ETV Bharat / city

Kishori Pednekar Threat To Kill : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे बहुसंख्य मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यामुळे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे.

Kishori Pednekar Threat To Kill
किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र
author img

By

Published : Jun 29, 2022, 3:07 PM IST

मुंबई - मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. पत्रात अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच किशोरी पेडणेकर व आदित्य ठाकरे यांना रस्त्यावर आणून मारू अशी धमकी देण्यात आली आहे. विजेंद्र म्हात्रे असे पत्र पाठवणाऱ्याचे नाव असून जय महाराष्ट्र सायबर कॅफे, उरण रायगड येथून पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. याआधीही पेडणेकर यांना धमकी देण्यात आली होती.

Kishori Pednekar Threat To Kill
किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र

धमकीचे पत्र - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे बहुसंख्य मंत्री आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यामुळे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या धमकीच्या पत्रात अजित पवारांचा उल्लेखही करण्यात आला आहे. धमकीच्या पत्रात अश्लील भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्या फोटोवर काट मारण्यात आली असून तो फोटोही या पत्रात चिकटवण्यात आला आहे.

तिसऱ्यांदा धमकी -महापौर झाल्यानंतर पहिल्यांदा फोनवरून धमकी आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपचे नेते आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यात त्यावेळी वाद रंगला होता. त्यावेळीही किशोरी पेडणेकर यांना धमकी देणार पत्र आले होते. त्यातही अश्लील भाषेचा उपयोग करण्यात आला होता. त्यावेळीही किशोरी पेडणेकर यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता पालिकेचा कार्यकाळ संपला असल्याने पेडणेकर या महापौर नाहीत. त्यानंतरही त्यांना धमकी देण्यात आली आहे. तिसऱ्यांदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदार गोव्याच्या वाटेवर; ताज हॉटेलबाहेर वाढला पोलीस बंदोबस्त

हेही वाचा - उदयपूरच्या कन्हैयालालची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना बेड्या, 13 किलोमीटर पाठलाग करुन पोलिसांनी पकडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.