ETV Bharat / city

Maharashtra Police : नेते फरार आणि पोलीस गार! निवृत्त पोलीस अधिकारी पी. के. जैन यांनी सांगितले कारण - गणेश नाईक

मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police ) देशातील सर्वात सक्षम पोलिसांपैकी एक आहेत. मात्र राजकीय नेत्यांवर एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत हे नेते भूमिगत ( Leader absconding ) होताय. या नेत्यांचा शोध पोलिसांकडे सुरू होतो. मात्र न्यायालयाने दिलासा मिळाला नंतरच हे नेते सर्वांसमोर येतात. यामागे नेमकं कारण काय आहे ते निवृत्त पोलीस अधिकारी पी. के. जैन यांनी सांगितले आहे.

Maharashtra Police
नेते फरार आणि पोलीस गार
author img

By

Published : May 9, 2022, 4:34 PM IST

मुंबई - मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police ) देशातील सर्वात सक्षम पोलिसांपैकी एक आहेत. मात्र राजकीय नेत्यांवर एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत हे नेते भूमिगत ( Leader absconding ) होताय. या नेत्यांचा शोध पोलिसांकडे सुरू होतो. मात्र न्यायालयाने दिलासा मिळाला नंतरच हे नेते सर्वांसमोर येतात. यामागे नेमकं कारण काय आहे ते निवृत्त पोलीस अधिकारी पी. के. जैन यांनी सांगितले आहे.

मुंबईत मनसे आंदोलनात महिला पोलीस जखमी - मशिदीवरील भोंगे काढण्याबाबतचा अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले होते. राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन हरकती आले आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळपास 13 हजार कार्यकर्त्यांना कलम 149 अंतर्गत नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्या नोटीस मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असलेले नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना देखील पाठवण्यात आले होते. अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर 4 मे ला राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला असता तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस ताब्यात घेणार आहेत हे दोघांच्या लक्षात येताच आपल्या गाडीत बसून दोन्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी तेथून पळ काढला. आपल्या गाडीतून पळत असताना तेथे बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या एक महिला पोलीस कॉन्स्टेबल देखील जखमी झाल्या होत्या.

हेही वाचा - Women Threw Gas Cylinders in River : महागाईचा भडका, महिलांनी गॅस सिलिंडर फेकले नदीत, थापल्या चुलीवर भाकरी

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी - राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सटकनारे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पाच दिवस उलटून गेले तरी मुंबई पोलिसांना अद्याप सापडत नाहीत. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या अगदी समोरून एखादा नेता निघून जातो आणि चार ते पाच दिवसानंतरही त्यांना त्याचा थांगपत्ता लागत नसेल तर मुंबई पोलीस काय करते असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नक्कीच उपस्थित होत आहे. कारण याआधीही काही नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या शोधात महाराष्ट्र पोलीस जंग जंग पछाडत असताना ते पोलिसांना सापडले नाही मात्र न्यायालयामध्ये दिलासा मिळाल्यानंतर लगेचच ते नेते लोकांच्या समोर येतात. मग पोलीस शोध घेत असताना हे नेते सापडत कसे नाहीत असा सवाल उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या आधीही गुन्हे दाखल झालेले काही नेत्यांचा पोलीस शोध घेत होती, मात्र ते नेते पोलिसांना सापडले नाहीत.

नितेश राणे - सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बँकेचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांचे सहकारी संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला नितेश राणे यांनी घडवून आणला होता असा आरोप सतीश सावंत यांनी केला होता. याबाबतची सविस्तर तक्रार सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये सतीश सावंत यांच्या पत्नीने केल्यानंतर पोलिसांनी आमदार नितेश राणे यांचा शोध सुरू केला. त्यावेळी नितेश राणे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून दोन पथके तैनात करण्यात आली असून राज्य तसेच गोव्यात देखील नितेश राणे यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. मात्र नितेश राणे यांना पोलीस शोधू शकले नाही. ज्यावेळेस नितेश राणे यांना न्यायालयाने 9 फेब्रुवारीला दिलासा दिला. त्यानंतर नितेश राणे हे पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आले होते.

