ETV Bharat / city

'एलआयसी'कडूनही विश्वासघात; मुंबईत पॉलिसी धारकाची लाखोंची फसवणूक

अनेक खासगी कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र भारतीय आयुर्विमा महामंडळसारख्या विश्वसनीय कंपनीने दीपक कोठारी नावाच्या ग्राहकाची फसवणूक केली आहे.

LIC fraud news
'एलआयसी'कडूनही विश्वासघात; मुंबईत पॉलिसी धारकाची लाखोंची फसवणूक
author img

By

Published : Jan 22, 2020, 9:07 PM IST

Updated : Jan 22, 2020, 10:25 PM IST

मुंबई - अनेक खासगी कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र भारतीय आयुर्विमा महामंडळ सारख्या विश्वसनीय कंपनीने दीपक कोठारी नावाच्या ग्राहकाची फसवणूक केली आहे. त्यामुळे कोठारी यांना जसा धक्का बसला, तसाच वाचकांनाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

कोठारी यांना जीवन सरल पॉलिसीच्या परताव्यात महामंडळाने चक्क लाखो रुपयांना फसवले. त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जहांगीर घई या वकिलांनी तब्बल दोन वर्षे राज्य ग्राहक संरक्षण आयोगात लढा दिला.

'एलआयसी'कडूनही विश्वासघात; मुंबईत पॉलिसी धारकाची लाखोंची फसवणूक

काय आहे दीपक कोठारी एलआयसी प्रकरण ?

दीपक कोठारी या व्यक्तीने जीवन सरल पॉलिसी काढली. या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे कोठारी यांनी जहांगीर यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत संपर्क साधला. यानंतर जहांगीर गई यांनी ग्राहक संरक्षण आयोगामार्फत कोर्टात याचिका दाखल केली. ग्राहक संरक्षण आयोगाच्या सुनावणीत केवळ टायपिंग मिस्टेक झाल्याचे कारण सांगून एलआयसी महामंडळाने चूक मान्य केली. परंतु, संबंधित पॉलिसी कोठारी यांना देणार नसल्याचे एलआयसीने सांगितले.

तरतुदी नुसार दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून आयोगाने कोठारींची फसवणूक झाल्याचा निकाल दिला. तसेच एलआयसी महामंडळाला समन्स बजावला. यानंतर महामंडळाने कोठारी यांची व्याजासह भरपाई केली. परंतु, या प्रकरणानंतर विश्‍वासार्ह असलेल्या एलआयसी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ग्राहक खासगी कंपनीकडे न जाता भारतीय आयुर्विमा महामंडळावर विश्वास दाखवतात. मात्र, महामंडळच फसवणूक करत असेल तर, आता कुणाकडे पाहायचे असा प्रश्न कोठारी यांनी उपस्थित केला आहे.

Intro:अबब एलआयसी कडुनही लोकांचा विश्वासघात !

अनेक खाजगी कंपन्या ग्राहकाची फसवणूक करत असल्याचा अनेकदा उघड झाले आहे. मात्र भारतीय आयुर्विमा महामंडळ सारख्या विश्वसनीय कंपनी दीपक कोठारिया ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कोठारियाना जसा धक्का बसला तसाच वाचणाऱ्या वाचकांना ही धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. कोठारी यांना जीवन सरल पॉलिसी च्या परताव्यात महामंडळाने चक्क लाख रुपयांना फसवले होते. त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जहांगीर घई ह्या वकिलानी तब्बल दोन वर्षे राज्य ग्राहक संरक्षण आयोग लढा दिला .

काय होतं दीपक कोठारीया यांचा एलआयसी पॉलिसीचं प्रकरण ?

दीपक कोठारी या व्यक्तीने जीवन सरळ ही पॉलिसी काढली होती ती या पॉलिसीचा मुदत पूर्ण झाल्यानंतर त्याला मिळायला हवे ते पैसे मिळाले नाही ही त्यामुळे दीपक कोठारी यांनी जहांगीर यांच्याशी झालेल्या प्रकरणा संदर्भात संपर्क साधला त्यामुळे जहांगीर गई यांनी ग्राहक संरक्षण आयोगामार्फत याविषयी याचिका कोर्टात साधल्यानंतर ग्राहक संरक्षण आयोगाच्या सुनावणीत केवळ टायपिंग मिस्टेक झाल्याचे म्हणत चूक एलआयसी महामंडळाने मान्य केली.त्यामुळे ही पॉलिसी आम्ही कोठारी यांना देणार नाही असे एलआयसी महामंडळाचे म्हणणे होते. त्यावर आयोगाने कोठारी यांच्या बाजूने बाजू मांडत 2004 साली जीवन सरल पॉलिसी काढली होती. या पॉलिसी नुसार कोठारी यांना 24 लाख रुपये मिळणे अपेक्षित होते . पण 13 लाख रुपयांचा प्रीमियम भरून महामंडळाने केवळ तीन लाख 94 हजार रुपये पोलिसी संपल्यानंतर कोठारी यांना देऊ केले . पण ही प्रिंटिंग मिस्टेक कशी असू शकेल कारण 13 लाखाचा प्रीमियम कोठारी यांनी भरला असता त्यांना फक्त महामंडळाने एवढे पैसे देणे म्हणजे ही शुद्ध फसवणूक असल्याचे आयोगाकडे कोठारी यांनी मांडले.

त्यामुळे तरतुदी नुसार दोन्ही बाजू ऐकून आयोगाने महामंडळाने कोठारी यांना पैसे दिले नाही त्यांची लाख रुपयांची फसवणूक केली आहे असा निकाल दिला व एलआयसी महामंडळ यांच्या विरुद्ध समस काढले . त्यामुळे महामंडळाने लगेच कोठारी यांचे भरपाई आणि व्याजासह रक्कम दिले. मात्र एकीकडे खासगी विमा कंपन्यां लोकांना फसवताना अनेक वेळा पाहायला मिळते परंतु विश्‍वासार्हता असलेल्या एलआयसी महामंडळाच्या या कारभारावर या प्रकरणानंतर शंका उपस्थित होते .

त्यामुळे ग्राहक खाजगी कंपनीकडे न जाता सरकारी कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ वर विश्वास दाखवतात मात्र महामंडळच फसवणूक करत असेल तर कुणाकडे पाहायचे असा सवाल कोठारी यांनी केले

Body:।

Conclusion:।
Last Updated : Jan 22, 2020, 10:25 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.