ETV Bharat / city

'महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा बनाव करण्यात येतोय' - देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे सांगितले. महामारीच्या काळात राज्य सरकारला केंद्राने भरीव आर्थिक मदत केली असून राज्याच्या गरजेहून अधिक निधी मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय.

devendra fadnavis live
'महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा बनाव करण्यात येतोय'
author img

By

Published : May 26, 2020, 4:56 PM IST

Updated : May 26, 2020, 6:02 PM IST

मुंबई - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे सांगितले. महामारीच्या काळात राज्य सरकारला केंद्राने भरीव आर्थिक मदत केली असून राज्याच्या गरजेहून अधिक निधी मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय.

सध्या महाराष्ट्रावर अन्याय होतोय, अशी प्रतिमा तयार करण्यात येतीय. तसेच महाराष्ट्रात केंद्र सरकार मदत करत नसल्याचे वातावरण तयार करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारने आतापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी राज्याला दिल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अन्नधान्य, रेशन, सिलिंडर, पीकविमा, जनधन याचसोबत रेल्वे सेवा, आरोग्य सेवेचा समावेश आहे.

वारंवार केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र केंद्राने भरघोस मदत पुरवली असून महाविकास आघाडी हे खोटे चित्र उभे करत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारला रेशनसाठी ४ हजार ५९२ कोटींचे अन्नधान्य पुरवण्यात आले आहे. यामध्ये १०० कोटींची डाळ देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेमार्फत एक हजार ७२६ कोटी, जनधन योजनेअंतर्गत एक हजार ३०८ कोटी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात आणखी ६०० कोटींचा निधी मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

उज्ज्वला योजनेअंतर्गत ७३ लाख सोळा हजार सिलिंडर मोफत वाटण्यात आले असून त्याची किंमत एक हजार ६१५ कोटी आहे. श्रमिक रेल्वेसाठी केंद्राने ३०० कोटी दिल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या काळात सर्वाधिक मदत आरोग्य क्षेत्राला करण्यात आली असून यामध्ये १० लाख पीपीई किट्स तसेच सोळा लाख मास्क वाटप केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी एकूण २ हजार ०५९ कोटी रुपये राज्याला मिळाल्याचे ते म्हणाले.

Last Updated : May 26, 2020, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.