण्यात आली. तर मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सीएसएमटी व सीएसएमटी ते वाशी दरम्यानही रुळावर पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेट स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही चर्चगेट ते ग्रांटरोड स्थानकादरम्यान 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.