ETV Bharat / city

Live Updates : 'एनआयए'ने 'एटीएस'कडून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला; पाहा व्हिडिओ - मनसुख हिरेन हत्याकांड

महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज
महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Mar 24, 2021, 10:38 AM IST

Updated : Mar 24, 2021, 9:34 PM IST

21:16 March 24

विनायक शिंदे, नरेश गोरला मुंबईच्या 'एनआयए' कार्यालयात आणले

ठाणे

मु़ंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा सर्व तपास आणि त्यांच्या ताब्यातील दोन्ही आरोपींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिले आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांनाही एनआयएने आपल्या ताब्यात घेऊन ठाण्यातून मुंबईमधील एनआयएच्या कार्यालयात आणले आहे.

19:50 March 24

'एनआयए'ने 'एटीएस'कडून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला; पाहा व्हिडिओ

ठाणे

ठाणे - सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा सर्व तपास आणि त्यांच्या ताब्यातील दोन्ही आरोपींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिले आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांनाही एनआयएने आपल्या ताब्यात घेतले.

19:04 March 24

सचिन वाझेवर बेकायदा कारवाई प्रतिबंधक (युएपीए) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

मुंबई - प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणात आरोपी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर बेकायदा कारवाई प्रतिबंधक (युएपीए) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बेकायदा कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) हा देश आणि देशाबाहेर बेकायदा कृत्ये रोखण्यासाठी अत्यंत कठोर तरतुदी अंतर्भूत असलेला कायदा आहे. हा कायदा संपूर्ण देशात लागू होतो. या कायद्याद्वारे एनआयए कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संशयित आरोपीला दहशतवादी घोषित करू शकते. 

18:53 March 24

एनआयए पथक एटीसच्या कार्यालयात दाखल

एनआयए पथक एटीसच्या कार्यालयात दाखल 

18:34 March 24

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मनेरे एनआयए कार्यालयात

ठाणे

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मनेरे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कार्यालयात दाखल झाले आहेत. 

17:34 March 24

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा सर्व तपास आता 'एनआयए' करणार

ठाणे

मुंबई : ठाणे सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा सर्व तपास व दोन्ही आरोपींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिला आहे. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे.

16:54 March 24

'एटीएस'च्या ताब्यात असलेले दोन आरोपींना वैद्यकीय चाचणीनंतर 'एनआयए'कडे सोपवले जाणार

मुंबई : ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोन्ही आरोपींची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींना राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपवण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने आता वैद्यकीय चाचणीसाठी दोन्ही आरोपींना ठाण्यातील कळवा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर एनआयएने मागणी केलेल्या बेकायदेशीर कृतीविरोधी कायद्यानुसार गुन्हे समाविष्ट करण्याची परवानगी मिळाल्यास वाझे सर्व संपत्ती जप्त होऊ शकते.

विनायक शिंदे हा निलंबित पोलीस अधिकारी असून नरेश गोर हा बुकी आहे.

16:01 March 24

बेकायदेशीर कृतीविरोधी कायद्यांतर्गत अतिरिक्त गुन्हे समाविष्ट करण्याबाबत 'एनआयए'चा विशेष न्यायालयात अर्ज

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात एसयुव्हीशी संबंधित केसमध्ये बेकायदेशीर कृतीविरोधी कायद्यांतर्गत (युएपीए) अतिरिक्त गुन्हे समाविष्ट करण्याच्या संदर्भात अर्ज राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष एनआयए न्यायालयात दाखल केला आहे.  

15:18 March 24

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे सोपवण्याचे 'एटीएस'ला निर्देश

मुंबई : ठाणे सत्र न्यायालयाने राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी थांबवून हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचे आदेश असूनही एटीएस हे प्रकरण एनआयएकडे सोपवित नसल्याने एनआयएने न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला हे निर्देश दिले आहेत.

15:09 March 24

सचिन वाझेचे 'त्या' हॉटेलमधील बील सोन्याच्या व्यापाऱ्याने भरल्याचे उघड

मुंबई - शहरातील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे हा काही दिवसांसाठी वास्तव्यास होता. त्याचे संपूर्ण बिल मुंबईतील एक सोन्याच्या व्यापाऱ्याने भरले असल्याचे तपासात समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संदर्भात मनीष छाचड या व्यापाऱ्याची चौकशी केली आहे.

