मुंबई - रिया चक्रवर्ती संदर्भात कोणतेही बनावट आणि खोटे दावे करणाऱ्या बातम्या दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याने रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर बनावट आणि खोटे दावे करणार्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा चंग रियाच्या वकिलांनी बांधला आहे. त्यामुळे फेक न्यूज देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर कायदेशीर कारवाई करू, असे ते म्हणाले. 'टीआरपी'साठी रियाची बदनामी करून तिच्या आयुष्याचा नाश करण्याचा प्रयत्न केलेल्या लोकांना कायदेशीर धडा शिकवू, असे त्यांनी म्हटले.
सत्यमेव जयते
टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर बनावट आणि खोटे दावे करणार्या लोकांची यादी तसेच मोबाइल रेकॉर्डिंग आणि बनावट माहिती सीबीआयकडे पाठवत आहोत. तपासाची दिशाभूल केल्याप्रकरणी आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सीबीआयला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.