मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जातोय, असे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मातोश्रीवरील घोषणाबाजीने त्यांची नीतिमत्ता आणि खोटारडेपणाचा बुरखा फाटला आहे, असा हल्लाबोल शिवसेना विधिमंडळातील प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. तसेच, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला योग्य वेळी धडा शिकवेल, असही प्रभू यावेळी म्हणाले आहेत.
दिवसभर वाद विधानभवनात धुमसत राहिला राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राडा झाला. शिंदे गटाच्या आमदारांनी सकाळच्या सत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मातोश्रीवर खोके गेल्याच्या घोषणा दिल्या. शरद पवार देखील सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर होते. विरोधकांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुद्दावरून घोषणाबाजी केली. त्यामुळे दोघांमध्ये झटापटी झाली. अखेर अजित पवार यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. मात्र, दिवसभर वाद विधानभवनात धुमसत राहिला. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी यावरून बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली.
महाराष्ट्राची जनता बघत आहे गेल्या दोन महिन्यांपासून ४० आमदार खोटारडेपणाचा बुरखा घालून बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जातोय असे सांगत भाऊ होऊन लोकांना लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या शिवसेनाप्रमुखांचे वास्तव्य असलेल्या मातोश्रीवर खोटे आरोप करून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून ज्या पद्धतीने घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांच्या खोटारडेपणाचा बुरखा आता फाडला गेला आहे. शिवसेनाप्रमुखांचे नाव घेण्याची त्यांची नीतिमत्ता नाही. महाराष्ट्राची जनता बघत आहे. योग्य वेळेला महाराष्ट्रातील जनताच तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा प्रभू यांनी दिला.
हेही वाचा - पाच मंत्र्यांच्या जिल्ह्यात थकीत देयकामुळे 833 जिल्हा परिषद शाळांची वीज कापली