मुंबई - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद गेल्या अनेक दिवसांसून खितपत पडलाय. आता हा प्रश्न कोर्टाकडे असल्याने महाराष्ट्र सरकार कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडणार आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सीमा प्रश्नाचे विशेष कार्य अधिकारी दीपक पवार यांनी लिहिलेलं ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद:संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले. या प्रकाशनानंतर सीमा प्रश्नावर विशेष सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून, या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरावठा मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह सीमा भागातील बांधवही उपस्थित होते.
हेही वाचा - सीमावाद सुटेपर्यंत कर्नाटकातील मराठी प्रदेश केंद्रशासित करा-उद्धव ठाकरे