ट्रायडेंट हॉटेलमध्ये सचिन वाझे हा सुशांत सदाशिव खामकर या नावाच्या बनावट आधार कार्डच्या आधारे एका अलिशान खोलीमध्ये राहत होता. या बनावट आधार कार्डचा नंबर 72825 2857 6822 असा आहे. हॉटेलमध्ये सापडलेल्या सीसीटीव्ही दृष्यांमध्ये सचिन वाझे हॉटेलमध्ये आला होता, त्यावेळी त्याच्यासोबत 4 बॅग होत्या. या बरोबरच एक महिला नोटा मोजण्याच्या मशीनसोबत येत असल्याचे दिसून आले आहे. वाझेचे जवळपास 13 लाखांचे बील मनीष छाचड या सोने व्यापाऱ्याने भरले असून ते एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून चुकते केले असल्याचे समोर येत आहे. या बरोबरच सीसीटीव्हीमधील ही अज्ञात महिला गुजरातमधील असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सचिन वाझेच्या डायरीत सांकेतिक भाषेमध्ये काही रक्कमेचा उल्लेख आढळून आला असून या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करीत आहे.

13:17 March 24

मी जर सरकारमध्ये असतो, तर परबीर यांना सस्पेंड केलं असते - पटोले

  • डेलकर प्रकरणात परमबीर हे गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते.

13:17 March 24

प्रशासनात संघ धार्जिणे आहेत, नाना पटोलेंचा आरोप

  • प्रशासनात संघ धार्जिणे आहेत.
  • आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचा वापर भाजपाकडून केला जातोय
  • परमबीर दोषी की अनिल देशमुख दोषी हे चौकशीत समोर येईल ते फडणवीस ठरणार नाहीत
  • उद्धव ठाकरेंचा तसा स्वभाव नाही. कधी काय बोलावं ते सीएम ठरवतील. फडणवीस सांगणार म्हणून ठाकरेंनी बोलावं का ?
  • अधिकाऱ्यांवर केंद्राकडून दबाव आणला जातोय अन्य राज्यातही हेच सुरू आहे

13:16 March 24

१०० कोटी प्रकरणी चौकशी समिती नेमावी - पटोले

  • महाराष्ट्राल बदनाम करण्याचा ठेका भाजपाने घेतला आहे
  • १०० कोटी वसुली प्रकरणी माजी न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी आणि चौकशी करावी
  • फडणवीसांनी त्यावेळी का राजीनामे घेतले नाहीत. आरोप हे होतच असतात
  • फडणवीस न्यायाधिश होते का? त्यांनी त्यांच्या काळात का राजीनामे दिले नाही.
  • दोषीवर कारवाई होवी पण आधी चौकशी झाली पाहिजे
  • आरोप झाले म्हणजे राजीनामा दिला पाहिजे असे नाही

13:14 March 24

राजभवन हे भाजप कार्यालय झालेय; फडणवीसांचे घोटाळे बाहेर काढणार - नाना पटोले

  • - वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्येच पाहिला मिळाला
  • - आरएसएसला किती दिले हे बाहेर काढणार
  • - काँग्रेसने देशाला उभे केले. महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केला
  • - भाजपाने देश विकायला काढला आहे
  • - फडणवीसांचे घोटाळे बाहेर काढण्याची सरकारकडे मागणी
  • - अंबानीच्या घराबाहेर गाडी ठेवली नव्हती ती एक किमी लांब होती
  • - अंबानीने तक्रार केली नाही, आंबानींच्या नावाचे या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा डाव होता
  • - राजभवन हे भाजप कार्यालय झाले आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद

12:27 March 24

परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयात जाण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आणि झालेल्या बदली प्रकरणावरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने परमबीरसिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.

12:14 March 24

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

कपिल सिब्बल राज्याची, तर मुकुल रोहतगी हे परमबीर सिंग यांची बाजू मांडत आहेत. एस कौल आर रेड्डी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. 

