ETV Bharat / city

Yakub Memon Grave Controversy : याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली.. मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबईत झालेल्या 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. याच मेमनच्या कबरीवर संगमवर दगडाने विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली होती. याबाबत फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई काढली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 8, 2022, 11:33 AM IST

Updated : Sep 8, 2022, 12:17 PM IST

मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकूब मेमन ज्याला फाशी दिल्यानंतर मुंबईतील मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याकूब मेमन च्या या कबरीला मार्बल आणि संगमवर दगडाने सजवण्यात आले असून कालच त्याला एलईडी लाईट ने विद्युत रोषणाई केली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज मुंबई पोलिसांचे पथक बडा कब्रस्तान येथे दाखल झाले आणि बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली आहे.

सध्या मुंबईतील मुस्लीम दफनभूमीत कबर विकल्या जात आहेत. हयात असलेल्या अनेकांनी तेथे कबरीसाठी जमिनीचा तुकडाही बुक केला आहे. मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. मात्र, आता ही कबर संगमवर दगडाने आणि विद्युत रोषणाई करून सजवण्यात आली आहे. त्यामुळे एका बॉम्बस्फोटातील आरोपीची कबर सजवल्याने नकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. ही बाब समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई काढली आहे.

1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकुब मेमनला जिथे दफन करण्यात आले आहे. त्या कबरीची जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केली आहे अशीची चर्चा आहे. मुस्लिम दफनभूमी ट्रस्टीने विकली आहे का असा सवालही उपस्थित होत आहे. कारण मेमन दफन झाल्यानंतर साधी असलेली कबर आता सजली आहे. ओट्याला संगमरवरी दगड बसवले आहेत. LED दिवे लावले आहेत. जे रात्रीच्यावेळी चालू असतात. मुख्यतः मेमनच्या कबरीवर त्यांचा फोकस असतो. स्मशानभूमी विश्वस्तांकडून कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून वीजपुरवठा केला जातो. कबरीची जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरीला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल उपस्थित होत आहे.दुसरीकडे बडा कब्रस्तानचे ट्रस्टी शोएब खातीब यांनी सांगितले अशा प्रकारची काहीही सजावट केलेली नाही. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडिओ किंवा फोटो शब्बे बारातचा जुना असण्याची शक्यता आहे. तसेच कोर्टाने असा कुठलाही आदेश दिलेला नाही की कुठली कबर सजवू नका, असेही त्यांनी सांगितले. तसेच याकूब मेमनच्या कबरीस संगमवर लावण्यात आले आहे हे खरे आहे, असेही ते म्हणाले होते.

भाजपचा शिवसेनेवर आरोप : दुसरीकडे कालपासून या सजवलेल्या कबरीच्या फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात याकुब मेमनच्या कबरीचं मजारमध्ये रुपांतर करण्यात आलंय. १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबरीचे मझारमध्ये रुपांतर करण्यात आलंय. हेच त्याचं मुंबईवरच प्रेम का? हीच त्यांची देशभक्ती? उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी, असा हल्लाबोल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.

कोण आहे याकूब मेमन : याकूब मेमन हा मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी होता. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला फासावर चढविण्यात आले होते. फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते.

Last Updated : Sep 8, 2022, 12:17 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.