माजी मंत्री गणेश नाईक - भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबईतील एका महिलेने सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली होती. गेली सत्तावीस वर्ष गणेश नाईक आणि आपण 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहत होतो. यामध्ये वेळोवेळी आपल्या सोबत लग्न करण्याचे आश्वासन गणेश नाईक यांनी आपल्याला दिले होते. मात्र आता गणेश नाईक आपल्याशी लग्न करत नाहीत. आपल्या पंधरा वर्ष मुलाचा स्वीकार करत नाहीत म्हणून आपण गणेश नाईक यांच्या विरोधात तक्रार करत असल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली होती. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचा जामीन अर्ज फेटाळला नंतर पोलिसांकडून गणेश नाईक यांची शोधाशोध सुरू झाली होती. मात्र उच्च न्यायालयात गणेश नाईक यांना 4 मे ला दिलासा मिळाला. त्यावेळीही गणेश नाईक यांचा पोलीस शोध घेऊ शकली नव्हती.

हेही वाचा - Fight due to grooms sherwani : वराने शेरवानी घातल्याने विवाह समारंभात हाणामारी, चार जण जखमी

भाजप नेते किरीट सोमैया - भारतीय नौदलाच्या लढाऊ जहाज आयएनएस विक्रांत हे भंगारात जाऊ नये म्हणून सेव्ह विक्रांत ही मोहीम भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया आणि त्यांचे पुत्र अनिल सोमैया यांच्याकडून राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत किरीट सोमैया यांनी 58 कोटी रुपये जमा केले. मात्र हे पैसे त्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यपालांकडे जमा केले नाहीत. या सर्व पैशाचा भ्रष्टाचार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र किरीट सोमय्या यांनी केला असल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा शोध पोलीसांकडून सुरू झाला होता. मात्र तीन ते चार दिवस शोध घेऊनही किरीट सोमय्या आणि नील सोमय्या पोलिसांना सापडले नाहीत. शेवटी 13 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर तातडीने किरीट सोमय्या हे सर्वांच्या समोर आले. मात्र या प्रकरणातही तीन ते चार दिवस मुंबई पोलिसांकडे किरीट सोमय्या यांचा सुरू असलेला शोध अपुर्णच राहिल.

राजकीय परिस्थितीमुळे पोलिसांसाठी सगळ्यात कठीण वेळ - मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस नेहमीच सक्षमपणे काम करत असतात. याआधीही नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. मात्र सध्या राज्यामध्ये सुरू असलेले राजकारण हे आतापर्यंतच्या सर्वात खराब राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी किंवा विरोधक हे कायद्याचा वापर करून आपले विरोधक संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. खास करून सत्ताधारी हे तपास यंत्रणेला हाताशी धरून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधक आम्ही सत्तेवर आल्यास तुमच्यावर कारवाई करू असा दबाव पोलिसांवर आणण्याचा प्रयत्न करतात. अशा कठिण परिस्थितीमध्ये पोलिसांना काम करावे लागते. पोलिसांनाही चांगले ठाऊक असते की सत्ता बदल हा अटळ असतो. जेव्हा स्वतः मुख्य सचिव पोलिसांच्या बदल्या बाबत राजकीय हस्तक्षेप असल्याचे सांगतात. त्यावरून पोलिसांवर किती दबाव असू शकतो याचा विचार केला गेला पाहिजे असे मत निवृत्त पोलीस अधिकारी पी. के. जैन यांनी व्यक्त केल आहे. पोलीस अधिकारी हे नेहमीच सक्षमपणे काम करत असतात. मात्र सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस भरडले जात असल्याचे पी के जैन यांचे मत आहे.

हेही वाचा - Mumbai Pune Highway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर टँकर उलटल्याने भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.