ETV Bharat / city

मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या दोन वर्षापेक्षा कमी पाणीसाठा - mumbai water dam news

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १७.३१ टक्के पाणी साठा आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा हा पाणीसाठा कमी आहे. येत्या दिवसात अपेक्षित पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

lake
संग्रहित फोटो
author img

By

Published : Jul 13, 2021, 5:55 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये सुमारे दीड कोटी नागरिक राहत असून त्यांना दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १७.३१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षापेक्षा हा पाणीसाठा कमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि धरणांमध्ये अपेक्षित पाऊस पडत नसल्याने पाणीसाठा कमी आहे. येत्या काही दिवसात अपेक्षित पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा - योग्यवेळी निर्णय घेणार, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य

  • ६५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा -

मुंबईला सात धरण आणि तलावांमधून रोज ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. वर्षभरात मुंबईकरांना १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. मुंबईमध्ये जूनच्या सुरुवातीला दहा दिवस पाऊस पडला होता. त्यानंतर अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या त्यामुळे तानसा, मोडकसागर, भातसा व मध्य वैतरणा या सर्वाधिक पाणी साठवणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची मोठी वाढ झालेली नाही. तलावांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ५० हजार ५१८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मुंबईला ६५ दिवस पुरेल इतकाच आहे.

  • मागील दोन वर्षापेक्षा पाणीसाठा कमी -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ५० हजार ५१८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये आजच्या दिवशी ३ लाख ३९ हजार ०६७ दशलक्ष लिटर तर २०१९ मध्ये ६ लाख ५२ हजार ७२८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. मागील दोन वर्षाची आकेवारी पाहिल्यास या वर्षी तलावांमध्ये पाणीसाठा कमी आहे.

  • तर पाणीकपातीचा निर्णय -

येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईत पिण्याच्या पाण्याची समस्या कठीण होऊ शकते. पालिका दरवर्षी ३० जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा आणि येत्या काळातील पावसाचा अंदाज घेऊन कपातीचा निर्णय घेते. हवामान विभागाने पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची वाट पाहू, समाधानकारक पाऊस न आल्यास कपातीचा निर्णय घ्यायचा की आणखी काही दिवस वाट पाहायची याबाबत बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे प्रमुख जल अभियंता अजय राठोड यांनी दिली.

  • धरण, तलावांमधील पाण्याची स्थिती (१३ जुलै २०२१)-

मोडक सागर - ३५,४४० दशलक्ष लिटर
तानसा - ४४,२४४ दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा - १९,९०४ दशलक्ष लिटर
भातसा - १,२५,९३० दशलक्ष लिटर
विहार - १८,३१३ दशलक्ष लिटर
तुळशी - ६,६८६ दशलक्ष लिटर
एकूण - २,५०,५१८ दशलक्ष लिटर

  • गेल्या तीन वर्षातील पाणीसाठा -

२०२१ - २ लाख ५० हजार ५१८
२०२० - ३ लाख ३९ हजार ०६७
२०१९ - ६ लाख ५२ हजर ७२८

हेही वाचा - हवामान बदललं की नाना पाटोलेंची वक्तव्ये बदलतात - आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.