11:33 March 24

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी तीन वाजता मंत्रालयात पार पडणार आहे. सध्या राज्यसरकारवर झालेले आरोप पाहता बैठकीनंतर त्या सर्व मुद्यावर चर्चा होणार आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुखांविरोधात मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रानंतर राज्यसरकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

11:33 March 24

'ती' कागदपत्रे म्हणजे भिजलेला लवंगी फटाका - संजय राऊत

अँटिलिया स्फोटके प्रकरणात बदली झाल्यानंतर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. त्याचे भांडवल करत विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाला आहे. या सर्व प्रकरणातील पुरावे केंद्रीय गृहसचिवांना सादर केले. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ती कागदपत्रे म्हणजे भिजलेला लंवगी फटका आहे, त्याला वातही नव्हती, असा टोला फडणवीस यांना लगावला आहे.

10:51 March 24

संजय राऊत काही मोठे नेता नाहीत - फडणवीस

10:51 March 24

संजय राऊतांच्या लंवगी फटाक्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. या अहवालावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली.   अहवालात काही दम नसून त्याला काडीचीही किंमत नाही. फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका असे ते म्हणाले होते. यावर आज पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मी दिलेला अहवाल लंवगी फटाका असेल, तर सरकार घाबरत का आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला. 

10:47 March 24

कोरोनाला रोखण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे.

10:44 March 24

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलत केले पाहिजे - फडणवीस

राज्यात घडत असलेल्या मोठ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन पाळलं आहे. आरोप होत असलेल्या मंत्र्यांना वाचवण्यात येत आहे. राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही, असे फडणवीस म्हणाले. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलत केले पाहिजे, यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. 

10:41 March 24

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार आणि काँग्रेसवर टीका

या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेसची काहीच प्रतिक्रिया नाही. त्यांचे दिल्लीतील नेते वेगळे आणि राज्यातील वेगळे बोलतात. या वसुलीतील काँग्रेसला किती वाटा मिळतो, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी खंडणीप्रकरण सावरण्याचा अपयशी प्रयत्न केला. 

10:41 March 24

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपा नेत्यांची पत्रकार परिषद

राज्यातील परिस्थिती अस्थीर आहे. अधिकाऱ्यांना बदलीची भिती दाखवली जात आहे. 100 पेक्षा जास्त प्रकरणांची राज्यपालांना माहिती आहे. राज्यातील जनतेला न्याय देणे गरजेचे आहे, असे राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.  

10:37 March 24

भाजपाच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरू

10:34 March 24

भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळांने घेतली राज्यपालांची भेट

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत. यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. राज्यपालांची भेट घेऊन राज्यात होणाऱ्या परिस्थितीचा आढावा आपण घेऊन त्यांची माहिती राष्ट्रपतीकडे पाठवावी, अशी मागणी या नेत्यांनी यावेळी केली.

10:34 March 24

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे अद्याप हस्तांतरित नाही

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात गृह खात्याकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेला चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात असताना, मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रँचचे अधिकारी सचिन वाझें यांना अटक करण्यात आली. मात्र, एटीएसकडून सुरू असलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेला नसल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी विशेष न्यायालयामध्ये दिली.

10:34 March 24

86 पोलीस अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या

सचिन वाझेला झालेली अटक, त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांची झालेली उचलबांगडी, त्यानंतरचा लेटरबॉम्ब या सर्व पार्श्वभूमिवर मंगळवारी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ६५ अधिकारी हे क्राईम ब्रँचचे आहेत.

10:34 March 24

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सर्वोेच्च न्यायालयात सुनावणी

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली ही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. तसेच याचिकेमध्ये सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल 130 पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिलेला आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

09:48 March 24

Live Updates : 'एनआयए'ने 'एटीएस'कडून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला; पाहा व्हिडिओ

मुंबई - उद्योगपती  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा परमबीर सिंग यांनी आरोप केला. या स्फोटक घटनाक्रमानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.  परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आधार घेत राज्यातील विरोदी पक्षांनी राज्यपालाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्पोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आढळून आली होती. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी केली जात आहे. तसेच सचिन वाझे यांना क्राईम ब्रँच पदावरून हटवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळील मुंब्रा खाडीत सापडला होता. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आणि हिरेन यांची हत्या वाझेंनी केल्याचा संशय बळावला. वाझेंची चौकशी झाल्यानंतर त्यांना अँटिलिया कार स्फोटक प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली होती.  

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख प्रकरणात वाझेंना अटक होताच परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तर हे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळले आहेत

Last Updated : Mar 24, 2021, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.