ETV Bharat / city

MCA Elections : सचिन तेंडुलकर, गावस्कर, मांजरेकरांसारखे दिग्गज क्रिकेटपटू 'या' कारणामुळे एमसीए निवडणूक मतदानास अपात्र

author img

By

Published : Oct 16, 2022, 11:00 AM IST

मुंबई क्रिकेट संघटनेची (Mumbai Cricket Association) २० ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. परंतु या निवडणूकीत (MCA elections) सचिन तेंडुलकरसह, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, विनोद कांबळी असे तब्बल ११ क्रिकेटपटू मतदानास अपात्र ठरले (legendary cricketers ineligible to vote) आहेत.

legendary cricketers ineligible to vote in MCA elections
दिग्गज क्रिकेटपटू एमसीए निवडणुकीत मतदान करण्यास अपात्र

मुंबई : देशातील प्रतिष्ठित असणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेची (Mumbai Cricket Association) २० ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी माजी कसोटीपटू संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे अशी लढत रंगणार असून क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी, असा हा सामना होणार आहे. परंतु या सामन्यात (MCA elections) सचिन तेंडुलकरसह, सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, विनोद कांबळी असे तब्बल ११ क्रिकेटपटू मतदानास अपात्र ठरले (legendary cricketers ineligible to vote) आहेत. मतदार नोंदणी न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे.

१४ जागांसाठी ३५ उमेदवार - २० ऑक्टोंबरला मुंबई क्रिकेट संघटनेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये १४ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काही क्रिकेटपटू आहेत, तर अनेक राजकारणी आहेत. आणि अशा वेळी कधी नव्हे, ते या निवडणुकीतील राजकारण टोकाला गेले. व निवडणुकीत मतदान करणारे हक्काचे क्रिकेटपटूच यंदा मतदानापासून वंचित राहिले आहेत. या सर्व क्रिकेटपटूंनी निवडणुकीपूर्वी मतदार म्हणून नोंदणी केली नाही, तसेच त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्याने ते या निवडणुकीत अपात्र ठरल्याचे निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांनी जाहीर केले (Mumbai Cricket Association elections) आहे.

ई -मतदानाची सुविधा नाकारली - मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांनी अनेक माजी क्रिकेटपटू मुंबईत नसल्यामुळे ई मतदानाची सुविधा असावी, अशी सूचना केली होती. मात्र या संघटनेच्या वार्षिक सभेने त्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे ज्यांनी मतदार नोंदणी केली नाही, ते या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत, असे निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांनी जाहीर केले (ineligible to vote in MCA elections)आहे.

क्रिकेटपटू समालोचनासाठी ऑस्ट्रेलियात - आजपासून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात सुरुवात होत असून अनेक माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, संजय मांजरेकर आणि अजित आगरकर हे समालोचनासाठी ऑस्ट्रेलियात गेले आहेत. पारस म्हांम्ब्रे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. आविष्कार साळवी आणि वसीम जाफर प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत असल्यामुळे मुंबई बाहेर आहेत. परंतु सध्या क्रीडा क्षेत्रात राजकारण्यांचा वाढत असलेला हस्तक्षेप पाहता, हक्काचे मतदार असलेले व या क्षेत्रातील दिग्गज असलेले सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर(legendary cricketers Sachin Tendulkar), संजय मांजरेकर, अजित आगरकर, विनोद कांबळी असे क्रिकेटपटू या निवडणुकीत मतदान न करू शकल्याने क्रिकेटप्रेमी चाहत्यांची निराशा झाली आहे.

मतदानापासून बाद केलेले क्रिकेटपटू - सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, अजित आगरकर, पारस म्हांम्ब्रे, अविष्कार साळवी, विनोद कांबळी, वासिम जाफर. क्लब - शहापूरची पालनजी ग्रुप स्पोर्ट्स क्लब (लालचंद राजपूत) शाळा तसेच कॉलेज - इस्माईल युसुफ कॉलेज (प्रतीक्षा फडणीस) साठे कॉलेज जिमखाना (बन्सीधर धुरंदर).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.