ETV Bharat / city

राज्यभरातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बेमुदत संपावर - Doctors strike

राज्यभरातील सुमारे 400 डॉक्टरांनी बेमुदत काम बंद केले आहे. आज सकाळी जे जे रुग्णालयात अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी मोठ्या संख्येने जमा होत आंदोलनास सुरुवात केली आहे.

डॉक्टर बेमुदत संपावर
डॉक्टर बेमुदत संपावर
author img

By

Published : Nov 4, 2020, 11:18 AM IST

मुंबई - राज्यातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी सेवेत नियमित करावे आणि सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी सामूहिक रजेवर जात काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यानंतरही राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आता हे डॉक्टर आणखी आक्रमक झाले आहेत. आजपासून (बुधवार) डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातील सुमारे 400 डॉक्टरांनी बेमुदत काम बंद केले आहे. आज सकाळी जे जे रुग्णालयात अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी मोठ्या संख्येने जमा होत आंदोलनास सुरुवात केली आहे.

19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा समावेश -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकपदी डॉक्टरांची अस्थायी अर्थात कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती केली जाते. चार महिन्यांसाठी ही नियुक्ती असते. तर चार महिन्यांनी कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात येते. दर चार महिन्याला कराराचे नूतनीकरण करत मागील चार-पाच वर्षांपासून काम करणारे सुमारे 400 डॉक्टर आहेत. राज्यातील 19 शासकीय रुग्णालयात हे डॉक्टर सेवा देत आहेत.

मागण्यांकडे दुर्लक्ष -

हे डॉक्टर पाच-पाच वर्षे सेवा देत आहे. सेवेत नियमित नसल्याने त्यांना कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत. शिवाय पगार खूपच कमी मिळतो. हे डॉक्टर एमडी, एमएस, तज्ज्ञ डॉक्टर असताना त्यांना निवासी डॉक्टरांच्या इतका पगार मिळतो. त्यामुळे या डॉक्टरांनी आपल्याला सेवेत नियमित करण्याची मागणी उचलून धरली आहे. यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता हे डॉक्टर आक्रमक झाले आहेत.

आधी सामूहिक रजा, आता बेमुदत काम बंद -

डॉक्टरांनी मागण्या मान्य करण्यासाठी दोन दिवसांपासून सामूहिक रजा देत काम बंद आंदोलन सुरू केले होते. पण या आंदोलनाची दखल सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे आता हे डॉक्टर आणखी आक्रमक झाले आहेत. त्यानुसार त्यांनी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जे जे रुग्णालय येथील एका आंदोलक डॉक्टरने दिली आहे. तर आता जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका या डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होण्याचा व यामुळे रुग्णालय प्रशासन विरुद्ध डॉक्टर असा संघर्ष सुरू होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.